(Saint Ignatius of Antioch)17th October 2020

"जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा तुम्हाला शिकविलं."

अत्युखिया चे संत इग्नेशिअस ह्यांचा सण

"ख्रिस्ती व्यक्ती एकटी कधीही स्वतःसाठी जीवन जगत नाही तिच्यावर देवाची मालकी असते"

इफिसकरांस  १:१५-२३ 

यासाठी, जेव्हापासून मी तुमच्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि देवाच्या लोकांबद्दलच्या तुमच्या प्रेमाविषयी ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी देवाचे उपकार मानण्याचे मी थांबविले नाही. मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचे आध्यात्मिक सामर्थ्य जे पित्याविषयी ज्ञान तुम्हांला पुरवील, ते देवो. मी असे सांगतो की, तुमच्या अंत:करणाचे डोळे प्रकाशित होवोत यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचारणाची आशा व संतांमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे.आणि आम्हांला विश्वासणान्यांसाठी त्याचे अतुलनीय सामर्थ्य किती महान आहे, जणू काय त्याच्या प्रचंड सामर्थ्यचा तो सराव आहे. 20 जो तो ख्रिस्तामध्ये करतो. जेव्हा त्याला (ख्रिस्ताला) मरणातून उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले. देवाने ख्रिस्ताला प्रत्येक अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा उंच ठिकाणी ठेवले. आणि देवाने ख्रिस्ताला मंडळीचा सर्वोच्च प्रमुख केले. मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. जी पूर्णता त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने भरली आहे, ती पूर्णता तो मंडळीला देतो..

हा प्रभूचा शब्द आहे... 


स्तोत्र ८:२-७

प्रतिसाद : आपल्या हातच्या कलाकृतीवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. 

१)हे प्रभो आमच्या स्वामी साऱ्या भुतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे तुझ्या ऐश्वर्याची कीर्ती गगना पर्यंत पोहचली आहे बालके भक्तांनी बाबा तुझे गुणगान गातात.  

२)आकाश जे तुझे अंगुलिकार्य, तू नियोजित केलेला तो चंद्र, ते तारे, हे सगळे मी पाहतो.  तू मर्त्य मानवाची आठवण करावीस, यत्किंचित मानवजातीची  तू पर्वा करावीस असा तो कोण?.  

३)तरीपण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस. त्याला गौरव आणि सन्मान यांनी अलंकृत केले आहेस. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू त्याला सत्ता दिली आहेस, सारे काही त्याच्या चरणापाशी ठेवले आहेस.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो,

मी तुझे स्तवन करतो,

कारण ह्या गोष्टी तू बालकांना प्रकट केल्या. 

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १२:८-१२


“प्रत्येक जण जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या मनुष्याला देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील.परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल. “प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्याला क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला क्षमा केली जाणार नाही.“जेव्हा ते तुम्हांला सभास्थान, सरकार, अधिकारी यांच्यासमोर आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वत:चा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका. कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्यावेळी तुम्हांला शिकवील.”

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
येशू म्हणतो जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरूद्ध बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. येशू असे विसंगत विधान का करतोय आणि हे विधान कुणासाठी आहे . त्या काळात येशूची सुवार्ता सगळयांनी ताबोडतोब स्वीकारली असे नाही . त्यांना थोडासा वेळ लागला. सुरूवातीला काही लोकांनी अविशवासही दाखवला. नंतर त्यांचे मनपरिवर्तनही झाले असेल. अशा अविश्वासू लोकांसाठी येशू हे विधान करतो. येशू त्यांना थोडासा वेळ देत आहे. कारण येशूला लोकांचा विश्‍वास दूढ करायचा होता. येशूच्या शिष्यांनीही येशूवर अविश्‍वास दाखवला होता. येशू पाण्यावरून चालत असताना पेत्राला म्हणाला, अरे अल्पविश्‍वासी, तू संशय का धरिलास? (मत्तय १४ ४ ३१) तसेच पुनरूत्थित ख्रिस्ताने शिष्यांना दर्शन दिले . या गोष्टीवर थोमाने विश्‍वास ठेवला नाही . त्यासाठी येशूने त्यांना परत दर्शन दिले .



प्रार्थना - हे सामर्थ्यशाली पवित्र आत्म्या आमच्या जीवनात ये आणि तुझ्या दानांनी आम्हाला भरून टाक,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या