सामान्य काळातील
एकोणतिसावा रविवार
मिशन रविवार
१८ ऑक्टोबर २0२0
"संत लूक हा वैद्य, कलाकार , मटण विकणारे, काचेचा व्यवसाय करणारे आणि लिपीक ह्यांचा आश्रयदाता संत मानला जातो."
पहिले वाचन : यशया ४५: १, ४- ६
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन.
परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्यापुढे राष्ट्रे पादाकांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे . राजांस आपल्या कमरा सोडावयास मी लावतो . त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो . “माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इसरायल ह्याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली, तू मना ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले . मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्याशिवाय कोणी दुसरा देव नाही . तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले . उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्याशिवाय दुसरा देव नाही . मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नव्हे .” हे सर्वांना कळेल .
हा प्रभूचा शब्द आहे .
सर्व : देवाला धन्यवाद .
स्तोत्र ९६:१,३-५,७-१०
प्रतिसाद : परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा .
१)परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर .
राष्ट्रांमध्ये त्याचा गोरव,
सर्व लोकांमध्ये त्याची अदभुत कृत्ये जाहीर करा ..
२)परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे,
सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे .
कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत .
परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे .
३)अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा,
परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा,
परमेश्वराच्या नावाची थोरवी गा .
अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या .
४)पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा .
हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो .
राष्ट्रांमधील लोकांना जाहीर करा की
परमेश्वर राज्य करतो .
तो सरळपणे लोकांचा न्याय करील .
दुसरे वाचन : थेस्सलनीकाकरांस पत्र १ : १ - ५
वाचक : पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन.
”देवपित्याच्या ठायी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलोनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान आणि तिमथी ह्यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो .आम्ही आपल्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करत सर्वदा तुम्हा सर्वाविषयी देवाची उपकारस्तुती करतो .आपल्या देवपित्यासमोर तुम्ही विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. देवाच्या प्रीतीतील बंधूनो, तुमची झालेली निवड आम्हांस ठाऊक आहेच . कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळवण्यात आली ..
हा प्रभूचा शब्द आहे .
सर्व : देवाला धन्यवाद.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,
जो मला अनुसरतो
त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील .
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय २२: १५ - २१
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .

0 टिप्पण्या