एकोणतिसावा सप्ताह
क्रूस भक्त संत पौल
संत ब्रेबफ, संत इसाक
व सहकारी ह्यांचा सण
१९ ऑक्टोबर २0२0
"आपले जीवन क्षणभंगुर आहे तरीसुद्धा अनेक जणांना धन संपत्तीचे आकर्षण असते जीवनातील बहुसंख्य वेळ लोभी माणूस धन मिळविण्यास आणि साठविण्यात खर्ची घालतो आणि जीवनातील अशा लोभापायी आपण देवापासून दूर जातो"
पहिले वाचन : इफिस २: १-१०
वाचक : पोलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
तुम्ही आपले अपराध आणि आपली पापे ह्यांमुळे मृत झालेले होता, त्या पापांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता; अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणा-या लोकांत आता कार्य करणारा,आत्म्याचा अधिपती, ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता, त्या तुम्हाला देवाने जिवंत केले . त्या लोकांत आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या आणि मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो आणि स्वभावत: इतराप्रमाणे कोधाची प्रजा होतो . तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वत£च्या अपरंपार प्रेमामुळे, ख्िस्तावरोवर आपणाला जिवंत केले . कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच वरोवर उठवले आणि त्याच्याच बरोबर स्वर्गात वसवले, ह्यासाठी की, खिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हाआम्हावरील ममतेच्या द्वारे येणा-या युगात त्याने आपल्या अगाध कृपेचे भांडार दाखवावे. कारण,कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे . कोणी आढयता वाळगू नये, कर्मे केल्याने हे झाले नाही; आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृत्ती आहोत, ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यकम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली .
हा प्रभूचा शब्द आहे .
सर्व : देवाला धन्यवाद .
स्तोत्र १००:१-५
प्रतिसाद : त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत.
१)अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा .
हर्षाने परमेश्वराची सेवा करा,
आनंदगीते गात त्याच्या पुढे या .
२)परमेश्वर हाच देव आहे हे जाणा,
त्यानेच आम्हाला उत्पन्न केले,
आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा,
त्याच्या कुरणातील कळप आहोत.
३)त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात,
स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा .
त्याचे उपकारस्मरण करा, त्याच्या नामाला धन्यवाद द्या .
४)कारण परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे
आणि त्याची सत्यता पिढयानुपिढया टिकते.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या
अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने
फळ देत जातात ते धन्य होत.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १२: १३ - २१
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .
लोकसमुदायातील कोणाएकाने येशूला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा . पण तो त्याला म्हणाला, गृहस्था, मला तुम्हावर न्यायाधीश किवा वाटणी करणारा कोणी नेमले? आणखी त्याने त्यांना म्हटले, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही . ” मग त्याने त्यांस एक दाखला सांगितला : कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आहे . तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, आता मी काय करावे? कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही . मग त्याने विचार ठरवला, मी असे करीन : मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवीन . मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे . आता विसावा घे, खा, पी, आनंद कर . परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मुर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल? जो कोणी स्वत:साठी द्रव्यसंचय करतो आणि देवविषयक बाबतीतधनवान नाही, तो ह्या धनवानासारखा आहे . ”

0 टिप्पण्या