(Saint Maria Bertilla)20th October 2020



संत सिस्टर बर्टीला हिचा सण 


सामान्य काळातील

एकोणतिसावा सप्ताह

मंगळवार 

२० ऑक्टोबर २०२०

"जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य"

"हे संत सिस्टर बर्टीला तू चांगुलपणाचा मूर्तिमंत आदर्श आहेस हॉस्पिटलमध्ये ते तू देवदूतासमान लोकांची सेवा केलीस आता तुझ्या प्रार्थनेद्वारे आजारी पीडित यांचा बचाव कर"

पहिले वाचन : इफिस २: १२-२२

वाचक :  पोलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.

आठवण करा कि, तुम्ही त्या वेळेस ख्रिस्त-विरहित, इसरायलच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके,आशाहीन आणि देवाविरहित असे जगात होता . परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्तयेशुच्याठायी  खिस्ताच्या रक्‍ताद्वारे जवळचे झाला आहात. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली . त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले . हे वैर म्हणजे अज्ञविधीचे नियमशास्त्र, अशासाठी कि स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी,आणि त्यांचे एक शरीर करून आपण कुसावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्ठारे दोघांचा देवाशी समेट करावा; आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो .ह्यावरून तुम्ही आतापासून परके आणि उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाच्या घरचे आहात . प्रेषित आणि संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वत खिस्त येशू मुख्य कोनशिला आहे . त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याचे द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात .

हा प्रभूचा शब्द आहे .


सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ८५:९-१४

प्रतिसाद : परमेश्‍वर आपल्या लोकांवरोवर शांतीबद्दल बोलेल


१)परमेश्‍वर देव जे काय वोलेल ते मी ऐकून घेईन, 

कारण तो शांतीवद्दल वोलेल . 

खरोखर त्याचे भय धरणा-यांना 

त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते, 

ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.

 

२)दया आणि सत्य यांचा संगम झाला आहे,

नीती आणि शांती यांचे मीलन झाले आहे .

पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे .

स्वर्गातून नीतिमत््व अवलोकन करत आहे .


३)जे उत्तम ते परमेश्‍वर देईल

आणि आमची भूमी आपले फळ देईल

त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल

आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील .


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत . 

सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत .

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १२: ३५ - ३७

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .

सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .

येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या . धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून,तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही असा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हास सत्य सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांस जेवावयास बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसऱ्या किवा तिस-या प्रहरी येईल तेव्हा जे त्याला असे आढळतील ते धन्य आहेत.


प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
आजच्या घडीला आपण समाजात नजर फिरवली तर आपणास असे दिसून येईल की बरीचशी माणसे विवंचनेत सापडलेली आहेत . घर, पैसा, नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदिंच्या काळजीमुळे मनावरचा ताण वाढत आहे . ह्याच वाढत्या तणावात जो प्रभूच्या वचनांशी एकनिष्ठ राहून ती वचने पाळतो तो धन्य. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला जागृत राहण्याचा इशारा करीत आहे . जागृत राहणे, पहारा ठेवणे, ह्या गोष्टी सांकेतिक आहेत . ह्याचा अर्थ एवढाच की आपण आपली कामे करावी पण त्याचबरोवर येशूच्या परतण्याचीही वाट बघावी . तो अकस्मात येईल. त्यासाठी आपली तयारी असायला हवी . आपल्या शिस्तबद्ध जीवनात आपण नेहमीच सावध असणे गरजेचे आहे . विश्‍वासू सेवक हा नेहमीच जागृत असतो.

प्रार्थना - हे प्रभू येशू, जीवनात सतत जागृत राहून तुला अनुसरण्यास व तुझ्या प्रेमळ सहवासाचा अनुभव घेण्यास आम्हास कृपा दे, आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या