![]() |
| St.Pope John Paul II |
एकोणतिसावा सप्ताह
गुरुवार
२२ ऑक्टोबर २०२०
"प्रभू येशु ख्रिस्ताने देव राज्याची घोषणा केली व त्यानुसार कार्य करीत असताना त्याला त्याची मोठी किंमत द्यावी लागली ते म्हणजे दुःख सहन आणि मरण. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी ख्रिस्ती जीवन एक आव्हान आहे."
पहिले वाचन : इफिस ३: १४-२१
वाचक : पोलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्याद्रारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे, ख्रिस्ताने तुमच्या अंत:करणांमध्ये तुमच्या विश्वासाच्याद्वारे वस्ती करावी, तुम्ही प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असे असून तिची लांबी, रूंदी, उंची आणि खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास आणि बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, अशाप्रकारे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे .
जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किवा कल्पना ह्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे, त्याला मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यानपिढ्या युगानुयुग गौरव असो . आमेन .
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ३३:१-२,४-५,११-१२,१८-१९
प्रतिसाद : परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
१)अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा,
प्रामाणिक स्वभावाच्या माणसांना स्तुतिगान शोभते .
वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा,
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा .
२)कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे,
त्याची सर्व कृती सत्याची आहे .
त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत .
परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे .
३)परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते,
त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात .
ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता
प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!
४) पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात
आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात,
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा
आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा
म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते .
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात .
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात .
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १२: ४९ - ५३
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे . ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! मला स्नानसंस्कार घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठया पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता देण्यास आलो आहे असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास. आतापासून एका घरातील पाच जणांत दोघांविरूद्ध विरूद्ध तिघे आणि तिघांविरूद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरूद्ध बाप आणि बापाविरूद्ध मुलगा, मुलीविरूद्ध आई आणि आईविरूद्ध मुलगी, सुनेविरूद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल.

0 टिप्पण्या