तिसावा सप्ताह
संत फ्रूमेंशियास ह्यांचा सण (महागुरू वर्तनसाक्षी )
मंगळवार
२७ ऑक्टोबर २०२०
"आकाशातील पाखरे त्यांच्या फंद्यात राहू लागली"
"शहाणा मनुष्य देवाला भितो आणि वाईटापासून दूर राहतो मूर्ख अतिआत्मविश्वासात अडखळतो आणि देवापासून दूर जातो"
प्रकटीकरण (१४ : १६)
पहिले वाचन : इफिस ५:२१-३३
वाचक : पौलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय खिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे पत्नींनीही सर्व गोष्टींत आपआपल्या पतीचा अधीन असावे. पत्नींनो, जशी खिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वत:ला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किवा अशासारखे काही नसून ती पवित्र आणि निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वत:वरच प्रीती करतो . कारण कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. “म्हणून पुरूष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील. ” हे रहस्य मोठे आहे पण मी ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर वर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा .
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १२८:१-५
प्रतिसाद : जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य !
१)जे परमेश्वराचे भय धरतात,
जे त्याच्याच मार्गानी चालतात ते धन्य !
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील .
२)तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल .
तुझ्या माजघरात तुझी पत्नी सफळ द्राक्षवेलीसारखी होईल,
तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील .
३)पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या मनुष्याला असा आशीर्वाद मिळेल.
परमेश्वर सियोनातून तुला तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वाद देवो !
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे,
तू आम्हाला सत्यात समर्पित कर .
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १३: १८ - २१
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
येशू म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळयात पेरला . मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यात राहू लागली”
तो आणखी म्हणाला, “मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? ते खमिरासारखे आहे . ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले .

0 टिप्पण्या