Marathi Bible Reading | St. Alphonsus Rodriguez | 31st October 2020

                                   सामान्य काळातील

तिसावा सप्ताह

संत अल्फान्सो रॉड्रिग्ज ह्यांचा सण 

  शुक्रवार   

३१ ऑक्टोबर २०२०

"जो आपणास नामवितो तोच उंच केला जाईल"

"ख्रिस्तासाठी पत्करलेली क्रुसाची वाट स्वगार्चीच वाट बनते"

दरवाजावर बेल वाजली आणि कोणी आले तर तो ख्रिस्ताच आहे,असे समजायचा, "प्रभुजी या मी आपली काय सेवा करू?"-संत अल्फान्सो रॉड्रिग्ज

पहिले वाचन : फिलिप्पीकरांस पत्र १:१८-२६

वाचक :  पौलाचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.

ख्रिस्ताची घोषणा होते ह्यात मी आनंद करतो आणि करणारच. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा आणि आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठयाने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे| कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही| मी ह्मा दोहोसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्तजवळ असण्याची मला उत्कंठा आहे. कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरिता अधिक आवश्यक आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला वॄद्धी आणि आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सार्वजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की, तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे  ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हाला अधिक कारण व्हावे.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ४१:२-३,५

प्रतिसाद : माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. 


१)हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी कासावीस होते.

तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी कासावीस झाला आहे

 

२)माझा जीव देवासाठी,

जिवंत देवासाठी तहानलेला आहे.

मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन ?


३)लोकसमुदायाच्या मेळ्याबरोबर मी चालेन

आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्मांचा गजर चालला असता,

देवाच्या घराकडे त्याला मी मिरवत नेईन.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना

ज्योतीसारखे जगात दिसता.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १४: १,७-११

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .


येशू एका शब्बाथ दिवशी परूश्यातील कोणाएका अधिर्का याच्या घरी भोजनास गेला, तेव्हा असे झाले की ते त्याच्या पळतीवर बसले होते. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून येशू त्यांना दाखला देऊन म्हणाला : “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस, कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल.  मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्मांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन  बसशील| पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन  बैस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन  बैस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल  आणि जो आपल्याला नमवतो तो उंचावला जाईल.” 


प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
येशू मरेपर्यंत आज्ञाधारक राहिला, नम्रतेचे जीवन जगला. त्याने दुसऱ्यांची सेवा केली. लोकांनी आपल्याला मानवंदना करावी अशी अपेक्षा त्याने कधीच ठेवली नाही त्यामुळेच देवाने त्याला अगदी उच्च स्थानी म्हणजे त्याच्या उजव्या हाताशी राजासनावर बसविले. संत पौल म्हणतो, “माझ्या जगण्याने किंवा मरणाने ख्रिस्ताचा महिमा होईल अशी मी आशा बाळगतो आणि ती मी पूर्ण करणारच.” आपणही येशू ख्रिस्ताचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. प्रतिष्ठा, पैसा, पद, मान या गोष्टी आपल्याला तात्पुरत्या सुख देतील. पण येशू सारखे जीवन जगल्यास आपल्याला सार्वकालिक सुख प्राप्त होईल. त्यामुळेच  ढोंग्यासारखे जीवन न जगता आपण खरे ख्रिस्ती जीवन जगायला हवे| प्रत्येक गोष्टीचे श्रेय हे देवालाच देणे योग्य आहेे व तसे केले तरच परमेश्वर आपल्याला उच्च स्थान देईल.

प्रार्थना -हे प्रभू येशू, तुझी योग्य ती स्तुती करण्यास व नम्रपणे त्यांना सन्मानाने वागविण्यात प्रेरणा दे ,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या