(Saints Sergius and Bacchus)8th October 2020

रक्तसाक्षी संत सर्जिअस आणि बाक्खस ह्यांचा सण 


गलतीकरांस  ३:१-५

अहो मूर्ख गलतीकरांनो! ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले जाहीर रितीने तुम्हांला वर्णन करुनसांगितले होते त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे?
मला तुमच्याकडून ही एक गोष्ट शिकायची आहे? आत्म्याची दानेतुम्हाला नियमशास्त्राचे पालन करण्याने मिळाली आहेत की सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवल्याने मिळाली आहेत? 
तुम्ही इतके मूर्ख आहात का की, जे जीवन तुम्ही आत्म्यात सुरु केले ते आता देहाने पूर्ण करीत आहात? 
तुम्ही व्यर्थचइतकी दु:खे अनुभवली का? माझी आशा आहे की ती व्यर्थ नव्हती. 
देव जो तुम्हांला आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्येचमत्कार करतो$ तो तुम्ही नियमशास्त्राचे पालन करता म्हणून का सुवार्ता ऐकून तीवर विश्वास ठेवला म्हणून तो हे करतो.

हा प्रभूचा शब्द आहे... 


स्तोत्र लूक १:६९-७५

प्रतिसाद : पाहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.


१)त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.देव म्हणाला की$ मी असे करीन त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.

२)जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे. व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.

३)हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की, आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू. त्याची अशी इच्छा होती की,आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.


जयगोष                                                                         स्तोत्रे ११८:३६

आलेलूया,आलेलूया !

हे परमेश्वरा , तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळावं. आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.

आलेलूया !

शुभवर्तमान 

लूक ११:५-१३


मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी कोणाला तरी एक मित्र होता. आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला$ “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे,कारण माझा मित्र नुकताच प्रवास करुन माझ्याकडे आला आहे. आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला,“मला त्रास देऊ नको! अगोदरच दार लावलेले आहे. आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही.’ मी तुम्हाला सांगतो जरी तो उठून त्याला कांही देण्याची टाळटाळ करील तरी त्याच्या मित्राच्या आग्रही वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ते देईल. आणि म्हणून मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल. जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. तुम्हांमध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल? जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हांला तुमच्या मुलांना चांगल्या देण्याचे समजते$ तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता किती तरी अधिक पवित्र आत्मा देईल?”


प्रभूचे हे शुभवर्तमान... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या