संत डेनिस ,रस्टिकस आणि एलेथेरियस सण
रक्तसाक्ष्यांचे रक्त हे ख्रिस्तसभेचे बीज आहे पुन्हा एकदा ह्या रक्तसाक्ष्यांच्या जीवनातून सिद्ध झाले .
गलतीकरांस ३:७-१४
मग तुम्हाला समजले पाहिजे की जे विश्वास ठेवतात, तेच अब्राहामाचे खरे वंशज आहेत.
पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामालापूर्वीच सुवार्ता सांगितली की$ “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वासणाऱ्याअब्राहामासह आशीर्वाद मिळेल.
परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असेलिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापितअसो.”
नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे. कारण शास्त्र सांगते की,“विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल.”
नियमशास्त्र विश्वासाचे नाही. त्याऐवजी पवित्र शास्त्र असे सांगते की,“जोकोणी ते पाळतो तो त्यामुळे जगेल.”
ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शापहोऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.”
ख्रिस्तानेआम्हाला मुक्त केले यासाठी की. अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेश्यांना मिळावा. यासाठी की विश्वासाद्वारे आम्हांला आत्म्याचे अभिवचन मिळावे.
हा प्रभूचा शब्द आहे...
स्तोत्र १११:१-६
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतों .
१)परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले. परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या चांगल्या गोष्टी लोकांना हव्या असतात.
२)देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो. त्याचा चांगुलपणा सदैव असतो. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
३)देव त्याच्या भक्तांना अन्न देतो. देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
जयगोष स्तोत्रे ११८:८८
आलेलूया,आलेलूया !
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे,
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक ११:१५-२६
परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”
काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले.
पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात.
आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हांला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो..
पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी (तुमची मुले) कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.
परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग हे स्पष्ट आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वत:चे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमता सुरक्षित राहते.
परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्यांने भरंवसा ठेवला होता$ ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.
जेव्हा भूत माणसाबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्याला ती विश्रांति मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, “मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’
तो जातो आणि त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.
नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट वदुष्ट असे सात आत्मे मिळवितो, आणि ते आत जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
प्रभूचे हे शुभवर्तमान...
0 टिप्पण्या