एकतिसावा सप्ताह
संत बर्टीला , कुमारिका हिचा सण (वर्तन साक्षी)
गुरवार
५ नोव्हेंबर २०२०
"पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दुतांसमोर आनंद होतो."
"ह्या जागतिक आकर्षणा पासून संत बर्टी दूर राहिली. तिने मठात प्रवेश केला. तिच्या मनमिळावू, सहनशील, नम्र व प्रेमळ स्वभावा मुळे बऱ्याच परकीय स्त्रियांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला, व आपल्या श्रीमंती पासून व भरजरी वस्त्रे पासून दूर झाले, व मठात प्रावेश केला. बार्टीला संस्थे मध्ये नम्रता, पवित्रा व विवेक जीवन जगली."
पहिले वाचन : फिलिप्पीकरांस पत्र ३:३-८
वाचक : पौलाचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विसंबून न राहणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत. तरी देहावरही विसंबून राहण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर विसंबून राहावे असे वाटते तर मला अधिक वाटणार.मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इसरायल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्रांचा इब्री, नियमशास्त्राच्यादॄष्टीने परूशी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळींचा छळ करणारा, नियमशास्त्रातील निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्माच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १०५:२-७
प्रतिसाद : जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो.
१)परमेश्वराचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा,
त्याच्या सर्व अद्भुत कॄत्यांचे वर्णन करा.
त्याच्या सर्व पवित्र नावाचा अभिमान बाळगा,
जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो.
२)परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य ह्मांचा शोध करा,
त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
त्याने केलेली अद्भुतकॄत्ये, त्याचे चमत्कार
आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
३)त्याचा सेवक अब्राहाम ह्माचे वंशजहो,
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो,
तो परमेश्वर आमचा देव आहे,
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्माने मरण नाहीसे केले
आणि सुवार्तेच्याद्वारे जीवन मिळवून दिले.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १५: १-१०
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
सर्व जकातदार आणि पापी लोक येशूचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परूशी आणि शास्त्रीही अशी कुरकूर करू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.” मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला: “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खाद्यांवर घेतो आणि घरी येऊन मित्रांस आणि शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो.” तसेच अशी कोण स्त्री आहे की, “तिच्याजवळ रूप्याची दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून आणि घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना आणि शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दुतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो.”

0 टिप्पण्या