सामान्य काळातील
एकतिसावा सप्ताह
संत विली ब्रॉर्ड ह्यांचा सण (महागुरू वर्तंनसाक्षी)
शनिवार
७ नोव्हेंबर २०२०
"कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही"
"संत पौलाला देवाची सुवार्ता पसरविताना बरेच संकटांनासामोरे जावे लागले तरीही संत पौल देवाचा गौरव करतो. पौलाला जागतिक संपत्ति व सुखाची लालसा नव्हती . त्याने देवाला प्रथम स्थान दिले. व स्वर्गीय सुखासाठीच त्याने ख्रिस्ताचे सुवार्ता गाजविली.तशीच सुवार्ता आपल्याला गाजविता यावी म्हणून आपण चिंतन करूया."
पहिले वाचन : फिलिप्पीकरांस पत्र ४:१०-१९
वाचक : पौलाचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागॄत झाली.ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. हरएक प्रसंगी अन्नतॄप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे आणि विपन्न असणे ह्माचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास समर्थ आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केले. फिलिप्पीकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की, सुवार्तेच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा, तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही मी थेस्सल्लेनीकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही दोनदा माझी गरज भागवली. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे.ते जणू काय सुगंध, देवाला मान्य आणि संतोषकारक यज्ञ असे आहे माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ११२-१-२,५-६,८-९
प्रतिसाद : जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य.
१)परमेश्वराचे स्तवन करा.
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो
धन्य!
त्याची संतती पॄथ्वीवर पराक्रमी होईल ,
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.
२)जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते,
तो न्यायाने आपले व्यवसाय करील.
तो कधीही ढळणार नाही,
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.
३)त्याचे मन स्थिर असते, तो भिणार नाही.
त्याने सढल हाताने गरिबांस दानधर्म केला आहे.
त्याचे नीतिमत्व सर्वकाळ राहील.
त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल|
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
आपण त्याच्या सॄष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे
म्हणून पित्याने स्वत:च्या इच्छेने आपणाला
सत्यवचनाने जन्म दिला.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १६: ९-१५
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
“तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल?” येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, ह्मासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे. “जो अगदी थोडया गोष्टींविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टींविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोडया गोष्टींविषयी अन्यायी तो पुष्कळ गोष्टींविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.” धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते आणि त्याला हसत होते. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:स लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो, कारण माणसांना जे परमश्रेष्ठ वाटते ते देवाच्या दॄष्टीने तिरस्करणीय आहे.”

0 टिप्पण्या