तुम्ही कलागुणांनी संपन्न असला तर, तुमच्याभोवती सदैव लोकांचा गराडा पडलेला असेल; परंतु स्वर्गाच्या दरबारातील न्याय वेगळा आहे. देवाची इच्छा काल, आज आणि युगानुयुग कुठल्याही 'जर-तर' व 'पण' 'परंतु' पासून संपूर्णपणे मुक्त आहे. - संत जेन डी शांटाल
"मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल"
आपल्या प्रत्येकाला देवाच्या सहवासाची आणि दर्शनाची आंतरिक ओढलागावी म्हणून बायबलवाचन-चिंतन, मनन, प्रार्थना तसेच आचरण करण्याची गरज आहे. आपले अंत:चक्षू उघडे करुन देवाला जाणण्यासाठी, अनुभवण्यासाठी व दर्शन मिळविण्यासाठी संपूर्ण विश्वासाने सर्वस्वी देवाला शरण जाऊन देवाच्या वचनाद्वारे देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊया.
पहिले वाचन : बेनसिरा ४८:१-४.९-११
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"एलिया पुन्हा येईल."
एलिया भविष्यवादी अग्नीप्रमाणे उठला आणि त्याचे शब्द मशालीप्रमाणे जळत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि त्याने आपल्या आस्थेने त्यांची संख्या कमी करून घेतली. त्याच्यामुळे प्रभूने आज्ञा केली आणि आकाशाचे दरवाजे बंद झाले आणि तीन वेळा अग्नीचा वर्षावसुद्धा करून घेतला. हे एलिया, तुझ्या अद्भुत कार्यांनी तू किती महान होतास!
अग्नीच्या चक्रवातामधून, ज्वालामय अश्वाच्या रथातून तुला वर घेतले गेले. तुझ्याविषयी असे लिहिले गेले आहे की, देवाचा कोप प्रज्वलित होण्याच्या अगोदर तो शांत करण्यासाठी, मुलाचे मन पित्याकडे वळविण्यासाठी आणि याकोबची कुळे पुनः प्रस्थापित करण्यासाठी तू नेमलेल्या वेळी तयार असशील जे प्रेमाने नटवले आहेत आणि ज्यांनी तुला पाहिलेले आहे ते धन्य होत कारण आम्हीसुद्धा निश्चित जगणार आहोत.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ८०:२अक, ३ब, १५-१६,१८-१
प्रतिसाद : प्रभो, आम्हांला पूर्वस्थितीवर आण.
१) हे इस्राएल राष्ट्रांच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे. करुबासनावर विराजमान झालेल्या परमेश्वरा, आम्हांला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे. तुझा पराक्रम गाजव आणि आमचा उद्धार करायला धावून ये.
२) हे सर्वसमर्थ देवा, मागे फीर, स्वर्गातून नजर टाकून बघ. या द्राक्षलतेची, आपल्या उजव्या हाताने लावलेल्या रोपाची काळजी घे.
३) तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी समर्थ केलेल्या मानवावर तुझा वरदहस्त दे. पुन्हा काही आम्ही तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही. आम्हांला नवजीवन दे म्हणजे आम्ही तुझ्या नामाचा धावा करू.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे. पाहा, तो आमचे तारण करण्यास येत आहे.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय १७:१०-१३
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
"एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला कधीच ओळखले नाही." पर्वतावरून खाली येत असताना शिष्यांनी येशूला विचारले, "मग एलिया यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत?" येशूने उत्तर दिले, "एलिया येईल आणि सारे काही स्थिरस्थावर करील, पण मी तुम्हांला सांगतो. एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले. मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल." येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहान विषयी बोलत आहे हे तेव्हा कोठे शिष्यांच्या लक्षात आले.

0 टिप्पण्या