सामान्यकाळ
सामान्यकाळातील पहिला सप्ताह
"पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा."
✝️
पहिले वाचन : इब्री १:१-६
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन १:१-६
देव प्राचीन काळी अंशाअंशानी आणि प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा पुत्र त्याच्या गौरवाचे तेज आणि त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारसाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले :
"तू माझा पुत्र आहेस,
आज मी तुला जन्म दिला आहे ?"
आणि पुन्हा
"मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल ?"
आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो: "देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९७:१-२,६,७,९
प्रतिसाद : सर्व दैवतांनो, प्रभूलाच नमन करा,
१) प्रभू राज्य करतो, पृथ्वी जयघोष करो; बेटांच्या समुदायांना आनंद होतो. मेघ आणि अंधकार त्याच्या सभोवती आहेत, त्याचे सिंहासन न्यायनीतीवर आधारलेले आहे.
२) आकाश त्याची न्यायपरायणता जाहीर करते, सारी मानवजात त्याचे ऐश्वर्य पाहते. सर्व दैवतांनो, त्यालाच नमन करा.
३) कारण हे प्रभो, तूच साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहेस. सर्व दैवतांहून तू थोर आहेस.
जयघोष
आलेलूया,आलेलूया !
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे:
सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आलेलुया!
शुभवर्तमान
मार्क १: १४-२०
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:१४-२०
योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाचे शुभवर्तमान प्रकट करीत गालिलात आला आणि म्हणाला, "काळाची पूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा." नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते आणि येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन." मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला भाडोत्री चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
0 टिप्पण्या