पुनरुत्थान
दुसरा सप्ताह
गुरुवार
१५ एप्रिल २०२१
"ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मापण साक्षी आहे."
जेव्हा सरदाराने आणि वडीलमंडळाने प्रेषितांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, "ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांस निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने येरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हांवर आणू पाहत आहा." परंतु पेत्र आणि इतर प्रेषितांनी उत्तर केले, "आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहीजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्राएलला पश्चात्ताप आणि पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहो आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे."
हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांस जिवे मारण्याचा विचार करू लागले.
हा प्रभूचा शब्द आहे
शुभवर्तमान योहान ३:१६-२१

0 टिप्पण्या