पुनरुत्थान
तिसरा सप्तह
बुधवार
२१ एप्रिल २०२१
"ज्यांची पांगापांग झाली होती ते तर वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले."
येरुशलेममधल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया आणि शोमरोन ह्या प्रदेशात पांगापांग झाली. भक्तिमान माणसांनी स्तेफनला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. इकडे शौल मंडळीला हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना आणि स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकीत असे.
तेव्हा ज्यांची पांगापाग झाली होती ते तर वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले आणि फिलीपने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलीपचे भाषण ऐकून आणि तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले, पुष्कळ पक्षपाती आणि पांगळी माणसे बरी झाली. अशा प्रकारे त्या नगरात आनंदीआनंद झाला.
हा प्रभूचा शब्द आहे
शुभवर्तमान योहान ६:३५-४०

0 टिप्पण्या