पुनरुत्थान
तिसरा सप्तह
गुरुवार
२२ एप्रिल २०२१
"जर तू तुझ्या संपूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवलास तर तुला बाप्तिस्मा मिळेल."
प्रभूच्या दूताने फिलीपला म्हटले, "ऊठ, जी वाट येरुशलेमपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. ती "ओसाड आहे." मग तो उठला व निघाला, तेव्हा पाहा, एक कुशी षंढ, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता आणि त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते, तो येरुशलेममध्ये उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. तेव्हा आत्म्याने फिलीपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ." फिलीप धावत गेला आणि त्याने यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहा ते आपल्याला समजते काय ?" त्याने म्हटले, "कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?" मग त्याने फिलीपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचीत होता तो असा :
त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला." तेव्हा षंढाने फिलीपला म्हटले, "मी तुम्हाला विनंतीपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी की दुसऱ्या कोणाविषयी ?” तेव्हा फिलीपने बोलायला आरंभ केला आणि ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंढ म्हणाला, “पाहा, हे पाणी! मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?" तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितले आणि फिलीप आणि षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यावरुन वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलीपला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलीप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली
हा प्रभूचा शब्द आहे
शुभवर्तमान योहान ६:४४-५१

0 टिप्पण्या