सामान्य काळातील
पंधरावा सप्ताह
शनिवार
१७ जुलै २०२१
संत आलेक्सियस
शुभवर्तमान मत्तय १२:१४-२१
वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जे आजारातून बरे झाले होते त्यांना येशूने यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून ताकीद दिली की, मला प्रकट करू नका."
परुश्यांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्याविरूद्ध मसलत केली.पण हे ओळखून येशू तेथून निघाला. तेव्हा बरेच लोक त्याच्यामागून चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले आणि यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे; म्हणून मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. यशयाद्वारे सांगितले होते, “पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही आणि रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही; चेपलेला बोरू तो मोडणार नाही आणि ; मिणमिणती वात विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”

0 टिप्पण्या