सामान्यकाळातील पहिला सप्ताह
✝️
'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,'
देवसहायम् पिल्लय (जन्माच्या वेळचे मूळ नाव निळकंठ पिल्लय) ह्यांचा जन्म एका श्रिमंत नायर समाजातील कुटूंबात नत्तालम् ह्या सध्याच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील ठिकाणी २३ एप्रील १७१२ रोजी झाला होता. नायर समाजातील तत्कालीन मातृसत्ताक परंपरेत देवसहायम् पिल्लय ह्यांची जडनघडन त्यांच्या मामांनी केली, आणि लवकरच त्यांना हिंदू श्रद्धा व परंपरा ह्यांचेही ज्ञान झाले.
देवसहायम् ह्यांच्या कुटूंबावर त्रवणकोरचे राजे महाराजा मारतंड वर्मा ह्यांच्या शाही महालाचा प्रभाव होता, आणि देवसहायम् तरुणपणी महालात सेवेसाठी रुजू झाले. त्यांच्या क्षमता व उत्साह महालात दुर्लक्षीत राहिला नाही, त्यामुळे लवकरच त्यांना त्रवणकोरचे दिवण रामायन दलावा ह्यांच्या अधिकाराखाली राज्यातील घडामोडींचे अधिकृत प्रमूख म्हणून नेमण्यात आले.
ख्रिस्ती श्रद्धेत परिवर्तन:
१७४१ मध्ये एड डच नौदल कमांडर कॅप्टन युस्टाचीयस डी लॅनॉय ह्यांना डच इंस्ट इंडिया कंपनी मार्फत त्रवणकोरच्या अखत्यारीत असलेल्या कोलाचेल ह्या बंदरावर नौदलाच्या एका मोहिमेसाठी पाठवण्यात आले होते. त्रवणकोरचे सैन्य आणि डि लॅनॉय ह्यांची माणसे ह्यांच्यात झालेल्या लढाईत डच सैन्यांची हार झाली आणि त्यांची अनेक माणसे मारली गेली व अनेक कैद करण्यात आली. युस्टाचियस डी लॅनॉय, त्याचा साथीदार डोनाडी आणि आणखी काही डच सैनीक कैदेत ठेवण्यात आले.
डी लॅनॉय व त्याच्या सैनिकांना नंतर राजाकडून ह्या अटीवर अभय मिळाले की ते त्रवणकोरच्या लष्करात सेवा देतील. डी लॅनॉय नंतर अनेक लढाया जिंकून व अनेक शेजारील राज्ये त्रवणकोरला मिळवून देऊन राजाची मर्जी संपादन करून त्रवणकोर लष्करात कंमांडर बनला.
राजाच्या मर्जीत असतानात डी लॅनॉय आणि देवसहायम् पिल्लय ह्यांचा चांगला परिचय झाला. डी लॅनॉयच्या ख्रिस्ती श्रद्धेत देवसहायम् ह्यांना रसवाटू लागला आणि डी लॅनॉय कडून त्यांच्या मनात ही श्रद्धेची ज्योत प्रज्वलीत केली ज्याचे पर्यावसन १७४५ सालच्या त्यांच्या धर्मपरिवर्तनात झाले.
स्नानसंस्कार: ख्रिस्ती श्रद्धेचा स्विकार करून देवसहायम ह्यांनी वडक्कनकुलम गावातील(आताच्या तमीलनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील) रोमन कॅथोलीक लॅटीन राईट चर्च मध्ये बाप्तीस्मा घेतला, जिथे येशुसंघीय धर्मगुरू मठ चालवीत असत. निळकंठ पिल्लय हे त्यांचे जन्माच्या वेळचे नाव त्यावेळी बदलून लाझर ठेवण्यात आले तरी ते त्यांच्या नावाच्या तमीळ व मल्याळम भाषांतराने बनणारे देवसहायम ह्या नावानेच सगळीकडे सुपरिचीत आहेत(ज्याचा अर्थ होतो देवाचे सहाय). तोपर्यंत त्यांचा विवाह त्रवणकोर मधील भार्गवी अम्मल ह्यांच्याशी झाला होता. पतीकडून त्यांचेही पुढे मनपरिवर्तन होऊन त्यांनीही ख्रिस्ती श्रद्घा स्विकारली. त्यांना बाप्तीसम्याच्या वेळी ग्नानापू अम्मल(ज्याचे तमीळ व मल्याळम भाषांतर तेरेसा असे होते) हे नाव देण्यात आले होते. धर्मांतरामुळे त्यांच्या गावात त्यांच्या विरुद्घ उठलेल्या रोशाच्या भीतिने तिने त्या गावचे विस्थापीत नागरीक म्हणून राहणे पसंत केले. देवसहायमच्या कुटुंबियांनीही नंतर बाप्तीसमा स्विकारला.
चर्च इतिहासकार सांगतात की, राज्यातील ब्राहामण मुख्य पुरोहीत, सामंत स्वामी, राजघराण्याचे सदस्य आणि नायर समाजाने दिवान रामायन देलावा ह्यांच्यासमोर देवसहायमवर चुकीचे आरोप केले. देवसहायम ह्यांना त्यांच्या सेवेतून पदच्यूत करण्यात आले आणि त्यांच्यावर राजद्रोह केल्याचा व राज्याची गुपिते प्रतिस्पर्धी युरोपीयन ह्यांच्यासमोर फोडल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना नंतर अटक करण्यात आली व तीन वर्षे त्यांचा छळ करण्यात आला.
शुभवर्तमान मार्क २:१-१२
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे."
येशू पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की, दारात देखील त्यांना जागा होईना, तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षपाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथील छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता तो खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." कित्येक शास्त्री तेथे बसले होते, त्यांच्या मनात असा विचार आला, “हा असे का बोलतो ? हा दुर्भाषण करतो. एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो ?" ते स्वतःशी असा विचार करीत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता ? 'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,' असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा 'ऊठ, आपली बाज उचलून चाल' असे म्हणणे सोपे ? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, “मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घे आणि आपल्या घरी जा." मग तो उठला आणि लगेच आपली बाज उचलून सर्वांच्यादेखत निघाला. ह्यावरून सर्वजण थक्क झाले आणि देवाचा गौरव करीत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते!"
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️
0 टिप्पण्या