सामान्यकाळातील पहिला सप्ताह
✝️
“माझ्यामागे ये, मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलवावयास आलो आहे.”
क्रूरकर्म्याच्या काळातील छळवाद टाळण्यासाठी तो एका अरण्यात पळूनगेला. त्याच्या विश्वासाला देवानेही प्रतिसाद दिला. तो जिथे जाऊन राहिला तिथेत्याला समोरच एक नारळ दिसला. त्या नारळाचे पाणी तो प्याला, त्यातील खोबरे त्याने खाऊन टाकले आणि त्या नारळाच्या झावळ्यापासून स्वतःसाठी कटिवस्त्रे त्याने शिवली. जेव्हा नारळाच्या माडावरील नारळ संपले तेव्हा एक कबुतर त्याच्यासाठी दररोज पावाचा तुकडा घेऊन यायला लागले.पुढे डेशियसचा छळ संपुष्टात आल्यावर ह्या जगातील ऐहिक सुखाकडे परतण्याची त्याला अनावर इच्छा झाली. परंतु प्रार्थना आणि प्रायश्चित्त ह्याची चव काय असते आणि त्याचे फलित काय असते हे त्याने स्वानुभावाने पाहिलेले होते. म्हणूनच आपल्या जीवनाची उरलेली १० वर्षे प्रार्थना आणि मनन चिंतन तो त्या जंगलातच राहिला. पौल अशा विरक्तवस्थेत एका अरण्यात राहात आहे ही गोष्ट देवाने प्रथम फा. अँथनी द ग्रेट (सण १७ जानेवारी) ह्याला प्रकट केली. तीन दिवस हे धर्मगुरू आपल्या ह्या स्नेह्याचा शोध करीत होते. त्याचे असे झाले : तहानेने व्याकूळ झालेली एक लांडगीण पाण्यासाठी दगडाच्या कपारीतून इकडे तिकडे फिरत होती. अँथनीसुद्धा तहानलेला होता. तोही त्या लांडगीणीच्या मागे पाण्याच्या शोधार्थ निघाला. ह्याच शोधात त्याला साधू पुरुष पौल सापडला. जेव्हा अँथनी पौलसह राहात होता तेव्हा कबुतर पावाचे दोन-दोन तुकडे आणीत असे. एके रात्री त्यांनी एकत्र प्रार्थना केली आणि पहाटे पॉल अँथनीला म्हणाला, “मी आता लवकरच मरणार आहे. तुला संत अँथनेशिअस ह्याने दिलेल्या झग्यात मला मरण यावे अशी माझी इच्छा आहे.” अँथनीने ते शब्द ऐकले आणि त्याचा पाय जमीनीवर ठरेना. तो धावतपळत गेला आणि पौलला हवा असलेला तो झगा आणला.परंतु तोपर्यंत पौलचा आत्मा त्याचा निश्चल देह सोडून गेलेला होता. अँथनीला त्याचे शरीर जणू गुडघे टेकून प्रार्थना करीत असलेल्या सचेतन माणसाच्या शरीरासारखे भासले. दोन सिंहानी पौलसाठी खाच खणली. तो वयाच्या ११३ व्या वर्षी मरण पावला. त्याला विणकाम करणान्याचा आश्रयदाता म्हणून गौरविले आहे..
यहुदी समाजात त्यावेळी जकातदारांविषयी चांगले मत नव्हते. लुबाडणारा व पापी समजल्या जाणाऱ्या लेवी जकातदाराला प्रभू येशूने पाचारण केले. प्रथमतः लेवी गोंधळला असेल मात्र येशूच्या कृपेचे साहाय्य मिळताच त्याने येशूला बोलावून मित्रांसोबत मेजवानी दिली. देवाचे पाचारण कोणाही माणसाला होऊ शकते, कारण देवाच्या योजना माणसांच्या योजनेपेक्षा निराळ्या असतात. देव त्याच्या देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी माणसांचा वापर त्याच्या इच्छेप्रमाणे करीत असतो. आज तोच प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला बोलावित आहे. आपले जीवन कितीही प्रकारच्या पापांनी कलंकित असले तरी प्रभू करुणायुक्त नजरेने आपल्याकडे पाहत असतो. प्रभू येशू आपल्याला पूर्ण ओळखतो, आज तोच प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला पाचारण करीत आहे. आपले जीवन कितीही कलंकित असले व समाजाने धिक्कारलेले असले तरीही प्रभू येशू आपल्याकडे करुणायुक्त नजरेने पाहत आहे. प्रभू येशू आपल्याला पूर्ण ओळखतो. आपल्या जीवनात तो अमुलाग्र परिवर्तन घडवू इच्छितो. आपण त्याला प्रतिसाद देऊया.
शुभवर्तमान मार्क २:१३-१७
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी नीतिमानांस नव्हे तर पापी जनांस बोलवावयास आलो आहे."
येशू तेथून निघून समुद्रकिनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला, तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला तेव्हा त्याने त्यालाम्हटले, “माझ्यामागे ये," तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.
नंतर तो त्याच्या घरी जेवावयास बसला. तेथे बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीत बसले. तेव्हा त्याला जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून परुश्यांतील शास्त्री ह्यांनी त्याच्या शिष्यांना म्हटले, “हा जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?" हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलवावयास आलो आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️
0 टिप्पण्या