Marathi Bible Reading | Monday 7th February 2022 | 5th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पाचवा सप्ताह 

सोमवार 

 दि. ७ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  “आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. "





संत गोन्सालो गार्सिया आणि त्याचे सहकारी 
-  रक्तसाक्षी (१५५६-१५९७)

✝️

आपल्या सहकाऱ्यांना पौलाने, सकारात्मकतेने मार्गदर्शन केले  म्हणूनच सर्वजण प्रभूच्या सुवार्ता प्रचारात आणि सेवाकार्यात तत्पर राहिले. त्या  सर्वांनी विश्वासात दृढराहून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ख्रिस्ताची सहभागिता  अनुभवली.
 प्रभू येशू आपल्या शिष्यांना सुवार्ता प्रचारासाठी  पाठवित असताना संभाव्य परिस्थितीला कसे सामोरे जायचे ह्याचे मार्गदर्शन  करीत आहे. सुवार्ता पसरविणे सहज सोपे नाही तर त्यासाठी विरोधाला सामोरे छळ सोसावा लागतो, न्यायालयासमोर उभे रहावे लागते व प्रसंगी  शिक्षा भोगावी लागते. अशावेळी   सर्वस्वी पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करीलअसे आश्वासन देत आहे.  प्रभू म्हणत आहे 'जो शेवटपर्यंत टिकेलतोच जगेल.'शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहण्यासाठी प्रभू आपल्याला सामर्थ्य व कृपा  बहालकरीत आहे. आपली तयारी आहे का ?
ख्रिस्तसभा आज वसईचा सुपुत्र संत गोन्सालो गार्सियाचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. ख्रिस्ताची व सुवार्तेची साक्ष देताना नागासकी येथे संत गोन्सालो ह्यांना क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले संत गोन्सालो व सहकाऱ्यांनी धैर्याने सुवार्ता पसरविली. त्यांना आपण आज वंदन करु या. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी | कृपा मिळावी म्हणून मध्यस्थी मागू या.



✝️   

पहिले वाचन २ करिंथ. ६ : ४-१०
वाचक :पौलचे करिंथकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“आम्ही मरणोन्मुख असे मानलेले आहोत तरी पाहा, आम्ही जिवंत आहो."
सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, दंगाधोप्यात, काबाडकष्टात, जागरणात, उपवासात तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी, गौरवाने आणि अपमानाने, अपकीर्तीने आणि सत्कीर्तीने, आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे, अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानलेले तरी पाहा आम्ही जिवंत आहो. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जिवे मारलेले नाही. दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, नि मानलेले तरी पुष्कना सचन करणारे, काफल्लक असे मानलेले सवपत्र, अशो आम्ही आपली पात्रता पटवून देतो.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३०:२-४,११-१२
प्रतिसाद :  मी सर्वकाळ तुझें उपकारस्मरण करीन.

१)हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धांवा केला 
आणि तू मला रोगमुक्त केलें.
 हे परमेश्वरा, तूं माझा जीव अधोलोकांतून वर काढिला; 
गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखिलें

२ अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; 
आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण 
करितांना त्याचा धन्यवाद करा.
त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो. 
त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; 
रात्री विलापाने बिहाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनि होतो.

३ मी तर आपल्या संपत्काली म्हटले, 
मी कधी ढळणार नाही.
 तूं माझा विलाप दूर करून मला 
नाचावयास लाविले आहे;
तूं माझें गोणताट काढून मला
 हर्षरूपि वस्त्र नेसविलें आहे;

४) ह्यासाठी की माझ्या आत्म्याने 
तुझें गुणगान गावें, गप्प राहू नये
हे परमेश्वरा, माझ्या देवा, 
मी सर्वकाळ तुझें उपकारस्मरण करीन.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो
तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १० :१७-२२

वाचक :मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल." 

माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानांत तुम्हांला फटके मारतील, आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यांत येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करितील तेव्हां कसें अथवा काय बोलावें ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावें हे त्याच घटकेस तुम्हांस सुचविलें जाईल.  कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायीं बोलणारा आहे. भाऊ भावाला व बाप मुलाला जिवें सारण्यासाठी धरून देईल, 'मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील; आणि माझ्या नांवामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील; तथापि जो शेवट पर्यंत टिकेल तोच तरेल.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:आज भारतीय ख्रिस्तसभेसाठी मानाचा दिवस. भारतातील पहिला रक्तसाक्षी होण्याचा बहुमान वसईत जन्मास आलेल्या संत गोन्सालो गार्सिया ह्या तरूण मठवासियाचा. त्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भारतभूमी. त्या महान रक्तसाक्षीची पुण्यस्मृती साजरी करत आहोत. पुष्कळ पीक देण्यासाठी गव्हाच्या दाण्याला मरावे लागते. हा महानमंत्र येशूने आपल्या जीवनाविषयी करून दिला आहे. स्वतःच्या त्यागातच इतरांचे जीवन प्रफुल्लीत होत असते. जगातील लोकांच्या सेवेसाठी जो आपल्या सर्वस्वाचा त्याग करतो तो चिरकाळ जगतो. चारशे वर्षानंतर सुद्धा आपण संत गोन्सालो गार्सियाची आठवण करत आहोत. ही ख्रिस्ताच्या वचनाची परिपक्वता आहे. गोन्सालो हा नम्र, प्रेमळ, धाडसी व प्रभूवर प्रेम करणारा होता. ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण करणारा होता. ख्रिस्तासाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करू शकतो का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास आम्ही पात्र बनावेत म्हणून तुझ्या 
धैर्याचा आत्मा आम्हाला दे, आमेन..


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या