शनिवार २ एप्रिल २०२२
(उपवासकाळ ४था सप्ताह )
माहिती करून घेतल्या वाचून आपले नियम शास्त्र कोणाचा न्याय करत नाही. "
पावलाचे संत फ्रान्सिस
-वर्तनसाक्षी (२४१६-१५०७)
✝️
यिर्मयाची स्पष्टता लोकांना पटली नाही तेव्हा लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला जीवे मारण्याचा कट केला.परंतु परमेश्वराचे सामर्थ्य महान असून त्याची न्यायपरायणता व सत्यता माणसांच्या आकलना पलिकडची आहे. देवाने त्याला सुरक्षीत ठेवले.
प्रभू येशूने सुद्धा स्पष्टपणे तो तारणारा व देवाचा पुत्र असल्याची साक्ष| दिली, 'जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंतपणाच्या नद्या वाहतील.' ह्या विधानावरून येशूविषयी शास्त्री परुशी व मजूरवर्गामध्ये गोंधळ निर्माण झाला. धर्माचे रक्षक म्हणवून घेणाऱ्यांनी येशूला न्यायसभेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. लोकांनी येशूवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी घोषित केले. मात्र लोकांनी म्हटले, 'कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. सामान्य माणसांनी येशूवर विश्वास ठेवला. प्रेम, दया, क्षमा, आत्मत्याग व सेवा ह्या दैवी मुल्यावर उभारलेली येशूची शिकवण आपण सुद्धा स्वीकीरली आहे.
पहिले वाचन यिर्मया ११:१८ -२०
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन ११:१८-२०
“मी तर कत्तलखान्याकडे निमूटपणे नेल्या जाणाऱ्या कोकरासारखा वागत होतो."
माझे शत्रू माझ्याविरुद्ध कट रचत आहेत याची प्रभूने मला सूचना दिली. मी तर कत्तलखान्याकडे निमूटपणे नेल्या जाणाऱ्या कोकरासारखा वागत होतो. माझ्याविरुद्ध कटकारस्थाने माझ्या शत्रूंनी रचली आहेत याची मला कल्पना नव्हती. ते म्हणत असावेत, “ झाड हिरवेगार आहे तोच त्याला तोडले पाहिजे, यिर्मयाचा काटा एकदा काढून टाकला की, मग कोणी त्याची आठवणही काढणार नाही! "
तेव्हा मी विनवणी केली, "हे सेनाधीश प्रभो, तूच खरा न्याय देतोस; कारण तुला मनातील भावना व विचार कळतात. माझी फिर्याद मी तुझ्यापुढे मांडतो, तू माझ्या शत्रूचा सूड उगव आणि तो उगवताना मला तो पाहू दे. "
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७: २-३९-१२
प्रतिसाद : प्रभो, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
१) हे प्रभो, माझ्या देवा, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
माझा पाठलाग करणाऱ्या सर्वांपासून माझी सुटका कर,
नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील
आणि कुणी मला सोडवू शकणार नाही
अशा ठिकाणी नेऊन माझ्या चिंधड्या उडवतील.
२) हे प्रभो, मानवजातीचा न्यायनिवाडा करणाऱ्या देवा,
माझ्या बाजूने न्याय दे; कारण मी सात्त्विक व सरळआहे.
दुष्टांची दुष्टाई नष्ट होवो | सात्त्विकाला स्थैर्य दे
विचार व भावना पारखणारा तू न्यायपरायण देव आहेस!
३) देव माझा संरक्षक बाल आहे.
सरळ मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.
देव निःस्पृह न्यायाधीश आहे,
तो मंदक्रोध आहे; दुष्टांचे तो नेहमीच पारिपत्य करतो.
जयघोष
मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन,
"बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."
शुभवर्तमान योहान ७:४०-५२
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त गालिलातून येतो काय ?"
लोकसमुदायातील कित्येक जण येशूचे शब्द ऐकून म्हणत होते, "हा खरोखर तो संदेष्टा आहे." कित्येक म्हणाले, "हा ख्रिस्त आहे." पण दुसरे कित्येक म्हणाले, "ख्रिस्त गालिलातून येतो का? दावीदच्या वंशाचा व ज्या वेथलेहेमात दावीद होता त्या गावातून ख्रिस्त येणार असे शास्त्रात सांगितले नाही का ?" ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली. त्यांच्यातील कित्येकजण त्याला धरावयास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही. मग मुख्य याजक व परुशी ह्याच्याकडे कामदार आले. त्यांना ते म्हणाले, “तुम्ही याला का आणले नाही ?" कामदारांनी उत्तर दिले, "कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही!" त्यावरून परुशी त्यांना म्हणाले, "तुम्हीही फसला आहा का ? अधिकाऱ्यांपैकी किंवा परुश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे." त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता तो त्यांना म्हणाला, "एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते का?" त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालिलातले आहा का? शोध करून पाहा, की गालिलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की, लोकसमुदाय जरी येशूवर विश्वास ठेवायला तयार होता तरी मुख्य याजक आणि परूशी हे त्याचे ऐकायला तयार नव्हते. येशू हा गालिलातून आहे आणि गालिलातून कोणी संदेष्टा येत नाही हा त्यांचा पूर्वग्रह आणि चुकीची प्रवृत्ती तशीच होती. ते बदल करण्यास तयार नव्हते. आज आपल्या जीवनात डोकावून पाहू या, की माझ्यामध्ये इतरांविषयी असे काही पूर्वग्रह, प्रवृत्ती आहेत का? इतरांविषयी वाईट बोलणे, त्यांच्या खोड्या काढणे. हा नकारार्थी दृष्टीकोन आपल्या स्वतःच्या |जीवनातील नकारात्मक भावना दाखवत असतो. संपूर्ण सत्य जाणून घेतल्याविना बंधुजनांना बदनाम करणे हे बंधुप्रीतीच्या आज्ञेविरुद्ध वर्तन ठरते. त्याऐवजी मोठ्या मनाने इतरांचे वागणे पाहून चांगली भावना मनात ठेवू या. निकम याने याच भावनेमुळे ख्रिस्ताचा मोठेपणा समजून घेतला. त्यापायी धार्मिक नेत्यांकडून निर्भत्सना सहन केली. निकदेम या सत्शील माणसाप्रमाणे आपले मन निर्भय व्हावे यासाठी कृपा मागू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच आमचा स्वामी व तारणारा आहेस, ह्यावर आमची श्रद्धा आहे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या