Marathi Bible Reading | Saturday 25th June 2022|12th week in Ordinary Time

सामान्यकाळातील १२वा  सप्ताह 

शनिवार २५ जुन २०२२

तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय 



(मरीयेच्या  अति पवित्र व निष्कलंक हृदयाचा सोहळा)

 मरियेला बलपणापासून पवित्रतेचे बाळकडू पाजले गेले, तिची आई आन्ना व वडील ज्योकिम हे पवित्र, देवभिरु, नीतिमान व प्रार्थनामय जीवन जगत होते. त्यामूळे देवाची इच्छा होती की मरियेचा जन्म अशा कुटुंबातच व्हावा. लहानपणापासून बरेच आनंद व दुःख तिने अनुभवले आहेत. देवदूताच्या संदेशाने तिले मिळालेला आनंद काही वेगळाच होता. तिने देवदूताला देवपुत्राची आई होण्यास हो म्हटले त्या क्षणापासून तिच्या जीवनात दुःख सुरु झाले, पण तिच्या हृदयात - अंत:करणात एक वेगळाच आनंद ती अनुभवत होती. मरिया वयाप्रमाणे परिपक्व झालेली होती. बुद्धीने, शरीराने व मनाने स्वतंत्रतेने निर्णय  घेऊ शकत होती. त्यामुळे परमेश्वराने दिलेला तो निर्णय तिने मान्य केला. परमेश्वराचा निरोप आनंदाने स्वीकारला. हा सर्वात मोठा आनंद तर होता पण  फार मोठी वैचारिक जबाबदारी होती. कारण जरी देवदूत तिच्या पासून निघून गेला तरी सर्वांत श्रेष्ठ जो शब्द तो देहरूपाने तिच्या कुशीमध्ये साकारत होता, जो तिच्या हृदयात रुतला होता, रुजला होता तो या अवनीवर अवतरण्यापासून  थेट कालवारीपर्यंत तिला वाहायचा होता.
 येशूने मानवाचे पाप वाहिले आणि पवित्र मरियेने देवाचा शब्द वाहिला.  जी धरती माता ह्या देवपुत्राला तीन दिवस सामावू शकली नाही, मात्र परात्पराचा पुत्र तिने नऊ महिने तिच्या उदरात सांभाळला. पोप जॉन पॉल ह्यांनी मरीयेच्या उदराला साक्रामेंताच्या पेटीची उपमा दिली आहे.

पवित्र मरियेसारखे पवित्र, प्रार्थनामय व सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून तिच्या चरणाशी एकत्र येऊ या. तिच्या निष्कलंक हृदयातून सर्वांसाठी कृपेचा व प्रेमाचा झरा वाहत आहे.

 
✝️   
पहिले वाचन :  यशया ६१ : ९-११ 
वाचक :  यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल, परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांस पाहणारे कल करतील. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. कारण जसा वर शेलापागोटे परिधान करून स्वतः ला याजकासराखा मंडित करतो आणि वधू जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता आणि कीतो अंकुरित करील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १३९:१-३,१३-१५
प्रतिसाद :  हे परमेश्वरा,मी तुझें उपकारस्मरण करितों;

१) हे परमेश्वरा, तूं मला पारखिलें आहे, तू मला ओळखितोस.
 माझे बसणें व उठणें तूं जाणतोस, तूं दुरून माझे मनोगत समजतोस.
 तूं माझें चालणें व माझें निजणें बारकाईने
पाहतोस. आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.
 तूंच माझें अंतर्याम निर्माण केलें ; 
तूंच माझ्या आईच्या उदरीं माझी घडण केली.

२) भयप्रद व अद्भुत रीतीनें माझी घडण झाली आहे,
म्हणून मी तुझें उपकारस्मरण करितों; 
तुझीं कृत्यें अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.

३) मी गुप्त स्थळीं निर्माण होत असतां आणि पृथ्वीच्या अधोभागीं विलक्षण प्रकारें माझी घडण होत असतां माझी आकृति तुला गुप्त नव्हती.



जयघोष
आलेलुया, आलेलुया! 
ज्या आईने या देवाचा सर्व गोष्टी आपल्या हृदयात ठेवून चिंतन केले ती धन्य.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक  २:४९-५२
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास यस्शलेमास जात असत, तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यस्थलेमात मागे राहिला हे त्याच्या आईवडिलांस कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते एक दिवसाची बाटे चालून गेले. नंतर नातलग आणि ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध करत करत यरुशलेमास परत गेले. तीन दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनामध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना आणि त्यांना पुरुन करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्वत्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास ? पाहा तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलता से त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेथास गेला आणि त्यांच्या आजेत राहित्य त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मन ठेवल्या, येशू मानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या मर्जीत वाढत गेला."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आज आपण 'पवित्र मरियेच्या निष्कलंक दयाचा सण साजरा करतो. पवित्र मरियेचे पवित्र दय आपल्याला अनुकरण करण्यासाठी दिले ले आहे. जेणेकरून आपलेही हृदय येशूसारखे याळू असावे आणि आपण शुद्ध अंतःकरणाने शूवर प्रेम कसे केले पाहिजे याचे एक उदाहरण इणून देऊळ मातेने आपल्याला पवित्र मरियेचे ष्कलंक हृदय दिले आहे. असे हृदय पूर्णपणे वाच्या इच्छेचे पालन करते. आजच्या शुभवर्तमानात मरियेचे चिंतनशील हृदय आपल्यासाठी सादर केले आहे. मरियेने येशूच्या जीवनातील सर्व घटना तिच्या अंतःकरणात ठेवल्या. जेव्हा मेंढपाळ तिच्या नवजात बाळाला भेट देतात तेव्हा तिने ती गोष्ट तिच्या अंतःकरणात ठेवली. जेव्हा येशू हरवला आणि तिला मंदिरात सापडला तेव्हा ती गोष्ट तिने आपल्या अंतःकरणात ठेवली. येशूला कुसावर खिळलेले पाहून तिला किती वेदना झाल्या असतील ह्या सर्व गोष्टी तिने आपल्या अंतःकरणात व मनात ठेवल्या. आमची धन्य आई ही एक व्यवहारी स्त्री होती. तिने आयुष्यात अडचणींचा सामना केला तरीही ती नेहमी देवाशी एकनिष्ठ राहिली. या विश्वासू, आज्ञाधारक, निष्कलंक व निर्मळ आईच्या हृदयाचे अनुकरण करण्यासाठी आज आपल्याला पाचारण केले आहे.

प्रार्थना :हे पवित्र देवमाते, आम्हां पाप्यांसाठी तुझी प्रिय पुत्राकडे विनंती कर,  आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या