Marathi Bible Reading | Wednesday 12th October 2022 | 28th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २८ वा सप्ताह  

बुधवार १२ ऑक्टोबर २०२२

"तुम्हां परुश्यांची केवढी दुर्दशा होणार." 

धन्यवादित कार्लो आकुटीस 


संत पौल आपल्याला देहाची कर्मे त्यागून पवित्र आत्म्याची फळे ह्या विषयी बोध करीत असताना म्हणत आहे, “आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावे" पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व प्रेरणेने जीवनात प्रीति, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासुपणा व इंद्रियदमन ही फळे अनुभवण्यास मिळतात.

शुभवर्तमानात प्रभू येशू आज अन्यायी व ढोंगी शास्त्री - परुश्यांचा I निषेध करीत म्हणत आहे,  आपण आपल्या जीवनावर चिंतन करू या की खरोखरच आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने व येशूच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो का ? शास्त्री व परुशी आपल्यामध्ये कुठे दडलेला आहे का ते शोधून काढू या. आपण इतरांच्या जीवनात अडथळा तर निर्माण करीत नाही ना ? आपण खूप धार्मिक व नीतिमान असल्याचा देखावा करतो का ? 

✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  ५:१८-२५ 

वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

" जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार आणि वासना ह्यांच्यासह आपला देहस्वभाव क्रुसावर खिळला आहे."

तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहा तर मग तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती हीः जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपुजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा इत्यादी. ह्याविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता परत सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आंनद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार आणि वासना ह्यांच्यासह आपला देहस्वभाव क्रुसावर खिळला आहे.
आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र  १:१-४,६
प्रतिसाद :   प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही,
 पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही 
आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, 
तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो,
 त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. 

२) जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. 
जे आपल्याला हंगामी फळ देते.
 ज्याची पाने कोमेजत नाहीत. अशा झाडासारखा तो आहे 
आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.

३) दुर्जन तसे नाहीत, 
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. 
कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, 
पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
प्रभू आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. 
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ११:४२-४६
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार !"

येशू परुश्यांना म्हणाला, “तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार आहे कारण तुम्ही पुदिना, सताप, आणि प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय आणि देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करता. ह्या गोष्टी करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार आहे कारण सभास्थानात श्रेष्ठ आसने आणि बाजारात नमस्कार घेणे तुम्हांला आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार आहे कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरीसारखे न समजता चालतात." वे आहा, त्यांच्यावरून माणसे

तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणाएकाने त्याला म्हटले, "गुरुजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.” तो म्हणाला, “तुम्हां शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार आहे कारण वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्याला लावत नाही.”

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : देवाने आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे अनेक दाने बहाल केली आहेत. अनेकदा आपण त्याचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. आपण दुसऱ्यांचे कष्ट, दुःख, कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी देवाची इच्छा आहे. परंतु आपण स्वतःच्याच जीवनात एवढे गुंतून जातो की, आपल्याला इतरांच्या जीवनाचा विसर पडतो. आपले पाचारण, मिळालेले अधिकार, ज्ञान, कलागुण हे देवाने आपल्याला दिलेले महान वरदान आहे, हे आपण विसरतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपण दुसऱ्यांचे कष्ट, दुःख कमी | करण्यासाठी प्रयत्न न करता त्यात अधिक भर घालतो. जसे शास्त्री-परूशी ह्यांच्या सारखे आपण देखील इतरांना कमी लेखून त्यांना कष्ट, दुःख देतो. आपले जीवन देवाची सर्वोत्कृष्ट देणगी आहे. त्याचा योग्य वापर करून दुसऱ्याचे जीवन मी कसे आनंदाने भरणार? माझ्यातील वाईट सवयी कमी करण्यासाठी आज पासून मी काय प्रयत्न करणार? ह्यावर व आपल्या जीवनावर मनन चिंतन करण्यासाठी थोडा वेळ प्रभू सहवासात निवांत पणे व एकाग्रतेने घालवून आपले जीवन परिवर्तन करण्याचा निश्चय करू या.

प्रार्थना : हे पवित्र आत्म्या, आमच्या प्रेरणा व सांत्वनकर्त्या ये आणि आम्हाला 
तुझ्या कृपा वर्षावाने भरून टाक, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या