Marathi Bible Reading | Wednesday 5th October 2022 | 27th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २७ वा सप्ताह  

बुधवार  ५ ऑक्टोबर २०२२

“हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.



 
 (संत फॉस्तीना)
• वर्तनसाक्षी 

” प्रभू येशूने आपल्या शिष्यांना शिकवलेली परमेश्वर पित्याची प्रार्थना  आजच्या शुभवर्तमानात दिली आहे. परमेश्वर आपल्या सर्वांचा पिता आहे, तोच  आपला निर्माणकर्ता आहे आणि तोच सांभाळकर्ता आहे. परमेश्वर पिता दयाळू व  कनवाळू आहे. त्या परमेश्वर पित्याकडे प्रभू येशू प्रार्थना करावयास सांगत आहे.

 प्रभू येशूने शिकवलेली ही प्रार्थना म्हणजे पित्याचा गौरव, त्याला धन्यवाद तसेच पश्चाताप, मध्यस्थी व विनंती ह्या सर्वांचा मिलाप आहे. 

प्रार्थनेला आपल्या जीवनात अग्रस्थान असावे म्हणूनच प्रभू येशूने ही प्रार्थना उदाहरणादाखल आपल्याला दिली आहे. प्रभू येशूच्या जीवनातसुद्धा प्रार्थनेला अग्रस्थान होते. त्याची प्रत्येक कृती प्रार्थनेच्या बळावरच आधारलेली असायची. अनेकदा चमत्कार करण्यापूर्वी प्रभू येशूने आपल्या पित्याबरोबर संवाद साधल्याचे शुभवर्तमानात आढळते. पित्याची ही प्रार्थना आपल्या सर्वांना प्रेरणा, शक्ती, बळ, धैर्य | व आशीर्वाद देणारी बनावी म्हणून चिंतन करू या.
आज ख्रिस्त सभा संत सिस्टर फॉस्तीना सण  साजरा करीत आहे तिच्या मध्यस्थीद्वारे प्रभू येशूकडे दया याचना करू या व आपल्या पापाची क्षमा  मागू या. 
 

✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  २:१-२,७-१४
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"देवाने मला दिलेले कृपादान परराष्ट्रीयांनी ओळखले. "

चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा येरुशलेमला गेलो, मी आपल्याबरोबर तीतलाही घेतलेले होते. मल प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयात घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली, (परंतु जे प्रतिष्ठीत होते त्यांना एकान्ती केली,) नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. तर उलट, जसे सुंता झालेल्या लोकांना सांगण्याचे काम पेत्रकडे सोपवले आहे, तसे सुंता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे असे त्यांनी पाहिले (कारण ज्याने पेत्राला सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली) आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा आणि योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर आणि बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. आपण देवाच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शवावे आणि आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे, मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो. पुढे केफा अंत्युखियाला आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडील कित्येकजण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीला बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनीही ढोंग केले, ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वासमक्ष मी केफाला म्हटले, "तू यहुदी असताही परराष्ट्रीयासारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे ?”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११७:१,३
प्रतिसाद   सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.

१) अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, 
अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा.

२) त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे 
आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास 
आणि ते मनापासून पाळल्यास मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ११:१-४
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"प्रभो, आम्हांला प्रार्थना करायला शिकवा. "

येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता, ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, "प्रभो, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणाः 'हे पित्या,
तुझे नाम पवित्र मानले जावो.
तुझे राज्य येवो.
आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे
आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर,
कारण आम्हीही आपल्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.'
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन : प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी साधलेला संवाद होय. परमेश्वराशी साधलेला प्रत्येक संवाद म्हणजे प्रार्थना होय. प्रार्थना हा दोन्ही बाजूचा संवाद आहे. हा संवाद असा नव्हे की ज्यात परमेश्वर ऐकतो व आपण बोलतो. तर ह्यात परमेश्वर ऐकतो व त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो. येशूने शिकविलेली सर्वोत्कृष्ट प्रार्थना म्हणजे आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना. ही प्रार्थना परमेश्वराच्या मुलांसाठी आहे. ही प्रार्थना स्तुती, पश्चात्ताप व विनवणीची प्रार्थना आहे. ही प्रार्थना समजून घेतल्यास, ज्या परमेश्वराने आपल्याला ही प्रार्थना दिली त्यालाही आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येते. परमेश्वर आणि मानव यांच्यातील परस्पर प्रेमाची घोषणा म्हणजे ही प्रार्थना. ह्या छोट्याशा व अगदी सोप्या प्रार्थनेत बरेच काही सांगितले गेले आहे. म्हणूनच यापुढेही प्रार्थना म्हणताना फक्त शब्द उच्चारण्याऐवजी त्यातील शब्दांचा खोल अर्थ जाणण्याचा व समजण्याचा प्रयत्न करू या.

प्रार्थना :  प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय पित्या .... ही प्रार्थना सावकाश व चिंतन करून करावी, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या