पवित्र मरियेच्या स्तुतिस्तोत्रामध्ये एकूण तीन भाग आहेतः १) स्तुतीसाठी आवाहन, २) देवाची स्तुती करण्याची कारणे, ३) समारोप. |मरियेच्या मनातील भावना, कृतज्ञता व आनंद ह्या |स्तोत्रामध्ये व्यक्त झालेला आहे. त्यामुळे ह्या स्तोत्राला अतिमहान मरियेचे स्तोत्र असे म्हणणे उचित ठरेल. कारण ती स्वतःला प्रभूची दासी म्हणविते आणि परमेश्वराने ह्या दासीच्या दैन्यावस्थेकडे पाहिले आहे असे स्पष्ट करते. भौतिकदृष्ट्या गरीब असलेले लोकांमध्ये कालांतराने अभागी, दुर्दैवी, आजारी, अपंग, विधवा, अनाथ, दलित इत्यादी समावेश केला गेला. आपल्या ह्या हीन अवस्थेमुळे त्यांना परमेश्वराच्या सहाय्याची गरज भासते. लूकने पवित्र मरियेच्या स्तोत्रामध्ये जुना करार आणि नवा करार ह्यांच्यामधील ऐक्य आणि भेद उठावदारपणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आब्राहाम आणि त्याच्या संतानावरील दया सर्वकाळ स्मरून परमेश्वराने त्यांना दिलेले अभिवचन आता नव्या करारात पूर्णत्वास नेण्याची वेळ जवळ येऊन पोहोचली आहे. मात्र ही परिपूर्ती
पहिले वाचन शमुवेल १:२४-२८
वाचक : शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन.
"शमुवेलच्या जन्माबद्दलचा हन्ना आभार मानते."
शमुवेलचे दूध तुटल्यानंतर हन्नाने त्याला बरोबर घेतले आणि तीन वर्षांचा एक गोन्हऱ्हा, एक एफाभर सपीठ आणि द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन ती शिलोस, परमेश्वराच्या मंदिरात आपल्या छोट्या बाळासह आली. त्यांनी गोऱ्हा बळी दिला आणि बाळाला एलीकडे आणले. मग हत्रा त्याला म्हणाली, “महाराज अगदी तुमच्या गळ्याशपथ सांगते. येथे तुमच्याजवळ उभी राहून परमेश्वराची याचना करणारी स्त्री, ती मीच. महाराज, ह्या बाळासाठी मी याचना केली होती. मी मागितले होते ते परमेश्वराने मला दिले आहे. म्हणूनच मीदेखील ते परमेश्वराला देत आहे. त्याचे सारे आयुष्य परमेश्वराला वाहते." मग त्यांनी तेथे परमेश्वराची उपासना केली.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १शमु. २:१,४-८
प्रतिसाद : माझे मन आनंदाने बहरले आहे.
१) माझे मन आनंदाने बहरले आहे
परमेश्वराने माझे नाक वर केले आहे
माझे मुख शत्रूंचा धिक्कार करत आहे,
तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.
२)धनुर्धारी वीरांची मती कुंठित झाली आहे.
धडपडणाऱ्यांनी सामर्थ्ययुक्त होऊन कंबरा बांधल्या आहेत,
जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यासाठी मोलमजुरी करत आहेत.
जे भुकेले असत ते तृप्त झाले आहेत.
वंध्येने सातांना जन्म दिला आहे.
पण बहुपुत्रवती झुरणीस लागली आहे.
३) परमेश्वर प्राणहरण करतो. तोच जीवदानही देतो. तो अधोलोकी पाठवतो आणि वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो तसाच साधनही करतो. तो खाली ओढतो तसाच वरही उचलतो.
४) तो दलितांना धुळीतून उठवतो गरिबांना उकिरड्यावरून उचलतो. त्यांना अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. त्यांना मानाच्या स्थानावर बसवतो पृथ्वीच्या आधारस्तंभ परमेश्वराचे आहेत.
त्याच्यावर त्याने जग उभारले आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तू सर्व राजांचा राजा आणि देवमंदिराच्या कोनशिलेचा दगड आहेस. तूच पृथ्वीवरील मातीपासून मनुष्याला बनवले आहेस. त्यालाच आता येऊन वाचवण्याची कृपा कर
शुभवर्तमान लूक १:४६-५६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत."
मरिया म्हणाली : “माझा जीव प्रभूला धन्यवाद देतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याने आपल्या दासीचा गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे.
जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची दाणादाण केली आहे. त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनांना उंचावले आहे.
त्याने भुकेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावू दिले आहे. आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे आब्राहाम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्त्रायल ह्याला साहाय्य केले आहे."
नंतर मरिया सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या पहिल्या वाचनात हन्ना तिच्या मुलाला परमेश्वराला समर्पित करते कारण ती म्हातारी आणि निःसंतान असतानासुद्धा परमेश्वराच्या कृपासामर्थ्याने शमुवेल संदेष्ट्याची आई होण्याचे सौभाग्य तिला लाभले. अतिउत्साहीत होऊन ती स्तोत्रात (१शमुवेल | २:१-१०) देवाचा महिमा गाते. तिच्या स्तोत्राची | संक्षिप्त पुनरावृत्ती मरिया आजच्या शुभवर्तमानात सादर करते. हे स्तोत्र गोरगरिबांचे स्तोत्र म्हणून ओळखले जाते. ते पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहतात. या स्तोत्रात मरिया स्वतःला परमेश्वराची "दासी" म्हणून संबोधते कारण ती गोरगरिबांची प्रतिनिधी आहे. त्याचबरोबर मरियेला जाणीव आहे की, यापुढे सर्व पिढ्या तिला धन्य म्हणतील कारण परमेश्वराने तिच्या करता महत्कृत्ये केली आहेत. ती इतिहासात परमेश्वराने केलेल्या महत्कृत्यांची यादी देऊन, परमेश्वर आपल्या | अभिवचनाचा पक्का आहे हे अधोरेखित करते. पुढे ती आपल्याला आश्वासन देऊन म्हणते की, परमेश्वर त्याच्या अभिवचनानुसार मसिहा पाठवणार आहे. मरिया संपूर्ण इस्रायलच्या आध्यात्मिकतेची मूर्तिमंत प्रतिनिधी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला परमेश्वराच्या अभिवचनांची जाणीव आणि दयेची अनुभूती आली आहे काय ?
प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या तारणादायी योजनेत सहभागी होऊन, तुझी सुवार्ता। घोषविण्यास आम्हांला धैर्य व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या