प्रभूच्या स्नानसंस्काराचा सण
सोमवार दि.९ जानेवारी २०२३
शुभवर्तमान मत्तय ३:१३-१७
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बाप्तिस्मा घेतल्यानंतर परमेश्वराचा आत्मा येशूवर उतरला. "
योहानाच्या हातून वाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालिलाहून यार्देनवर आला, परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, "आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे ?” येशूने त्याला उत्तर दिले, “असू दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे हे आपणाला उचित आहे." तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मग बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, "हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे."
✝️

0 टिप्पण्या