हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या सहवासात
सुखाचे व भरभराटीचे जावो .
गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३
नथनेल त्याला म्हाणाला, “गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा! आपण इस्राएलचे राजे आहा ! "
✝️
✝️
शुभवर्तमान योहान १:४३-५१
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलचे राजे आहा. "
येशूने गालिलात जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलीप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये." फिलीप हा तर अंद्रिया व पेत्र ह्याचे नगर बेथसैदा येथला होता. फिलीप नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले तो म्हणजेयोसेफचा मुलगा येशू नाझरेथकर आम्हाला सापडला आहे.” नथनेल त्याला म्हणाला “नाझरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय ?" फिलीप त्याला म्हणाला, “येऊन पाहा." नथनेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही !” नथनेल त्याला म्हणाला, “आपणाला माझी ओळख कोठली ?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलीपने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. " नथनेल त्याला म्हाणाला, “गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा! आपण इस्राएलचे राजे आहा ! " येशू त्याला म्हणाला "मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय ? ह्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.” आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हांला नक्की सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.”
✝️
0 टिप्पण्या