Marathi Bible Reading | Wednesday 6th December 2023 | First Week of Advent

 आगमनकाळातील पहिला सप्ताह 

बुधवार ६  डिसेंबर २०२३

"मला या जनसमुदायाची दया येते. गेले तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत.
 "I have compassion on the crowd because they have been with me now three days and have nothing to eat.
  ✝️ 

बारीचे संत निकोलस
महागुरू, वर्तनसाक्षी (--- ३५०)
✝️

आशिया मायनर येथील मायरा ह्या धर्मप्रांताचे ते महागुरू होते. ख्रिस्मस काळामध्ये सांता क्लॉस किंवा नाताळबाबाची जी परंपरा ख्रिस्तसभेमध्ये सध्या प्रचलित आहे त्याचा संबंध ह्याच संत निकोलसशी आहे.
पवित्र नगरी येरूशलेम येथून तीर्थयात्रेवरून परतत असताना ते मायरा येथे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चमध्ये गेले. योगायोगाने त्या धर्मप्रांताचे महागुरूस्वामी नुकतेच मरण पावले होते आणि स्थानिक धर्मगुरूंनी असे आपसात ठरविले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी देवळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या पुरुषाला नवीन महागुरू म्हणून घोषित करावयाचे. अशा प्रकारे निकोलसच्या गळ्यांत महागुरूपदाची माळ आपोआपच पडली.
डायक्लेशियन सम्राटाच्या काळात ख्रिस्ती लोकांचा जो छळ झाला त्यावेळी संत निकलस ह्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. परंतु ३१३ साली कॉन्स्टन्टाईन राजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला व “यथा राजा तथा प्रजा” म्हणून त्याने ख्रिस्ती धर्म आपल्या संपूर्ण साम्राज्यात पसरावा असेही जाहीर केले. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. कॉन्स्टन्टाईन राजाने सर्व ख्रिस्ती लोकांना खास सवलती जाहीर केल्या व तुरुंगातील कैद्यांना ताबडतोब मुक्त केले. त्यामुळे संत निकोलसचा तुरुंगवास तात्काळ संपला. एक महागुरू ह्या नात्याने त्यांनी लागलीच ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या विश्वपरिषदेमध्ये सहभाग घेतला.
• देवाने संत निकोलस ह्याच्याद्वारे अनेक अद्भुत चमत्कार घडवून आणले. मुलांसाठी असलेले त्याचे प्रेम आणि गोरगरिबांविषयी त्याला वाटणारी काळजी हा पुढे वाक्प्रचार व सुभाषितांचा विषय बनला. गरिबांवर व लहान मुलांवर त्याचे प्रेम होते (त्याचे परोपकारकार्य मात्र गोपनीय होते). कसे ते पुढील घटनेवरून दिसून येते.
एकदा एका कुटुंबातील तीन मुली उपवर झाल्या होत्या; परंतु त्यांच्या लग्नासाठी  बापाजवळ पैसा नव्हता. त्यात हुंड्याचा प्रश्न तर अक्षरश: आ वासून त्या बापासमोर उभा राहिला. पहिल्या मुलीच्या लग्नावेळी वधुपित्याला आपल्या घरात कोणीतरी सोन्या-नाण्यांनी भरलेली थैली टाकल्याचे आढळून आले. त्याने गुपचूप विवाहसमारंभ उरकून घेतला. दुसऱ्या व तिसऱ्या मुलीच्या लग्नावेळीदेखील हीच घटना घडली. मात्र तिसऱ्या लग्नाच्या वेळी हे दयाकृत्य संत निकोलस ह्यांचे होते हे सत्य लपू शकले नाही.
ह्या घटनेवरून मायराचे लोक त्याच्या जन्म दिवसाची स्मृती साजरी करताना आदल्या दिवसाच्या रात्री आपल्या मुलांसाठी घरामध्ये बक्षिसांचा पुडा ठेवून देत आणि सकाळी उठल्यावर मुलांना सांगत की, रात्री संत निकोलस येऊन तुमच्यासाठी 'गिफ्ट' (भेटवस्तू) देऊन गेले. पुढे ही प्रथा नाताळच्या मध्यरात्री म्हणजे प्रभू येशूच्या जन्म दिनाच्या रात्री पाळण्यात येऊ लागली आणि संत निकोलसचे नाव जगभर सांता क्लॉस किंवा ख्रिस्मसबाबा म्हणून प्रसिद्ध झाले.
युरोपमधल्या काही भागात मात्र, उदा. ऑस्ट्रिया सारख्या देशातील कॅथोलिक भागांमध्ये चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना ६ डिसेंबर रोजी खास भेटवस्तू दिली जाते आणि वाईट वागणूक असलेल्या खोडकर मुलांना कोळशाचा तुकडा आणि विजेचे बटण दिले जाते. तुझ्या जीवनातील काळा डाग सद्गुणाच्या प्रकाशाने उजळून काढ असा सल्लाही त्याला दिला जातो.
दक्षिण इटलीतील बारी ह्या ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी संत निकोलस
ह्यांचे अवशेष आणले आणि आजपर्यंत ते तेथे असल्याचे आढळते. त्या अवशेषांमध्ये आजारमुक्तीचे सामर्थ्य आहे. त्याच्या सणाच्या दिवशी संत निकोलस ह्यांची इमाज बोटीद्वारे समुद्रात नेली जाते आणि मिरवणुकीने रात्री विजेच्या झगमगाटात पुन्हा देवळात आणली जाते. हा सोहळा मोठ्या थाटा-माटात आजही साजरा केला जातो.
संत निकोलस हा जहाजचालक आणि प्रवाशांचा आश्रयदाता संत मानला जातो. त्यामुळे तो समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या लोकांमध्ये अधिक लोकप्रिय व प्रसिद्ध आहे. निरपराध आणि चुकलेल्यांचाही संरक्षक आहे. तसाच तो सर्व मुलांचाही आवडता संत आहे. शिवाय तो रशिया, ग्रीस, सिसिली, लॉरेन, लाईम्रीक आणि नेपल्स ह्या देशांचा आश्रयदाता आहे.

  ✝️
पहिले वाच:  यशया  : २५: ६-१०
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"प्रभू सर्वांना त्याच्या मेजवानीसाठी आमंत्रण देतो आणि सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो."

सेनाधीश परमेश्वर ह्या पर्वतावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची आणि राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो या पर्वतावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करील. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकील. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करील, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
त्या समयी ते म्हणतील, “पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास आणि हर्ष करूया." कारण परमेश्वराचा हांत ह्या पर्वतावर राहील.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First ReadingIsaiah 25:6-10a

On this mountain the Lord of hosts will make for all peoples a feast of rich food, a feast of well-aged wine, of rich food full of marrow, of aged wine well refined. And he will swallow up on this mountain the covering that is cast over all peoples, the veil that is spread over all nations. He will swallow up death for ever; and the Lord God will wipe away tears from all faces, and the reproach of his people he will take away from all the earth, for the Lord has spoken. It will be said said on that day, "Behold, this is our God; we have waited for him, that he might save us. This is the Lord; we have waited for him; let us be glad and rejoice in his salvation." For the hand of the Lord will rest on this mountain.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र२४:१-३,५-६
प्रतिसाद :  प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वसती

१) प्रभू माझा मेंढपाळ आहे. 
मला कशाची कमतरता नाही
हिरव्यागार कुरणात तो मला विसावू देतो.

२) मला तो प्रशांत जलाशयाकडे नेतो 
मला तो नवजीवन देतो. 
आपल्या स्वभावानुरूप मला तो सन्मार्ग दाखवतो.

३) माझ्या शत्रूच्या देखत 
तू माझ्यासाठी मेजवानी करतोस. 
तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक केला आहेस 
माझा पेला ओसंडत आहे.

४) खरेच, आयुष्यभर मला सुखाचे 
आणि प्रेमाचे दिवस लाभतील आणि
 प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वसती करीन.


Psalm 23:1-3a, 3b-6 

In the Lord's own house shall I dwell for length of days unending. 

The Lord is my shepherd;
there is nothing I shall want. 
Fresh and green are the pastures 
Near restful waters he leads me;
 he revives my soul. R

He guides me along the right path, 
for the sake of his name. 
Though I should walk in the valley of the shadow of death, 
no evil would I fear, for you are with me.
Your crook and your staff will give me comfort. R

You have prepared a table before me 
in the sight of my foes.
My head you have anointed with oil;
my cup is overflowing. R

Surely goodness and mercy, 
shall follow me
all the days of my life. 
In the Lord's own house shall I dwell 
for length of days unending. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियंता आहे.
परमेश्वर आमचा राजा आहे. तो आम्हांला तारील.
 आलेलुया!

Acclamation: 
Behold, the Lord comes to save his people; blessed are those prepared to meet him.
.

शुभवर्तमान मत्तय १५: २९-३७
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "येशू अनेकांना बरे करतो आणि भाकरींचा चमत्कार करतो."

येशू सोर नि सिदोन भागातून निघून गालील सरोवराच्या बाजूने पुढे डोंगराळ भागात गेला आणि तेथे बसला. तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे लोटल्या. लंगडे, पांगळे, आंधळे, मुके अशा अनेकांना लोकांनी आणून येशूच्या पायांवर घातले. तेव्हा येशूने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, पांगळे बरे झाले, लंगडे चालू लागले आणि आंधळ्यांना दिसू लागले हे पाहून लोक चकित झाले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाला धन्यवाद दिले.मग आपल्या शिष्यांना जवळ बोलावून येशू त्यांना म्हणाला, "मला या जनसमुदायाची दया येते. गेले तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत. त्यांना खायला काही नाही. त्यांना उपाशी परत पाठवायची माझी इच्छा नाही, कारण कदाचित वाटेत ते कासावीस होतील.” “या निर्जन प्रदेशात एवढ्या मोठ्या जमावाला खाऊ घालायला पुरेशा भाकरी आम्हांला कुठून मिळणार ?” शिष्यांनी त्याला विचारले. येशू त्यांना म्हणाला, “किती भाकरी आहेत तुमच्याजवळ ?" “सात आणि थोडे लहान मासे," ते म्हणाले. मग लोकांना जमिनीवर बसायची आज्ञा करून येशूने त्या सात भाकरी आणि मासे घेतले, देवाचे आभार मानून त्यांचे तुकडे केले आणि शिष्यांजवळ ते दिले. शिष्य ते लोकसमुदायाला वाढत गेले. तेव्हा ते सगळे जेवून तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले ते सात पाट्या भरले.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :
Matthew 15:29-37:
 At that time: Jesus went on from Tyre and Sidon and walked beside the Sea of Galilee. And he went up on the mountain and sat down there, And great crowds came to him, bringing with them the lame, the blind, the crippled, the mute, and many others, and they put them at his feet, and he healed them, so that the crowd wondered, when they saw the mute speaking, the crippled healthy, the lame walking, and the blind seeing. And they glorified the God of Israel. Then Jesus called his disciples to him and said, "I have compassion on the crowd because they have been with me now three days and have nothing to eat. And I am unwilling to send them away hungry, lest they faint on the way." And the disciples said to him, "Where are we to get enough bread in such a desolate place to feed so great a crowd?" And Jesus said to them, "How many loaves do you have?" They said, "Seven, and a few small fish." And directing the crowd to sit down on the ground, he took the seven loaves and the fish, and having given thanks he broke them and gave them to the disciples, and the disciples gave them to the crowds. And they all ate and were satisfied. And they took up seven baskets full of the broken pieces left over.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:सुवार्तिक मत्तय उताऱ्यात आपल्यासमोर दोन प्रसंग ठेवीत आहे. १) येशूने अनेकांना रोगमुक्त केले. २) येशूने लोकसमुदायांना भोजन दिले. या दोन्ही प्रसंगामधून लोकांना येशू हवा होता. येशू त्याचे सर्वकाही झाला होता. समाजातीलपुढाऱ्यांनी येशूची उपेक्षा केली. येशूमध्ये देवाला शोधलं नाही. येशू हा एक सुताराचा मुलगा म्हणून त्याचा अव्हेर केला. त्याला नाकारले मात्र सामान्य लोकांनी त्याला (येशूला) सोडले नाही. ईश्वर परिज्ञान, संपन्न लोकांना जे दिसत नाही ते केव्हा केव्हा सामान्य जणांना सहजी दिसते. लोक थव्या थव्याने सतत येशूकडे येतच होते. ते जरी बरे होण्यासाठी येत असले तरी येशूमध्ये त्यांना एक दैवी आकर्षण खुणावत होतं अशा लोकांना पाहून येशूला कळवळा येतो. येशूने आपल्यालाही रोगमुक्त करावे, त्याचे सामर्थ्य आमच्यासाठीही आहे हे त्यांचे (परराष्ट्रीयांचे) म्हणणे येशूने मान्य केलेले असावे. त्यांनी इसरायलच्या देवाला धन्यवाद दिले (वचन ३१) यावरून आपल्याला समजते की, ते यहुदी नव्हते तर परराष्ट्रीय असावे. येशूने आपल्या सहवासात आलेल्यांना निराश केलं नाही तर ते देखील देवाची लेकरे आहेत या भावनेने त्यांना रोगमुक्त केले.

प्रार्थनाहे प्रभू, तुझ्या सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र बनावेत म्हणून आम्हाला तुझा करुणायुक्त स्पर्श कर, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या