Marathi Bible Reading | 4th Week of Easter Wednesday 24th April 2024

पुनरुत्थान चौथा सप्ताह  

बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ 

 जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंध:कारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे 

 I have come into the world as light, so that whoever believes in me may not remain in darkness. 


संत फिदेलिस

रक्तसाक्षी (१५७८-१६२२)

आत्यंतिक गरिबीमध्ये असताना फा. फिदेलिस ह्यांनी आल्प्स पर्वताच्या प्रदेशातून प्रवास केला. आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ते केवळ देवाच्या चांगुलपणावर व उदारतेवर अवलंबून राहात. आपले संरक्षण करण्यासाठी त्यांच्या हाती कुठलेही शस्त्र नव्हते. क्रूस, रोझरी, बायबल, धर्मगुरूंचे प्रार्थना पुस्तक आणि कॅप्युचिन आचारसंहितेचे पुस्तक इतकीच त्यांची मालमत्ता होती. बऱ्याच वेळा ते ख्रिस्तमंदिरात किंवा उघड्या मैदानावर प्रवचने व उपदेश करीत असत. तत्कालीन प्रॉटेस्टंट पंथियांच्या धमक्यांना कुठलीही भीक न घालता अगदी निर्भीडपणे ते व्याख्याने देत असत.
पुष्कळ वेळा अशा उपदेशाव्यतिरिक्त ते नगरातील मोठमोठ्या हुद्यावर असणाऱ्या नागरी अधिकाऱ्यांवर आपलं लक्ष केंद्रित करीत, त्यांना ख्रिस्ती धर्मतत्वे समजावून सांगत. हे करीत असताना कधी कधी त्यांना रात्रीचे १२-१ देखील वाजत. परंतु कुठल्याही तहान-भूकेची तमा न बाळगता केवळ देवराज्याच्या प्रसारासाठी ते जागरण- प्रार्थना करीत. एकदा का एकाद्या मोठ्या अधिकाऱ्यांचे मनपरिवर्तन झाले की, त्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात इतर नागरिकांना ते देवाजवळ आणीत असत.
त्यांचे हे यश प्रॉटेस्टंट पंथातील अधिकारी वर्गाच्या डोळ्यांत न सलते तर नवलच! त्यांनी फा. फिदेलिस ह्यांच्या धार्मिक कार्यात अडथळे आणण्यासाठी राजकीय व्यवस्थेला शिकविण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी -२४ एप्रिल १६२२ रोजी फा. फिदेलीस ह्यांना प्रवचनपीठावरून ओढून खाली काढले. आपल्या कॅथलिक श्रद्धेपासून ते तसूभरही ढळण्यास तयार नव्हते. म्हणून त्यांच्यावर भाले आणि तरवारीचे वार करण्यात आले. त्यातच त्यांचा अंत झाला.
पोप बेनडिक्ट चौदावे ह्यांनी १७४६ साली त्यांना संतपद प्रदान केले. कॅप्युचिन संघातील आणि धर्मप्रसार आयोगातील ते पहिले रक्तसाक्षी मानले जातात.

चिंतन : “कॅथलिक धर्म हा युगायुगाचा धर्म” आहे. - संत फिदेलीस

पहिले वाचन   प्रेषितांचे कृत्ये १२:२४-१३:५
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"बर्णबा आणि शौल ह्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. "

देवाच्या वचनाची वृद्धी आणि प्रसार होत गेला. बर्णबा आणि शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानला बरोबर घेऊन यरुशलेमहून माघारे आले.
अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक कुरेनेकर, जो बालपणापासून हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन आणि शौल हे संदेष्टे आणि शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, "बर्णवा आणि शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा." तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली.
ह्याप्रकारे पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कुप्र येथे गेले. मग ते सलमिनात असता त्यांनी देवाच्या वचनाची यहुद्यांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 12:24-13:5a

In those days: The word of God increased and multiplied. And Barnabas and Saul returned from Jerusalem when they had completed their service, bringing with them John, whose other name was Mark. Now there were in the church at Antioch prophets and teachers, Barnabas, Simeon who was called Niger, Lucius of Cyrene, Manaen a lifelong friend of Herod the tetrarch, and Saul. While they were worshiping the Lord and fasting, the Holy Spirit said, "Set apart for me Barnabas and Saul for the work to which I have called them." Then after fasting and praying they laid their hands on them and sent them off. So, being sent out by the Holy Spirit, they went down to Seleucia, and from they sailed to Cyprus. When they arrived at Salamis, they proclaimed the word of God in the synagogues of the Jews.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ६७:२-३,५-६,८
प्रतिसाद :    हे देवा, राष्ट्रे तुला धन्यवाद देवोत.

१) देवाने आमच्यावर दया करावी, 
आम्हाला आशीर्वाद द्यावा.
 त्याची तेजस्वी मुद्रा आमच्याकडे वळलेली असावी. 
मग साऱ्या विश्वाला तुझी इच्छा कळेल. 
तू देत असलेली मुक्ती सगळ्या राष्ट्रांना दिसेल.

२ )राष्ट्रांना आनंद होवो, ती आनंदाने गावोत.
 कारण तू लोकांना योग्य न्याय देशील. 
भूतलावरील राष्ट्रांना मार्गदर्शन करशील.

३) देवा, राष्ट्रे तुला धन्यवाद देवोत. 
तुलाच सगळी राष्ट्रे धन्यवाद देवोत 
देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. 
पृथ्वीच्या पाठीवरचे सगळेजण त्याचे भय बाळगोत.

Psalm 67:2-3, 5, 6 and 8 (R4)

Let the peoples praise you, O God; 
let all the peoples praise you!

O God, be gracious and bless us 
and let your face shed its light upon us.
 So will your ways be known upon earth 
and all nations learn your salvation. R

 Let the nations be glad and shout for joy, 
with uprightness you rule the peoples;
you guide the nations on earth.

Let the peoples praise you, O God; 
let all the peoples praise you. 
May God still give us his blessing 
that all the ends of the earth 
may revere him. R

जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
प्रभू जो क्रुसावर आमच्याकरिता टांगलेला होता तो थडग्यात उठलेला आहे.
आलेलुया !

Acclamation: 
 I am the light of the world, says the Lord; whoever follows me will have the light of life.


शुभवर्तमान  योहान १२:४४-५०
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“येशू जगात प्रकाश असा आला आहे."

येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंध:कारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे आणि जो माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अव्हेर करतो आणि माझ्या वचनाचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जी वचने मी सांगितली, तीच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करतील. कारण मी आपल्या स्वतःचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. ह्यास्तव जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 12:44-50

At that time: Jesus cried out and said, "Whoever believes in me, believes not in me but in him who sent me. And whoever sees me sees him who sent me. I have come into the world as light, so that whoever believes in me may not remain in darkness. If anyone hears my words and does not keep them, I do not judge him; for I did not come to judge the world but to save the world. The one who rejects me and does not receive my words has a judge; the word that I have spoken will judge him on the last day. For I have not spoken on my own authority, but the Father who sent me has himself given me a commandment-what to say and what to speak. And I know that his commandment is eternal life. What I say, therefore, I say as the Father has told me."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या वाचनातील देवाचे शब्द जीवनातील ऐक्याचे महत्त्व अधोरेखित करतात. आपण श्रद्धा निवेदन करताना विशेषतः नायसियन श्रद्धा प्रकट करताना त्याच्यामध्ये आपण नेहमी बोलत असतो की मी एका पवित्र कॅथलिक प्रेषितीय ख्रिस्तसभेवर विश्वास ठेवतो. 'एक' याचा अर्थ ऐक्य, मी ज्या ख्रिस्तसभेवर श्रद्धा ठेवतो ती ख्रिस्तसभा दुभंगलेली नाही आणि हे सत्य आजच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांमध्ये अगदी ठासून सांगितलेले आहे. आजचे पहिले वाचन ख्रिस्तसभेतील ऐक्याला प्राधान्य देते. प्रेषितांना मिळालेले नवीन खिस्ती श्रद्धावंत मन मानेल तसे वागत नव्हते तर पवित्र आत्म्याला सोबतीला घेऊन प्रेषितांच्या अधिपत्याखाली एकजुटीने व एकनिष्ठेने राहत होते. हे त्यांचे ऐक्य तीन घटकांमध्ये दडलेले होते. त्यात प्रामुख्याने पवित्र आत्मा, प्रेषीत ज्यांच्यामध्ये मुख्य पेत्र आणि नव्याने जन्मलेले नवख्रिस्ती असं हे त्रिकूट प्रभू येशू ख्रिस्ताच्या एका शरीराप्रमाणे जगत होते. देवापासून दिल्या गेलेल्या अधिकाराने ते त्यांचे प्रेषितीय कार्य करीत होते. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आपले परमपित्याशी असलेले अतूट नाते जाहीर करतात. ज्याने प्रभू येशूला जगात पाठविले त्या परमपित्याच्या तंतोतंत इच्छेला संपूर्णतः शरण जातात. ऐक्यातूनच प्रभू येशू मग अधिकारवाणीने बोलतात. परमपिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या आंतरिक ऐक्यामधून निघालेले फळ म्हणजे पवित्र आत्मा. हा पवित्र आत्मा जगामध्ये आणि आपल्या प्रत्येकात नवीन जीवन आणण्याचे अविरत कार्य करीत असतो.

प्रार्थना :-
 हे प्रभू येशू, तू करुणेचा व दयेचा महासागर आहेस. श्रद्धेने खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला आत्मिक बळ दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या