पुनरुत्थान चौथा सप्ताह
गुरुवार दि. २५ एप्रिल २०२४
“सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो श्रध्दा ठेवतो आणि स्नानसंस्कार घेतो त्याचे तारण होईल,
"Go into all the world and proclaim the gospel to the whole creation.
संत मार्क
सुवार्तिक (...६८)
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये वर्णन केलेला योहान मार्क हाच शुभवर्तमानकार संत मार्क असावा असे सर्वसाधारणपणे मानले जाते. संत पीटरने आपल्या पहिल्या पत्रात त्याचा ("माझा मुलगा मार्क" असा) उल्लेख केलेला आहे.(१पेत्र ५:३) तसेच संत पौलने कलस्सैकरांस पत्र ४:१० आणि तीमथ्य ४: ११ व फिलेमोन २४ इत्यादी ठिकाणी मार्कचा उल्लेख केलेला आढळतो.
[मार्क हा येरुशलेममध्ये प्रांरभीच्या काळात जो ख्रिस्ती समुदाय होता त्याच समाजातील मरिया नावाच्या स्त्रीचा मुलगा होता. तो पेत्रचा जुना मित्र होता. त्याच्या घरी “बंधुवर्ग” जमा होत असे. इ. स. ४६ साली पौल आणि बर्णबा जेव्हा अंत्युखिया येथे गेले तेव्हा त्यांनी आपणाबरोबर मार्क ह्याला देखील आपल्या पहिल्या प्रेषितीय दौऱ्यावर नेले. येथेच असताना मार्क हा पौल व बर्णबापासून वेगळा झाला आणि जेरूसलेम येथे आपल्या घरी परतला.
आपल्याला आलेल्या पहिल्या कटू अनुभवामुळे आपल्या दुसऱ्या प्रेषितीय दौऱ्यावर मार्कला आपल्यासोबत घेणे पौलला प्रशस्त वाटले नाही. त्याचा परिणाम बर्णबावरदेखील झाला आणि बर्णबा पौलपासून विभक्त झाला. पौल आपल्या मार्गाला गेला आणि मार्क व बर्णबा एकत्र येऊन पुन्हा एकदा सायप्रस या ठिकाणी गेले. मात्र ही फूट फार काळ टिकली नाही. लवकरच पौल व मार्क आपले आपापसातील मतभेद व दुरावा विसरून एकत्र आले व एकमेकांचे सख्ये सोबती बनले.
सर्वसाधारणपणे इ. स.६० साली मार्क पौलबरोबर रोम शहरात असल्याचा उल्लेख सापडतो, तेथूनच पौलकडून प्रेरणा घेऊन आशिया मायनरमधील ख्रिस्तमंडळ्यांमध्ये गेला. या मंडळ्यात त्याने जीवापाड मेहनत करून लोकांना ख्रिस्ताची ओळख करून दिली आणि तेथल्या मंडळ्या मजबूत केल्या. तेथूनच त्यांनी अक्विलिया नामक प्रांतातही सुवार्ता प्रसार केला. ह्या प्रांतातील लोक पुढे ४०० वर्षांनंतर तेथून हद्दपार करण्यात आले आणि त्यांनीच एकत्र येऊन सुप्रसिद्ध व्हेनिस शहराची उभारणी केली. संत मार्क हा व्हेनिस शहराचा आश्रयदाता संत मानला जातो.इ. स. ८१५ साली व्हेनिसच्या सैनिकांनी आलेक्झांड्रिया (इजिप्त) येथून त्याचे मृतशरीर चोरले आणि आपल्या व्हेनिस शहरात सन्मानाने आणले. त्यांनी संत मार्कच्या उर्वरीत अवशेषांना एका सुशोभित थडग्यात पुरले आणि त्यावर एक महामंदिर उभारले. आजही ते आपल्याला पाहायला मिळते.
अक्विलिया येथून संत मार्क इजिप्त येथे गेला असावा व तेथे असतानाच त्याने आलेक्झांड्रिया येथे महागुरूंसाठी निवासस्थान उभारले असावे. इ. स. ६१ साली संत पौल तिमथीला लिहिलेल्या पत्रात मार्क ह्याला रोम शहरात आणण्याची विनंती करताना आढळतो. त्यावेळी मार्क हा एफसस शहरात होता रोममध्ये आल्यानंतरच मार्क ह्याने आपले सुप्रसिद्ध शुभवर्तमान लिहिले. त्या शुभवर्तमानात त्याने पेत्रची प्रवचने संग्रहित केलेली आहेत. कारण ते जेव्हा जेव्हा प्रवचने द्यायचे तेव्हा तेव्हा मार्क त्याचा दुभाषी म्हणून काम करायचा. रोममधील ख्रिस्ती भाविकांच्या आग्रहाखातर मार्क ह्याने ग्रीक भाषेत हे शुभवर्तमान लिहिले असे मानले जाते.
[संत मार्क हा लिपिकांचा आश्रयदाता संत मानला जातो. नरक आणि विजा ह्यांच्याविरुद्ध त्याचा धावा केला जातो.
पहिले वाचन १ पेत्रच्या ५:५-१४
वाचक : संत पेत्रच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन ५:५-१४
"माझा मुलगा मार्क तुम्हाला सलाम सांगतो."
तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण "देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि नम्र जनांवर कृपा करतो.”
म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा, अशासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांला उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुध्द श्रध्देत दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ आणि सबळ करील. त्याचा पराक्रम युगानुयुगे आहे. आमेन.
माझ्या मते श्रध्दावान असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवून ह्यात बोध केला आहे आणि साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे. हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलमधील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हांला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना सलाम करा.
खिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
1 Peter 5:56-14
Beloved: Clothe yourselves, all of you, with humility towards one for "God opposes the Jumble yourselves, therefore, under the mighty hand of God, so that at the proper time he be your anxieties on him, because her at the proper je sober-minded, be watchful. Your adversary the devil prowls around like fo Ben, seeking someone to devour. Resist him, firm in your faith, knowing that the sting kinds of suffering are being experienced by your brotherhood throughout at the same And after you have suffered for a little while, the God of all grace, who has called ydu to his eternal glory din Christ, will himself restore, confirm, strengthen, handled you you. To him be the dominion for ever and ever. Amen. By Silvanus, a faithful brotablish Tregard him, I have written briefly to you, exhorting and declaring that this is the true grace of God. Stand firm in it. She who is at Babylon, who is likewise chosen, sends you greetings; and so does Mark, my son. Greet one another with the kiss of love. Peace to all of you who are in Christ.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८९:२ - ३, ६-७,१६-१७
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या प्रेमाचे मी नित्य गीत गाईन.
किंवा आलेलुया !
१. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन,
मी आपल्या मुखाने पिढ्यान्पिढयांना तुझी सत्यता कळवीन.
कारण मी म्हणालो,
तुझ्या दयेची उभारणी सदोदित होत राहील,
स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस.
२) हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील.
तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल,
कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा
आकाशात कोण आहे ?
दिव्यदूतांच्या मंडळात परमेश्वरासमान कोण आहे ?
३)ज्या लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य !
हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात,
ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात,
तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते.
Psalm 89:2-3, 6-7, 16-17
I will sing forever of your mercies, O Lord;
I will sing forever of your mercies, O Lord.
through all ages my mouth
will proclaim your fidelity.
I have declared your mercy is established forever,
your fidelity stands firm as the heavens.
The heavens praise your wonders, O Lord,
your fidelity in the assembly of your holy ones.
For who in the skies can compare with the Lord,
or who is like the Lord
among the heavenly powers?
How blessed the people who know your praise,
who walk, O Lord, in the light of your face,
who find their joy every day in your name
, who make your justice their joyful acclaim. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आम्ही वधस्तंभावर खिळल्या गेलेल्या ख्रिस्ताची घोषणा करतो,
ख्रिस्त देवाचे मूर्तिमंत सामर्थ्य व दैवी ज्ञान आहे.
आलेलुया !
Acclamation:
We preach Christ crucified; the
power of God and the wisdom of God.
शुभवर्तमान मार्क १६:१५-२०
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."
येशूने अकरा शिष्यांना सांगितले, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो श्रध्दा ठेवतो आणि स्नानसंस्कार घेतो त्याचे तारण होईल, जो श्रध्दा ठेवत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि श्रध्दा ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही, त्यांनी आजाऱ्यांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”
ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता आणि घडवणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता.
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 16:15-20
At that time: Appearing to Eleven, Jesus said to them, "Go into all the world and proclaim the gospel to the whole creation. Whoever believes and is baptised will be saved, but whoever does not believe will be condemned. And these signs will accompany those who believe: in my name they will cast out demons; they will speak in new tongues: they will pick up serpents with their hands; and if they drink any deadly poison, it will not hurt them; they will lay their hands on the sick, and they will recover." So then the Lord Jesus, after he had spoken to them, was taken up into heaven and sat down at the right hand of God. And they went out and preached everywhere, while the Lord worked with them and confirmed the message by accompanying signs.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:संत पीटर संत मार्कला स्वतःचा मुलगा असं संबोधितो. अर्थात आध्यात्मिक मुलगा. कारण संत मार्क त्याचा सवंगडी त्याला साथ देणारा व त्याच्याबरोबर वावरणारा होता. बर्णबा ह्याचासुद्धा तो नातेवाईक होता आणि संत मार्कने जे काही त्यांच्याकडून ऐकले ते स्वतःचं केले, कारण तो श्रद्धावान होता आणि तो चार शुभवर्तमानांपैकी त्यांच्यांतले पहिले शुभवर्तमान लिहिणारा असा झाला. संत मार्क स्वतः मिशनरी होता. परंपरा सांगते की आलेक्झांड्रिया (इजिप्त) मध्ये जी ख्रिस्तसभा आहे ती संत पौलने स्थापन केली. त्याठिकाणी व अंत्युखिया येथे संत मार्क ह्याने उत्तमरित्या मिशनरी कार्य केले आणि नंतर तो संत पीटरबरोबर राहिला त्यामुळे संत मार्कच्या शुभवर्तमानावर संत पीटरचा प्रभाव आहे. संत मार्कचा सोहळा साजरा करीत असताना आपण शुभवर्तमानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी प्रार्थना करू या. कारण जे आपण वाचतो, ऐकतो व समजून घेतो ते फार महत्त्वाचे आहे. आपण जो अभ्यास करतो तो पवित्र आत्म्याच्याद्वारे झाला पाहिजे. कारण ज्या पवित्र आत्म्याच्याद्वारे शुभवर्तमानकार प्रेरीत झाले तोच पवित्र आत्मा आपल्याही शुभवर्तमानाचे आकलन होण्यासाठी साहाय्यभूत ठरावा म्हणून प्रार्थना करू या.
प्रार्थना :-
हे प्रभू येशू, सुवार्तेची साक्ष इतरांना देण्यासाठी आम्हाला प्रेरणा व धैर्याचा आत्मा बहाल कर, आमेन.
✝️
0 टिप्पण्या