Marathi Bible Reading | 4th Week of Easter Friday 26th April 2024

पुनरुत्थान चौथा सप्ताह  

शुक्रवार  दि. २६ एप्रिल २०२४ 

“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.   "Let not your hearts be troubled. Believe in God; believe also in me.


संत क्लेटस

- पोप, रक्तसाक्षी (... ९१)  

क्लेटस ह्यांनी पोप लिनस ह्यांच्याकडून इ. स. ७८ साली पोपपदाची सूत्रे स्वीकारली आणि संत पीटरच्या आसनावर १२ वर्षे जागतिक ख्रिस्त सभेची सेवा केली. सहाव्या शतकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'लिबेर पॉन्टीफिकालीस' ह्या परिपत्रकात ह्या पोप महाशयांच्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार पोप क्लेटस ह्यांनी पोप संत पीटर ह्यांच्या थडग्यावर मेमोरिया नावाचे एक प्रार्थनागृह उभारले. दुसरे प्रार्थना गृह संत पौलच्या थडग्यावर बांधले होते. ह्याव्यतिरक्ति ख्रिस्तसभेतील ह्या तिसऱ्या पोपमहाशयांविषयी अगदीच त्रोटक माहिती उपलब्ध आहे.
निरो राजा पुन्हा जन्माला आला आहे असे ज्याच्याविषयी म्हटले जायचे त्या सम्राट डोमिशियन ह्यांच्या क्रूर कारवायांमुळे पोप क्लेटस ह्यांना रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. त्यांना व्हॅटिकन स्मशानभूमीत पुरण्यात आले
प्रभू येशू आपल्या अस्वस्थ शिष्यांना आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे, 'देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.' गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या शिष्यांना व आपल्या सर्वांना प्रभू येशू आज सांगत आहे. ‘विश्वास ठेवा’. देवावरील आणि प्रभू येशूवरील विश्वासाने आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवू शकतो,जो कोणी त्याच्यावर विश्वास  ठेवून त्याला अनुसरतो त्याला जीवनाचे 'सत्य' कळते आणि आपण खऱ्या  अर्थाने प्रभूच्या सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार बनतो

पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १३:२६-३३
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“देवाने जे वचन दिले होते, ते येशूला मेलेल्यांतून उठविल्याने परिपूर्ण झाले. "
अत्युंखियातील सभास्थानात पौल म्हणाला, "अहो  बंधुजनहो, आब्राहामच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हांपैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. कारण येरुशलेमवासियांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशीवाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून त्याने ते शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातला विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेली सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरुन खाली काढून कबरीमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. त्याच्याबरोबर जे गालिलीहून येरुशलेममध्ये आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते जे त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलांबाळांकरिता पूर्ण केले आहे. स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की, 'तू माझा पुत्र आहेस,
आज मी तुला जन्म दिला आहे. !'
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 13:26-33
those days: When Paul came to Antioch of Pisidia, he said in the syanagogue. "Brothers, sons of the family of Abraham, and those among you who fear God, to us has been sent the message of this salvation for those who live in Jerusalem and their rulers, because they did not recognise hon. For those who utterances of the prophets, which are read every Sabbath, fulfilled them by condemning him. And though they found in him no guilt worthy of death, they asked plate to have him executed. And when they had carried out all that was written of him, they took him down from the tree and laid him in a tomb. But God raised him from the dead, and for many days he appeared to those who had come up with him from Galilee to Jerusalem, who are now his witnesses to the people. And we bring you the good news that what God promised to the fathers, this he has fulfilled to us heir children by raising Jesus, as also it is written in the second Psalm, 'You are my Son, today I have begotten you.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र २: ६-११
प्रतिसाद :   तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.

१) "सियोनवर, माझ्या पवित्र डोंगरावर, 
मी माझा राजा प्रस्थापित केला आहे."
 प्रभूचे फर्मान मी जाहीर करीन. 
प्रभू मला म्हणाला, "तू माझा पुत्र आहेस. 
आज मी तुला जन्म दिला आहे."

२) "तू मागितलेस तर राष्ट्रांचे स्वामित्व मी तुला देईन, 
थेट सीमेपर्यंत पृथ्वी तुझ्या स्वाधीन करीन. 
लोखंडी गजाने तू त्यांना फोडून काढशील,
 कुंभाराच्या मडक्यासारख्या त्यांच्या ठिकऱ्या उडवशील."

३) तेव्हा, अहो राजांनो, सुज्ञता बाळगा,
 पृथ्वीवरील सत्ताधिशांनो, बोध घ्या. 
प्रभूची आदरयुक्त भीती बाळगा. 
कंपित व्हा, त्याचे प्रभुत्व मान्य करा.


Palm 2:6-7, 8-9, 10-11a . 
You are my son. It is I who have begotten you this day.

It is I who have appointed my king 
On Sion, my holy mountain." 
I will announce the decree of the Lord: 
The Lord said to me, "You are my Son. 
It is I who have begotten you this day." R 

"Ask of me and I will give you 
the nations as your inheritance,
and the ends of the earth as your possession. 
With a rod of iron you will rule them; 
Like a potter's jar you will shatter them." R

So now, O kings, understand; 
take warning, rulers of the earth. 
Serve, the Lord with fear, 
exult with trembling,
 pay him your homage. R


जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
ख्रिस्त मेलेल्यातून खरोखरच उठला आहे.
हे आपणाला माहित आहे.
हे विजयशाली राजा, आम्हांवर दया कर.
आलेलुया !

Acclamation: 
I am the way, and the truth, and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.


शुभवर्तमान  योहान १४:१-६

वाचक :
  
योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते. मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे." थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार ?" येशूने त्याला म्हटले, "मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 14:1-6
At that time: Jesus said to his disciples, "Let not your hearts be troubled. Believe in God; believe also in me. In my Father's house are many rooms. If it were not so, would I have told you that I go to prepare a place for you? And if I go and prepare a place for you, I will come again and will take you to myself, that where I am you may be also. And you know the way to where I am going." Thomas said to him, "Lord, we do not know where you are going. How can we know the way?" Jesus said to him, "I am the way, and the truth, and the life. No one comes to the Father except through me."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या वाचनांतील शब्द अस्वस्थ मनाला उभारी व दिलासा देणारे आहेत. बायबलमधील प्रत्येक शब्द, प्रत्येक घटकेला, प्रत्येक दिवसासाठी, वेळेसाठी व काळासाठी अगदी उचीत असतो. प्रभूला माहीत आहे की आमची अंतःकरणे अस्वस्थ झालेली आहेत त्यामुळे प्रभू आम्हाला वचन देऊन आशा धरायला शिकवतात की जीवनातील कुठल्याही परिस्थितीमुळे आपण आपली श्रद्धा गमावून बसायचं नाही. प्रेषित त्यांच्याकाळात ओढवलेल्या परिस्थितीमुळे पूर्ण गोंधळून गेले, भयभीत झाले, जणूकाही ते नैराश्यामध्ये शिरले, कारण त्यांची श्रद्धा डळमळलेली होती पण बारकाईने जर विचार केला तर आजच्या शुभवर्तमानातील युद्ध हे प्रकाश व अंधार ह्यांमधील आहे. प्रकाश म्हणजे परमेश्वर आणि अंधार म्हणजे सैतान, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त व सैतानामध्ये जुंपलेले ते युद्ध होतं परंतु ह्यात खरा प्रश्न श्रद्धेचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही बाजूने आपला कल असू शकतो. प्रकाशाच्या वा अंधाराच्या बाजूने, मात्र प्रकाशाचा मार्ग सत्याचा पण तितकाच आव्हांनाचा आहे तर अंधाराचा मार्ग दिशाभूल करणारा पण मनाला मोहिनी घालणारा असतो. त्यासाठी निवड श्रद्धेच्याच प्रकाशात झाली पाहिजे. श्रद्धेनेच हा पेच सोडविता येतो. श्रद्धा अविचल असेल तर विजय सत्याचा ठरलेला आहे, पण श्रद्धा जर डळमळली तर विजय अंधाराचा होतो. क्षणभंगुर सुखासाठी शाश्वत आनंद गमवायचा की श्रद्धेच्या मार्गाने क्षणभंगुर सुखाला तिलांजली द्यायची? याठिकाणी प्रश्न परमेश्वराचा नाही तर आपल्या प्रत्येकाच्या निवडीचा आहे. खरे रक्षण करणाऱ्या आणि खरे प्रेम करणाऱ्या परमेश्वराबरोबर राहायचे की भुलथापा देणाऱ्या सैतानाशी हातमिळवणी करायची ?

प्रार्थना :-
 हे प्रभू येशू, जीवनातील सर्व अस्थिरता तुला समर्पित करतो. तुझ्या  वचनानुसार सत्य जगण्यास व तुझ्या मार्गावरून चालण्यास प्रेरणा दे, आमेन
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या