पुनरुत्थान सहावा सप्ताह
बुधवार दि. ८ मे २०२४
तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल
When the Spirit of truth comes, he will guide you into all the truth,
✝️
प्रभू येशू आपल्या शिष्यांना धीर देत असतानाच सत्याचा आत्मा त्यांना मार्गदर्शन करील असे स्पष्ट करीत आहे. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आश्वासनपूर्वक सांगितले की, 'सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.' शिष्यांना प्रभूची सुवार्ता पसरविण्यास आणि साक्ष देण्यास धैर्य व शक्ती मिळावी म्हणूनच प्रभू येशूने सत्याचा आत्मा बहाल केला आहे. सार्वकालिकता, सर्वज्ञता, सामर्थ्य, सर्वव्यापकता, पवित्रता व सत्यता हे सर्व पवित्र आत्म्याचे दैवी गुण आहेत. हाच सत्याचा पवित्र आत्मा आपल्या सर्वांना सुध्दा देण्यात आला आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालावे म्हणून प्रभू आज आपल्याला आवाहन करीत आहे. पवित्र आत्मा आपल्याला सत्याची जाणीव करुन देतो, प्रभूच्या वचनाचे स्पष्ट ज्ञान करून देतो व आपल्या अंतःकरणातील अंधकार दूर करून जीवनाचा प्रकाश उजळतो. विशेषतः आपल्याला सत्याने आचरण करण्यास पवित्र आत्मा प्रेरणा देतो.
पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपण सर्वांनी प्रकाशात चालावे व सत्यआचरण करावे म्हणून आज विशेष रितीने पवित्र आत्याची आराधना करू या.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १७:१५,२२-१८:१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता त्या देवाला मी
तुम्हांला जाहीर करतो." पौलला पोहोचविणाऱ्यांनी त्याला अथेन्सपर्यंत नेले आणि सीला आणि तीमथी ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले.
पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला : "अहो अथेन्सकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, अज्ञात देवाला, ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत; त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहो. तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे,
"आपण वास्तविक त्याचा वंश आहो."
तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने आणि कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे, त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवले आहे."
तेव्हा मृताच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू." इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला, त्यात दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री आणि त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. त्यानंतर तो अथेन्स सोडून करिंथ येथे गेला.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Act. 17:15, 22-18:1
In those days: Those who conducted Paul brought him as far as Athens, and after receiving a command for Silas and Timothy to come to him as soon as possible, they departed. So Paul, standing in the midst of the Areopagus said: "Men of Athens, I perceive that in every way you are very religious. For as I passed long and observed the objects of your worship, I found also an altar with this inscription: To the unknown god. What therefore you worship as unknown, this I proclaim to you. The God who made the world and everything in it, being Lord of heaven and earth, does not live in temples made by man, nor is he served by human hands, as though he needed anything, since he himself gives to all mankind life and breath and everything. And he made from one man every nation of mankind to live on all the face of the earth, having determined allotted periods and the boundaries of their dwelling place, that they should seek God, and perhaps feel their way towards him and find him. Yet he is actually not far from each one of us, for 'In him we live and move and have our being'; as even some of your own poets have said, 'For we are indeed his offspring. Being then God's offspring, we ought not to think that the divine being is like gold or silver or stone, an image formed by the art and imagination of man. The times of ignorance God overlooked, but now he commands all people everywhere to repent, because he has fixed a day on which he will judge the world in righteousness by a man whom he has appointed; and of this he has given assurance to all by raising him from the dead." Now when they heard of the resurrection of the dead, some mocked. But others said, "We will hear you again about this." So Paul went out from their midst. But some men joined him and believed, among whom also were Dionysius the Areopagite and a woman named Damaris and others with them. After this Paul left Athens and went to Corinth.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४८:१-२,११-१४
प्रतिसाद : तुझ्या ऐवयनि आकाश आणि पृथ्वी भरली आहे.
१) परमे बराचे स्तवन करा!
आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा,
उद्धवलोकी त्याचे स्तवन करा.
अहो त्याच्या सर्व दूतांनो, त्याचे स्तवन करा.
त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा.
२) पृथ्वीवरील राजे आणि सर्व प्रजा, अधिपती
आणि पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार आणि कुमारी,
वृद्ध आणि तरूण त्याचे स्तवन करा,
३) ही सगळी परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत
कारण केवळ त्याचेच नाम उच्च आहे.
त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या आणि आकाशाच्या वर आहे.
४) त्याने आपल्या लोकांचा उत्कर्ष केला आहे.
हे त्याच्या सर्व भक्तांना त्याच्याजवळ असलेल्या लोकांना
म्हणजे इसाएलच्या संततीला स्तुतिपात्र झाले आहे.
परमेसराचे स्तवन करा.
Psalm 148:1-2, 11-12, 13, 14
Heaven and earth are full of your glory.
Praise the Lord from the heavens;
praise him in the heights.
Praise him, all his angels;
praise him, all his hosts. R
Kings of the earth and all peoples,
princes and all judges of the earth,
young men and maidens as well,
the old and the young together. R
Let them praise the name of the Lord,
for his name alone is exalted,
his splendour above heaven and earth.
He exalts the strength of his people.
He is the praise of all his faithful,
the praise of the children of Israel,
of the people to whom he is close. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
सर्व वस्तूंचा मस्तक असलेला ख्रिस्त मेलेल्यातून उठला त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे.
आलेलुया !
Acclamation:
I will ask the Father, and he will give you another Helper, to be with you for ever.
शुभवर्तमान योहान १६:१२-१५
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सत्याचा आत्मा तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मला अद्यापि तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; तो आपल्या स्वतः चे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल, तेच सांगेल आणिहोणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवीन,
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 16:12-15
At that time: Jesus said to his disciples, "I still have many things to say to you, but you cannot bear them now. When the Spirit of truth comes, he will guide you into all the truth, for he will not speak on his own authority, but whatever he hears he will speak, and he will declare to you the things that are to come. He will glorify me, for he will take what is mine and declare it to you. All that the Father has is mine; therefore I said that he will take what is mine and declare it to you."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू पॅराक्लेट म्हणीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यावर येतो. प्रभू येशू म्हणतो की, शिष्यांना अनेक गोष्टी शिकण्याची गरज आहे. पण आता त्यांना त्या कळणार नाहीत. मात्र जेव्हा सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो त्यांना त्या समजण्यास मदत करणार. मात्र आत्मा स्वतःहून काही आपले सांगणार नाही. तर जे प्रभू येशूचे आहे ते तो घेईल आणि शिष्यांना घोषित करील. म्हणजेच जे काही प्रभू येशूने त्यांना शिकविले होते ते तो त्यांना पुन्हा समजण्यास मदत करणार. आपण आपल्या जीवनात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो, की ज्या गोष्टी सत्याचा आत्मा आपल्याला शिकवत आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो ?
प्रार्थना : हे पवित्र आत्मा ये, आमचे जीवन प्रकाशीत कर व आम्हाला तुझ्या सत्याची साक्ष देण्यास प्रेरणा दे, आमेन..
✝️
0 टिप्पण्या