Marathi Bible Reading | 6th Week of Easter Thursday 9th May 2024

पुनरुत्थान सहावा  सप्ताह  

गुरुवार  दि. ९ मे  २०२४ 

 मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."

Truly, truly, I say to you, you will weep and lament, but the world will rejoice. You will be sorrowful, but your sorrow will turn into joy."

✝️

संत पीटर नोलास्कोस 
वार्तांसाक्षी (११८२-१२५६)
प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट होते तसेच दुःखानंतर आनंदाचा  क्षण येत असतो. आपल्या वाट्याला आलेल्या दु:खाकडे सकारात्मक  दृष्टिकोणातून पाहण्याची गरज आहे. दु:खामुळे परिवर्तनाची दिशा सापडते व  दुःखामुळेच पुनरुत्थानाचा आनंद प्राप्त होत असतो. आपल्या सर्व प्रकारच्या दु:खात, संकटात, वेदनेत प्रभू येशू आपल्याला सकारात्मकतेने पाहण्यासाठी व आनंदाचा अनुभव घेण्यास बोलावित आहे.

ख्रिस्त प्रभूच्या कृपेने प्रभावित झालेल्या पौलाने करिंथ येथे प्रभूची  सुवार्ता घोषविली. प्रसंगी पौलाने विरोध सहन केला; परंतु सभास्थानाचा  अधिकारी व त्याचे घराणे ह्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. प्रभू येशूसाठी विरोध, दुःख, संकट व छळ सहन करणाऱ्यांना प्रभूठायी  शांती, कृपा आणि आनंद मिळतो.

  
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १८:१-८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “पौल त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून व्यवसाय चालवला. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करीत असे."

पौल अथेन्स सोडून करिंथ येथे गेला. तेव्हा पंत येथील अक्किला नावाचा कोणीएक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौदियसने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता. त्यांच्याकडे पौल गेला. त्यांचा आणि ह्यांचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला. त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची आणि हेल्लेण्यांची खात्री करून देत असे.
सीला आणि तीमथी हे मासेदोनियाहून आले तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहुद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता. परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, "तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर! मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार." मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यांसह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला.

प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 18:1-8
In those days: Paul left Athens and went to Corinth. And he found a Jew named Aquila, a native of Pontus, recently come from Italy with his wife Priscilla, because Claudius had commanded all the Jews to leave Rome. And he went to see them, and because he was of the same trade he stayed with them and worked, for they were tentmakers by trade. And he reasoned in the synagogue every Sabbath, and tried to persuade Jews and Greeks. When Silas and Timothy arrived from Macedonia, Paul was occupied with the word, testifying to the Jews that the Christ was Jesus. And when they opposed and reviled him, he shook out his garments and said to them, "Your blood be on your own heads! I am innocent. From now on I will go to the Gentiles." And he left there and went to the house of a man named Titus Justus, a worshipper of God. His house was next door to the synagogue. Crispus, the ruler of the synagogue, believed in the Lord, together with his entire household. And many of the Corinthians hearing Paul believed and were baptised.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९८:१-४
प्रतिसाद :  परमेश्वराने आपले तारण राष्ट्रांना प्रकट केले आहे.

१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, 
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याच्या उजव्या हाताने त्याच्या पवित्र बाहूने
तारण साधले आहे.

२) परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण विदित केले आहे. 
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. 
इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया 
आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.

३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी
आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण पाहिले आहे. 
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा.
उच्च स्वरात आनंदाने गा; त्यांची स्तोत्रे गा.


Psalm 98:1, 2-3ab, 3cd-4
The Lord has shown his deliverance to the nations.

O sing a new song to the Lord, 
for he has worked wonders. 
His right hand and his holy arm 
have brought salvation. R 

The Lord has made known his salvation,
has shown his deliverance to the nations.
He has remembered his merciful love
and his truth for the house of Israel. R

All the ends of the earth have seen
the salvation of our God. 
Shout to the Lord, all the earth; 
break forth into joyous song, 
and sing out your praise. R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
ख्रिस्त मेलेल्यातून खरोखरच उठला आहे.
हे आपणांला माहित आहे.
हे विजयशाली राजा, आम्हांवर दया कर.
आलेलुया !

Acclamation: 
 I will not leave you as orphans, says the Lord; I will come to you, and your hearts will rejoice.

शुभवर्तमान   योहान १६:१६-२०
वाचक :  योहानलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल." ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हांस, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, शिवाय मी पित्याकडे जातो, असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय ?" ते म्हणत होते, “थोड्या वेळाने, असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हांला समजत नाही." आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारीत आहा काय? मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."

 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 16:16-20

At that time: Jesus said to his disciples, "A little while, and you will see me no longer, and again a little while, and you will see me." So some of his disciples said to one another, "What is this that he says to us, 'A little while, and you will not see me, and again a little while, and you will see me'; and, 'because I am going to the Father'?" So they were saying, "What does he mean by 'a little while'? We do not know what he is talking about." Jesus knew that they wanted to ask him, so he said to them, "Is this what you are asking yourselves, what I meant by saying, little while and you will not see me, and again a little while and you will see me'? Truly, truly, I say to you, you will weep and lament, but the world will rejoice. You will be sorrowful, but your sorrow will turn into joy."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू थोड्या वेळासाठी कोठे जाणार आहे ह्याविषयी सांगत आहे. मात्र प्रभू येशूचे जाणे हे त्याच्या पित्याकडे जाण्याचे नसून त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थानाचे आहे. दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाले तर "थोड्यावेळासाठी जाणे" म्हणजेच मृत्यु मुखी पडणे आणि थोड्या वेळाने पाहाणे. म्हणजे पुनरुत्थित होणे. मात्र शिष्यांना हे समजले नाही आणि ते गोंधळून गेले. पुढे येशू त्यांना सांगतो की, माझ्या मृत्यूवर तुम्ही रडाल आणि शोक कराल आणि जग आनंदित होईल. कारण जगाला येशूचा मृत्यू हवा होता परंतू प्रभू येशू त्यांना वचन देतो की, त्यांचे रडणे आनंदात बदलेल, जेव्हा येशू पुनरुस्थित होणार. आपल्या दुःखांना सुरूवात करण्याची तसेच मृत्युला पुनरुत्थानात बदलण्याची शक्ती फक्त प्रभू येशू कडेच आहे. ह्यावर आपला विश्वास आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, पुनरुत्थानाचा आनंद शोधण्यास व अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या