Marathi Bible Reading | 6th Week of Easter Friday 10th May 2024

पुनरुत्थान सहावा  सप्ताह  

शुक्रवार  दि. १० मे  २०२४ 

 आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही."but I will see you again, and your hearts will rejoice, and no one will take your joy from you. 

✝️


अविलाचा संत जॉन 
वार्तांसाक्षी (१४९९-१५६९)

दुःख आणि सुख हे माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. मात्र अंधाऱ्या रात्रीनंतर जशी पहाट होते तसेच दुःखानंतर सुखाचा आनंद उदय  पावतो. विशेषत: आपल्या दु:खाकडे सकारात्मकतेने पाहून त्यातून बोध  घेऊन आपण जीवनात मार्गक्रमण करावे हेच प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित आहे.
स्वर्गीय आनंदाचे सहभागीदार बनण्यासाठी जीवनातील सर्व दु:खाकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी आपल्या जीवनात देवाला प्राधान्य देऊ या. देवाच्या आज्ञेप्रमाणे जीवन आचरण करु या. आपल्या शब्दाद्वारे व  आचरणाद्वारे इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी तत्पर राहू या.  प्रथम आपण स्वत: आनंदी आहोत का यावर चिंतन करु या.
  
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १८:९-१८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 "ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत."

प्रभूने रात्री पौलला दृष्टान्तात म्हटले, “ भिऊ नको, बोलत जा, उगा राहू नको. कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझे वाईट करायला कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत." तो त्यांच्या मध्ये देवाचे वचन शिकवीत दीड वर्ष राहिला.
गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहुद्यांनी एकोपा करुन पौलवर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, "हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो." तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहुद्यांना, “अहो यहुद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे (अथवा दुष्कृतीचे) असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते. परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या. ह्या गोष्टींची पंचाईत मला नको." असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून हाकून लावले. तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकार सोस्थेनेस ह्याला धरुन न्यायासनासमोर मार दिला. पण गल्लियोने ह्यांपैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही.
ह्यानंतर पौल तेथे आणखी बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सुरिया देशाला गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला आणि अक्विल्लाही गेली. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंखिया येथे आपल्या डोक्याचे केस कातरुन घेतले.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 18:9-18

When Paul was in Corinth, the Lord said to Paul one night in a vision, "Do not be afraid, but go on speaking and do not be silent, for I am with you, and no one will attack you to harm you, for I have many people in this city who are my people" And he stayed a year and six months, teaching the word of God among them. But when Gallio was proconsul of Achaia, the Jews made a united attack on Paul and brought him before the tribunal, saying, "This man is persuading people to worship God contrary to the law." But when Paul was about to open his mouth, Gallio said to the Jews, "If it were a matter of wrongdoing or vicious crime, O Jews, I would have reason to accept your complaint. But since it is a matter of questions about words and names and your own law, see to it yourselves. I refuse to be a judge of these things." And he drove them from the tribunal. And they all seized Sosthenes, the ruler of the synagogue, and beat him in front of the tribunal. But Gallio paid no attention to any of this. After this, Paul stayed many days longer and then took leave of the brothers and set sail for Syria, and with him Priscilla and Aquila. At Cenchreae he had cut his hair, for he was under a vow.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ४७:२-७
प्रतिसाद :  परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे.

१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा, 
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा! 
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे, 
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

२) तो लोकांना आमच्या ताब्यात देतो, 
राष्ट्रांना आमच्या पायांखाली घालतो. 
त्याचा आवडता याकोब याला ज्या वतनाचा अभिमान होता,
 ते त्याने आम्हांसाठी निवडले आहे.

३) जयघोष होत असता देव वर गेला आहे,
कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा;
आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.


Psalm 47:2-3, 4-5, 6-7
God is king of all the earth.

All peoples, clap your hands.  
Cry to God with shouts of joy! 
For the Lord, the Most High, is awesome, 
the great king over all the earth. R

He humbles peoples under us 
and nations under our feet.
Our heritage he chose for us,
 the pride of Jacob whom he loves. R

God goes up with shouts of joy. 
The Lord goes up with trumpet blast.
Sing praise for God; sing praise! 
Sing praise to our king; sing praise! R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे. 
आलेलुया !

Acclamation: 
 Christ should suffer and on the third day rise from the dead, and enter into his glory.

शुभवर्तमान   योहान १६:२०-२३
वाचक :  योहानलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  "तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 16:20-23a
At that time: Jesus said to his disciples, "Truly, truly, I say to you, you will weep and lament, but the world will rejoice. You will be sorrowful, but your sorrow will turn into joy. When a woman is giving birth, she has sorrow because her hour has come, but when she has delivered the baby, she no longer remembers the anguish, for joy that a human being has been born into the world. So also you have sorrow now, but I will see you again, and your hearts will rejoice, and no one will take your joy from you. In that day you u will ask nothing of me.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू दुःखाच्या दाखल्याविषयी सांगत आहे. तो म्हणतो ज्याप्रकारे प्रसूतीच्या वेळी एखाद्या स्त्रीला खुप वेदना सहन कराव्या लागतात मात्र नविन व्यक्तीचा जन्म झाल्यावर त्या वेदनांचे रूपांतर आनंदात होते. तशाचप्रकारे येशूच्या येणाऱ्या दुःखसहनाने आणि मरणाने शिष्य दुःखी होतील. परंतू येशू जेव्हा पुनरुस्थित होईल तेव्हा ते आनंदित होतील आणि त्यांचा तो आनंद कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. आपल्या जीवनात अशी कोणती दुःखे आहेत त्याचे सुखात बदलण्याची आपली इच्छा आहे ? पुनरुत्थीत ख्रिस्तावर विश्वास ठेवून ह्या दुःखात धैर्याने सामोरे जाण्यास आपण प्रभू येशूकडे शक्ती मागूया. कारण त्याने दिलेला आनंद आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासात सर्वकाळचा आनंद अनुभवण्यास मला  प्रेरणा दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या