Marathi Bible Reading | 6th Week of Easter Saturday 11th May 2024

पुनरुत्थान सहावा  सप्ताह  

शनिवार  दि. ११ मे  २०२४ 

तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन,I say to you, whatever you ask of the Father in my name, he will give it to you.

✝️

लाकोनीचे संत इग्नेशिअस

- वर्तनसाक्षी (१७०१-१७८१)

प्रभू येश खिस्त आज आपल्या सर्वांना विश्वासाने मागण्यासाठी आवाहन करीत आहे.आपल्या सर्वांना जीवनप्राप्ति आणि परिपूर्ण आनंद मिळावा ही प्रभूची इच्छा आहे. प्रभू येशू आपल्याला पित्याकडे त्याच्या नावाने मागण्यासाठी बोलावित आहे.  मात्र प्रभूच्या आनंदाचे सहभागिदार बनण्यासाठी प्रभूच्या वचनाप्रमाणे आचरण  करणे गरजेचे आहे. आपण जागतिक आनंदात रमून जात असताना परमेश्वराच्या  आज्ञा विसरतो व त्याची वचने धुडकावून लावतो म्हणूनच आनंदाऐवजी जीवनात दुःख, अपयश आणि निराशा येत असते. प्रभू परमेश्वर आज शाश्वती देऊन सांगत आहे की, 'मागा म्हणजे मिळेल. आपले जीवन विपूलतेने भरलेले असावे म्हणून आज अंतर्मुख बनून प्रभूच्या वचनावर चिंतन करु या. त्याच्या शाश्वत आनंदाकडे वाटचाल करण्यास प्रेरणा मागू या.
परमेश्वराची कृपा व आत्म्याठायी आनंद पावलेल्या अपुल्लोने इफिसमध्ये
 व अखया प्रांतात प्रभू येशूची साक्ष दिली. पवित्र आत्मा अपुल्लोला निर्भिडपणे  प्रेरणा देत होता. देवाचे प्रेम व दया अनुभवल्यानेच प्रभूची  साक्ष देणे सोपे होत असते.
  
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १८:२३-२८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"येशू हाच ख्रिस्त आहे असे अपुल्लोने शास्त्रावरून दाखवले."

अंत्युखिया येथे काही दिवस राहून पौल निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत आणि फुगिया ह्यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.
तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता आणि शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहुदी इफिस येथे आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले आणि त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. नंतर त्याने अखया •प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो येथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वासमक्ष यहुद्यांचे खंडण करीत असे.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 18:23-28

After spending some time in Antioch, Paul departed and went from the region of Galatia and Phrygom strengthening all the disciples. Now a Jew named Apollos, a native of Alexandria, came to Ephesus. He was an eloquent man, competent in the Scriptures. He had been instructed in the way of the Lord. And being fervent in spirit, he spoke and taught accurately the things concerning Jesus, though he knew only the baptism of John. He began to speak boldly in the synagogue, but when Priscilla and Aquila heard him, they took him aside and explained accurately. And when to him the way of God more he wished to cross to Achaia, the brothers encouraged him and wrote to the disciples to welcome him. When he arrived, he greatly helped those who through grace had believed, for he powerfully refuted the Jews in public, showing by the Scriptures that the Christ was Jesus

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ४७:२-३,८-९,१०
प्रतिसाद : परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे.

१ )अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा,
 उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा. 
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे, 
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

२) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे,
 तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे,
देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे..

३) राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत, 
आब्राहामच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. 
पृथ्वीवरील सर्व राजे देवाचे आहेत, तो परमथोर आहे.



Psalm 47:2-3, 8-9, 10

God is king of all the earth.

All peoples, clap your hands.
Cry to God with shouts of joy!
For the Lord, the Most High, is awesome, 
the great king over all the earth. R

God is king of all the earth.
Sing praise with all your skill.
God reigns over the nations.
God sits upon his holy throne. R

The princes of the peoples are assembled 
with the people of the God of Abraham.
The rulers of the earth belong to God, 
who is greatly exalted. R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, 
मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि 
माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया !

Acclamation: 
  I came from the Father and have come into the world, and now I am leaving the world and going to the Father.

शुभवर्तमान   योहान १६:२३-२८
वाचक :  योहानलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पिता तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि विश्वास धरला आहे.' "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही, पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यामुळे तुमचा आनंद परिपूर्ण होईल. ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 16:23b-28
At that time: Jesus said to his disciples, "Truly, truly, I say to you, whatever you ask of the Father in my name, he will give it to you. Until now you have asked nothing in my name. Ask, and you will receive, that your joy may be full. "I have said these things to you in figures of speech. The hour is coming when I will no longer speak  to to you in figures of speech but will tell you plainly about the Father. In that day you will ask in my name, and I do not say to you that I will ask the Father on your behalf; for the Father himself loves you, because you have loved me and have believed that I came from God. I came from the Father and have come into the world, and now I am leaving the world and going to the Father."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणतो की माझ्या नावाने तुम्ही जे काही पित्याकडे मागाल तो तुम्हाला देईल. आता पर्यंत शिष्यांनी पित्याकडे काहिच मागितले नव्हते परंतू आतापासून ते मागतील आणि त्यांचा आनंद पूर्ण होईल. आतापर्यंत प्रभू येशू दाखल्यांद्वारे त्यांच्याबरोबर पित्याविषयी बोलत होता. पण मात्र आता वेळ आली आहे उघडपणे बोलण्याची. येशू आपल्या शिष्यांना म्हणतो की, तुम्ही आता माझ्या पित्याजवळ थेट मागणे करू शकता. कारण पिता शिष्यांवर प्रेम करतो कारण ते येशूवर प्रेम करत आणि त्याच्यावर विश्वास ठेवत की तो परमेश्वर पित्याकडून आला आहे. मागा म्हणजे तुम्हांस मिळेल. या प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवून कुठल्या गोष्टी आपण पित्याकडे मागत आहोत? पवित्र आत्म्याचे दान आपण पित्याकडे मागतो का?

प्रार्थना :हे परिपूर्ण आनंदाच्या उगमा, प्रभू परमेश्वरा, पवित्र आत्म्याठायी आम्हास तुझ्या आनंदात सहभागी कर, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या