Marathi Bible Reading | 7th Sunday of the Easter | Ascension of the Lord 12th May 2024

पुनरुत्थानकाळातील 

सातवा   रविवार 

दिनांक   १२ मे २०२

प्रभूचे स्वर्गारोहण

तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला.

the Lord Jesus,  was taken up into heaven and sat down at the right hand of God.


(प्रभू येशूचे स्वर्गरोहण-सोहळा)

✝️

पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त चाळीस दिवस आपल्या शिष्यांबरोबर त्यांना दर्शन देत देवराज्याच्या गोष्टी सांगत असे (प्र. कृ. १३).  आपल्या शिष्यांची जडण घडण झाल्यानंतर प्रभू येशूने त्यांना पवित्र आत्म्याच्या  देणगीचे आश्वासन दिले. प्रभू त्यांना म्हणाला, 'पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी  व्हाल. '
 आज प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या कृपादानाचे  आश्वासन देऊन त्याची अखरेची आज्ञा पाळण्याचे आवाहन करीत आहे. खरे पाहता आपल्या सर्वांना त्यामुळे स्वर्ग राज्याचे आश्वासना मिळाले आहे. संत  पौल आजच्या दुसऱ्या वाचनात सांगत आहे, ‘सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य,  धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेहि नाव घ्या त्या सर्वाहून उंच करुन त्याला (येशूला) स्वर्गात आपल्या उजवीकडे (देवपित्याने) बसविले आहे.'
प्रभू येशूच्या स्वर्गरोहणामुळे आपल्या प्रत्येकाची सार्वकालिक जीवनाची आशा दृढ झाली आहे. मात्र प्रभूची सुवार्ता जगभर पसरविण्याची  जबाबदारी प्रभू येशूने आपल्या प्रत्येकावर सोपविलेली आहे. आपल्या  विचारांनी, शब्दानी आणि कृतीने ख्रिस्ताची सुवार्ता परसवू या आणि प्रभू येशूचे  साक्षीदार बनू या.


  
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १:१-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन  
“त्यांच्या डोळ्यांदेखत येशू वर घेतला गेला." 
हे थियफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला, त्या दिवसांपर्यंत त्याने जे जे करायला आणि शिकवायला आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत येशू त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा. कारण योहानने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.
ह्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, "प्रभो, ह्याच काळात तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय ?" तो त्यांना म्हणाला, "जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हांकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहात होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, "अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिला? हा जो येशू तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 1:1-11

In the first book, O Theophilus, I have dealt with all that Jesus began to do and teach, until the day when he was taken up, after he had given commands through the Holy Spirit to the apostles whom he had chosen. He presented himself alive to them after his suffering by many proofs, appearing to them during forty days and speaking about the kingdom of God. And while staying with them he ordered them not to depart from Jerusalem, but to wait for the promise of the Father, which, he said, "you heard from me; for John baptized with water, but you will be baptized with the Holy Spirit not many days from now." So when they had come together, they asked him, "Lord, will you at this time restore the kingdom to Israel?" He said to them, "It is not for you to know times or seasons that the Father has fixed by his own authority. But you will receive power when the Holy Spirit has come upon you, and you will be my witnesses in Jerusalem and in all Judea and Samaria, and to the end of the earth." And when he had said these things, as they were looking on, he was lifted up, and a cloud took him out of their sight. And while they were gazing into heaven as he went, behold, two men stood by them in white robes, and said, "Men of Galilee, why do you stand looking into heaven? This Jesus, who was taken up from you into heaven, will come in the same way as you saw him go into heaven."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ४७: २-३,६-९
प्रतिसाद :   जयघोष होत असता देव वर गेला आहे.

१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा, 
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा!
 कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. 
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

२) जयघोष होत असता देव वर गेला आहे. 
कण्यांचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. 
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा;
 आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा.

३) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, 
तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
 देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.

Psalm 47:2-3, 6-7, 8-9 (R6)

God goes up with shouts of joy. 
The Lord goes up with trumpet blast.

All peoples, clap your hands.
Cry to God with shouts of joy! 
For the Lord, the Most High, is awesome, 
the great king over all the earth. R.

God goes up with shouts of joy.
The Lord goes up with trumpet blast.
Sing praise for God; sing praise!
Sing praise to our king; sing praise! R

God is king of all the earth.
Sing praise with all your skill.
 God reigns over the nations.
God sits upon his holy throne. R


दुसरे वाचन  इफिस १:१७-२३
वाचक :  पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 “परमेश्वराने येशूला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले."
आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे असे म्हणून त्यांला मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


Second reading : Ephesians 4:1-13

Brethren: I, a prisoner for the Lord, urge you to walk in a manner worthy of the calling to which you have been called, with all humility and gentleness, with patience, bearing with one another in love, eager to maintain the unity of the Spirit in the bond of peace. There is one body and one Spirit-just as you were called to the one hope that belongs to your call-one Lord, one faith, one baptism, one God and Father of all, who is over all and through all and in all. But grace was given to each one of us according to the measure of Christ's gift. Therefore it says, "When he ascended on high he led a host of captives, and he gave gifts to men." (In saying, "He ascended," what does it mean but that he had also descended into the lower regions, the earth? He who descended is the one who also ascended far above all the heavens, that he might fill all things.) And he gave the apostles, the prophets, the evangelists, the shepherds and teachers, to equip the saints for the work of ministry, for building up the body of Christ, until we all attain to the unity of the faith and Son of God, to mature manhood, to the measure of the stature of the knowledge of the of the fullness of Christ.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा;
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
 Go and make disciples of all nations, says the Lord; I am with you always, to the end of the age.


शुभवर्तमान मार्क  १६:१५-२०
वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  "प्रभू येशू वर स्वगीत घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील : ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.” ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता आणि घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करीत होता.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading: Mark 16: 15-20

At that time: [Jesus, appearing to the eleven, said tot hem, "Go into all the world and proclaim the gospel to the whole creation. Whoever believes and is baptized will be saved, but whoever does not believe will be condemned. And these signs will accompany those who believe: in my name they will cast out demons; they will speak in new tongues; they will pick up serpents with their hands; and if they drink any deadly poison, it will not hurt them; they will lay their hands on the sick, and they will recover." So then the Lord Jesus, after he had spoken to them, was taken up into heaven and sat down at the right hand of God. And they went out and preached everywhere, while the Lord worked with them and confirmed the message by accompanying signs.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:आज आपण प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहोत. मात्र स्वर्गरोहणाअगोदर प्रभू येशू आपल्या शिष्यांना जबबादारी किंवा कामगिरी सोपवतो आणि ती म्हणजे सुवार्तेची घोषणा करण्याची जबाबदारी. हि जबाबदारी पार पाडत असताना दोन अडथळे शिष्यांच्या वाटेला येऊ शकतात. आणि ते म्हणजे लोकांचा अविश्वास पणा आणि दुसरे म्हणजे विश्वास ठेवण्यास हट्टीपणा तसेच येशूची साक्ष देण्यास नकार. आज प्रभू येशू आपल्या शिष्यांना आवाहन करतो की, त्यांनी जावून संपूर्ण जगाला सुवार्तेची घोषणा करावी. कारण जे सुवार्तेवर विश्वास ठेवतील ते तारले जातील आणि जे नाहीत ते शिक्षेस पात्र ठरतील. म्हणून ह्या कार्यासाठी प्रभू येशू शिष्यांना शक्ती आणि सामर्थ्य बहाल करतो. प्रभू येशू आपल्या पित्याच्या उजवीस बसून आपली शक्ती आणि सामर्थ्य दाखवून देतो की, तो खरोखर देव आहे आणि तो जीवंत देव आहे. तो देवाचा पुत्र आहे आणि त्याची शुभवार्ता खरी आहे. अविश्वासू लोकांना ख्रिस्ताची शुभवार्ता प्रसारणासाठी आपण कोणते प्रयत्न केले आहेत ? पवित्र आत्म्याला ख्रिस्ताची सुवार्ता जगात पसरविण्यासाठी आपण होकार देऊन ख्रिस्तसभेचे शरीर बनतो का ?

प्रार्थना हे प्रभू येशू, स्वर्गराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला कृपा व सामर्थ्य दे, आमेन.

✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या