Marathi Bible Reading | 7th Week of Easter Tuesday 14th May 2024

पुनरुत्थान सातवा   सप्ताह  

मंगळवार दि. १४ मे  २०२४ 

 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे.You did not choose me, but I chose you and appointed you that you should go and bear fruit

✝️


 संत मत्थियास

- प्रेषित आणि रक्तसाक्षी (पहिले शतक)


संत मत्थियास विषयीची माहिती आपल्याला प्रेषितांची कृत्ये अध्याय १ मध्ये वाचावयास मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर ज्युदासची जागा भरून काढण्यासाठी अकरा प्रेषितांनी चिठ्ठ्या टाकून निवड केली.
संत मत्थियास हा ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यापासून स्वर्गारोहणापर्यंतच्या सर्व घटनांचा साक्षीदार होता. एका ख्रिस्ती परंपरेनुसार संत मत्थियास ह्याने यहुदीया व इथिओपिया येथे ख्रिस्ताची सुवार्ता पसरविताना क्रुसावरील मरण पत्करले. तर काहींच्या मते त्याचा येरुशलेममध्ये शिरच्छेद करण्यात आला.
संत मत्थियास हा शिंपी, सुतार आणि व्यसनमुक्त लोकांचा आश्रयदाता आहे. देवी रोगावर उपचार म्हणून त्याचा धावा केला जात होता.
 

✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १:१५-१७,२०,२६
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन  
“मथियासची चिट्ठी निघाली, तेव्हा त्याला अकरा 
प्रेषितांबरोबर गणण्यात आले."
पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये ) 
उभा राहून म्हणाला, "बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट 
दाखवणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदच्या मुखावाटे 
जे भविष्य वर्तविले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. त्याची आपल्यामध्ये 
गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता. 
स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे,
'त्याचे घर उजाड पडो,
आणि त्यात कोणीही न राहो' आणि
‘त्याचा हुद्दा दुसरा घेवो.'
म्हणून योहानच्या स्नानसंस्कारापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला
 आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपणामध्ये 
येत जात असे त्या सगळ्या काळात, ही जी माणसे आपल्या 
संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या 
पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.” तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते 
तो बर्सबा म्हटलेला योसेफ आणि मथियास, ह्या दोघांना त्यांनी पुढे 
आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली : "हे सर्वांची हृदये जाणणाऱ्या 
प्रभू, हे सेवकपद आणि प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या 
यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस 
ते दाखव." मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्या टाकल्यावर मथियासची 
चिट्ठी निघाली, तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 1:15-17, 20-26
In those days Peter stood up among the brothers (the company of persons was in all about one hundred twenty), and said, "Brothers, the Scripture 14 was to be fulfilled, which the Holy Spirit spoke beforehand by the mouth of David concerning Judas, who became a guide to those who arrested Jesus For he was numbered among us and was allotted his share in this ministry." "For it is written In the Book of Psalms, 'May his camp become desolate, and let there be no one to dwell in it'; and 'Let another take his office. So one of the men who have accompanied us during all the time that the Lord Jesus went in and out among us, beginning from the baptism of John until the day when he was taken up from us - one of these men must become with us a witness to his resurrection." And they put forward two, Joseph called Barsabbas, who was also called Justus, and Matthias. And they prayed and said, "You, Lord, who know the hearts of all, show which one of these two you have chosen to take the place in this ministry and apostleship from which Judas turned aside to go to his own place." And they cast lots for them, and the lot fell on Matthias, and he was numbered with the eleven apostles.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११३: १-८
प्रतिसाद :   परमेश्वर गरिबांना आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो.  किंवा आलेलुया !

१) परमेश्वराचे स्तवन करा.
परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा,
 परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. 
येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो.

२) सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत
 परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. 
परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे, 
त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.

३) परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी
राजासनारूड आहे, जो आकाश आणि 
पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवून पाहतो,
 त्याच्यासारखा कोण आहे ?

४ ) तो कंगालांना धुळीतून उठवतो, 
गरिबांना उकिरड्यावरून उचलतो 
आणि त्यांना अधिपतींच्या,
पंक्तीला बसवतो.

Psalm 113:16-2, 3-8

R The Lord set them with the princes of his people.

Praise, O servants of the Lord, 
praise the name of the Lord! 
May the name of the Lord be blest 
both now and forevermore! R 

From the rising of the sun to its setting,
praised be the name of the Lord!
High above all nations is the Lord, 
above the heavens his glory. R

Who is like the Lord, our God, 
who dwells on high, 
who lowers himself to look down 
upon heaven and earth? R

From the dust he lifts up the lowly,
from the ash heap he raises the poor, 
to set them in the company of princes,
yes, with the princes of his people. R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला निवडले आणि
तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, 
तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
आलेलुया !

Acclamation: 
 I chose you from the world that you should go and 
bear fruit and that your fruit should abide, says the Lord.

शुभवर्तमान   योहान १५:९-१७
वाचक :  योहानलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हावर प्रेम केले आहे, तुम्ही माझ्या प्रेमात राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रेमात राहाल. माझा आनंद तुम्हांमध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
“जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे. ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:John 15:9-17

At that time: Jesus said to his disciples, "As the Father has loved me, so have I loved you. Abide in my love. If you keep my commandments, you will abide in my love, just as I have kept my Father's commandment and abide in his love. These things I have spoken to you, that my joy may be in you, and that your joy may be full. "This is my commandment, that you love one another as I have loved you. Greater love has no one than this, that someone lay down his life for his friends. You are my friends if you do what I command you. No longer do I call you servants, for the servant does not know what his master is doing: but I have called you friends, for all that I have heard from my Father I have made known to you. You did not choose me, but I chose you and appointed you that you should go and bear fruit and that your fruit should abide, so that whatever you ask the Father in my name, he may give it to you. These things I command you, so that you will love one another.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनसंत मथियासने यार्देन नदीत बाप्तीस्मा स्विकारला आणि तेव्हापासून तो येशूचा शिष्य बनला. जेव्हा जुदासने आत्महत्या केली तेव्हा त्याची जागा भरून काढण्यासाठी बारावा प्रेषित म्हणून मथियासची निवड झाली. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना सांगतो की, पिता जसे येशूवर प्रेम करतो तसे तो त्यांच्यावर प्रेम करतो. तो त्यांना आग्रह करतो की, जर ते त्याच्या आज्ञा पाळतील तर ते त्याच्या प्रेमात राहतील आणि जर त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या तर ते येशूचे मित्र होतील. तसेच येशू त्यांना आठवण करून देतो की, त्यांनी त्याला निवडले नाही तर येशूने त्यांना फळ देण्यासाठी निवडले. त्याची आशा आहे की, त्यांचे फळ कायम राहील आणि त्यांना जर भरपूर फळ मिळाले तर पित्याकडे केलेल्या त्यांच्या मांगण्या मान्य केल्या जातील. ज्याप्रमाणे येशूच्या प्रेमाची आज्ञा पाळून संत मथियास फळ स्वरूपी झाला. तशाचप्रकारे आपण देखील आपल्या जीवनात देवाच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहतो का ? फळ स्वरूपी होतो का ?

प्रार्थना : हे प्रभू, तुझ्या मळ्यात सेवाकार्य करण्यास मला प्रेरणा दे, तुझ्या सुवार्ता प्रसाराचे मला साधन बनव, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या