सामान्य काळातील
एकोणिसावा रविवार
११ऑगस्ट २०२४
"मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे,"
"I am the bread that came down from heaven."

"स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे,"
परमेश्वराचा संदेष्टा एलीया हा निराश अवस्थेत रानातून चालला असताना त्याला भूक लागली तेव्हा देवाच्या दूताने त्याला भाकर व पाणी दिले. त्याच अन्नच्या पोषणावर एलीया चाळीस दिवस व चाळीस रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. परमेश्वराने जशी श्रद्धावान व निष्ठावान एलीयाची काळजी घेतली तशीच तो एकनिष्ठ भक्तगणांची काळजी वाहत असतो.
' प्रभू येशू सार्वकालिक जीवनासाठी लागणारे आवश्यक पोषण म्हणजेच स्वतःचे शरीर आध्यात्मिक अन्न म्हणून आपल्याला देत आहे. प्रभू म्हणत आहे की, 'ह्या भाकरीतून जो खाईल तो सर्वकाळ जगेल. ' क्रुसावरील बलिदानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शरीर व रक्ताने आपले सर्वांचे तारण केले आहे. म्हणजेच आपल्या आध्यात्मिक पोषणासाठी प्रतिकात्मक रुपाने त्याने त्याचे शरीर अति पवित्र साक्रामेंतात ठेवले आहे. प्रत्येक मिस्सा बलीदानातून प्रभू येशू त्याच भाकरीच्या रुपाने आपल्याला मिळतो. त्या स्वर्गीय जिवंत भाकरीचे आपण सेवन करुन आपण आपले आध्यात्मिक पोषण करुन सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र ठरु शकतो.
प्रभू येशू आपल्या जीवनाची स्वर्गीय भाकर आहे. त्याची अमृत वचने, त्याची प्रीतिची आज्ञा आणि बलिदानाचे रहस्य जाणण्यास व सुवार्तेचे साक्षीदारबनण्यास आपण प्रयत्नशील बनू या.
पहिले वाचन : १ राजे १९:४-८
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"देवाचा डोंगर होरेब येथे तो पोहचेपर्यंत अन्नाच्या बळावर चालत गेला."
एलिया स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडूपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, "हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही." मग तो रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला; तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, "ऊठ, हे खा." त्याने पाहिले तो निखाऱ्यांवर भाजलेली एक भाकर आणि पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे, असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, "ऊठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे." त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Kings 19:4-8
In those days: Elijah went a day's journey into the wilderness and came and sat down under a broom tree. And he asked that he might die, saying, "It is enough; now, O LORD, take away my life, for I am no better than my fathers." And he lay down and slept under a broom tree. And behold, an angel touched him and said to him, "Arise and eat." And he looked, and behold, there was at his head a cake baked on hot stones and a jar of water. And he ate and drank and lay down again. And the angel of the LORD came again a second time and touched him and said, "Arise and eat, for the journey is too great for you." And he arose and ate and drank, and went in the strength of that food forty days and forty nights to Horeb, the mount of God.
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र ३३:२- ९
प्रतिसाद : परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
१) मी परमेश्वराला सर्वदा धन्यवाद देईन,
माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल,
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील,
दीनजन हे ऐकून हर्ष करतील.
२ )तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा.
आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णू या.
मी परमेश्वराला शरण गेलो आणि
त्याने माझा स्वीकार केला,
त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.
३) ज्यांनी त्यांच्याकडे पाहिले ते प्रकाशित झाले,
त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
ह्या गरीब माणसाने धावा केला;
परमेश्वराने ते ऐकला आणि
त्यांच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.
४) परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती
छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो.
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य!
Psalm 34:2-3, 4-5, 6-7, 8-9 (R: 9a)
Taste and see that the Lord is good.
I will bless the Lord at all times,
praise of him is always in my mouth.
In the Lord my soul shall make its boast;
the humble shall hear and be glad. R
Glorify the Lord with me;
together let us praise his name.
I sought the Lord, and he answered me;
from all my terrors he set me free. R
Look towards him and be radiant;
let your faces not be abashed.
This lowly one called; the Lord heard,
and rescued him from all his distress. R
The angel of the Lord is encamped
around those who fear him, to rescue them.
Taste and see that the Lord is good.
Blessed the man who seeks refuge in him. R.
दुसरे वाचन इफिस ४:३०-५:२
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ४:३०-५:२
"ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीती केली, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. "
देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसांपर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहा. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला आणि निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.
सर्व : देवाला धन्यवाद..
Second reading : Ephesians 4:30-5:2
Brethren: Do not grieve the Holy Spirit of God, by whom you were sealed for the day of redemption. Let all bitterness and wrath and anger and clamour and slander be put away from you, along with all malice. Be kind to one another, tenderhearted, forgiving one another, as God in Christ forgave you. Therefore be imitators of God, as beloved children. And walk in love, as Christ loved us and gave himself up for us, a fragrant offering and sacrifice to God.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतः चक्षु प्रकाशित करो, म्हणजे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही आम्ही ओळखावी.
Acclamation:
I am the living bread that came down from heaven, says the Lord; if any one eats of this bread, he will live for ever.
शुभवर्तमान योहान ६:४१-५१
वाचक: योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे."
"मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे," असे येशू म्हणाला, म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले.. ते म्हणाले, “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफचा पुत्र येशू आहे ना?" तर मग, “मी स्वर्गातून उतरलो आहे" असे आता तो कसे म्हणतो ? येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसांत कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मात्रा खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: John 6:41-51
At that time: The Jews grumbled about Jesus, because he said,
"I am the bread that came down from heaven." They said, "Is not this Jesus, the son of Joseph whose father and mother we know? How does he now say, 'I have come down from heaven'?" Jesus answered them, "Do not grumble among yourselves. No one can come to me unless the Father who sent me draws him. And I will raise him up on the last day. It is written in the Prophets, 'And they will all be taught by God.' Everyone who has heard and learned from the Father comes to me-not that anyone has seen the Father except he who is from God; he has seen the Father. Truly, truly, I say to you, whoever believes has eternal life. I am the bread of life. Your fathers ate the manna in the wilderness, and they died. This is the bread that comes down from heaven, so that one may eat of it and not die. I am the living bread that came down from heaven. If anyone eats of this bread, he will live forever. And the bread that I will give for the life of the world is my flesh."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: " आजच्या पहिल्या वाचनात एलिया संदेष्टा देवाला त्याचा जीव घेण्यास सांगत आहे. तो खूप धाडसी आणि शक्तीशाली संदेष्टा होता. तो अत्यंत निष्ठेने देवाचे कार्य करीत होता. पण राणी जेझबेलने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो खूप घाबरला होता. देवाचे कार्य करण्याची त्याच्यातील उमेद आणि ऊर्जा नाहीशी होत चालली होती. तेव्हा देवाच्या दुताने त्याला निखाऱ्यावर भाजलेली भाकर खायला दिली. ती भाकर खाऊन त्याला ऊर्जा प्राप्त झाली. त्याने चाळीस दिवस आणि चाळीस रात्री पायी प्रवास केला आणि देवाचा डोंगर चढला. आजच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे.ती भाकर खाणाऱ्यांस सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. येशूचे पवित्र शरीर आपणांस देवराज्य प्रस्थापित करण्यास ऊर्जा देते, स्फूर्ती देते. प्रत्येक मिस्साबलीदानात आपण या भाकरीचे सेवन करतो. ह्याच मिस्साबलिदानात आपल्याला क्षमेचे आणि शांतीचे दान मिळते. हिच क्षमा-शांती इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी येशूचे पवित्र शरीर आपल्याला ऊर्जा देते. येशूचे पवित्र शरीर स्विकारल्यावर माझे आचरण कसे असते. ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, स्वर्गीय भाकरीचा आम्हाला ध्यास लागावा व तुझी साक्ष इतरांना देता यावी म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या