सामान्य काळातील अठरावा आठवडा
शनिवार १० ऑगस्ट २०२४
गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.unless a grain of wheat falls into the earth and dies, it remains alone, but if it dies, it bears much fruit.
पोप सिक्स्टस दुसरे ह्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांचा चां अटक करण्यात आली. तीन दिवसानंतर त्याला तेलाच्या त्यात हळू तळण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी त्यांचे जीवनचरित्र लिहिणारे संत आंब्रोज ह्यांच्या मते सरिन्स ह्यांनी आपली सर्व मालमत्ता सम्राट व्हेलेरियन यांच्या चरणाशी आणून ठेवावी म्हणून सम्राटाने त्यांना आदेश दिलेला होता. परंतु सरिन्स ह्यांनी आपली सर्व मालमत्ता गोरगरिबांना वाटून टाकली आणि सर्वोत्तम संपत्ती म्हणून त्याने स्वतःला ख्रिस्तसभेच्या कार्याला वाहून घेतले.
डिकन लॉरेन्स ह्यांच्या या वर्तनामुळे संतप्त झालेल्या सम्राटाने त्याला १० ऑगस्ट इ.स. २५८ रोजी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. डिकन रिन्स अत्यंत विनोदी स्वभावाचे होते. त्यांना उकळत्या तेलामध्ये तळले जात असताना त्याने आपल्या मारेकल्यांना सांगितले, माझी एक बाजू तळून झाली आता मला फिरवून दुसरी बाजू तळून काढा.
पुढे तिवोलीला जाणान्या रस्त्यालगत त्याच्या थडग्यावर 'कॉन्टन्टाईन द ग्रेट' ह्या सम्राटाने एक छोटेखानी सभागृह उभारले. पाचव्या सातव्या शतकात तिथेच "संत लॉरेन्स बियाँड-द-वॉल्स" हे महामंदिर बांधण्यात आले. रोममध्ये असलेल्या सात मुख्य चर्चेसमध्ये संत लॉरेन्स महामंदिराचा आजदेखील समावेश केला जातो.
नवा जन्म म्हणजेच ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती. गहू किंवा कोणतेही बीज जमिनीत लावल्यावर त्या बीजाला आपला जुना आकार व जुन्या जीवनाचा त्याग करावा लागतो. जुन्याचा ऱ्हास होतो आणि त्यातून नवा अंकूर उगवतो. त्या अंकुराची जोपासना केल्याने त्याचे रोपटे होते. कालांतराने त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होऊन त्याला फळे लागतात.
ख्रिस्ती जीवन फलदायी बनविण्यासाठी आत्मत्याग व बलिदान करावे लागते.
ख्रिस्तसभा आज संत लॉरेन्सचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. स्वार्थत्याग करुन गरिबांसाठी तळमळीने सेवाकार्य करणाऱ्या लॉरेन्सला मृत्यू आला, परंतु त्याच्या सेवाकार्याला चांगुलपणाचे पीक आले. संत लॉरेन्स हा गरिबांचा आणि स्वयंपाक्यांचा आश्रयदाता असून आग आटोक्यात आणण्यासाठी त्याचा धावा केला जातो. आपल्या जीवनात चांगुलपणाची फलप्राप्ती व्हावी, म्हणून प्रभू येशू आज आत्मत्यागाचे आवाहन करीत आहे.
✝️
पहिले वाचन : २ करिंथ ९ : ६-१०
वाचक :पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.'
जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मापाने कापणी करील. प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरवल्याप्रमाणेच द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
"तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांना दानधर्मकरत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुगे राहते,”
असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :2 Corinthians 9:6-10
Brethren Whoever sows sparingly will also map sparingly and whoever sows bountifully will also reap bountifully Each one must give as he has decided in his heart, not reluctantly or under compulsion for God loves a cheerful giver. And God is able to make all grace abound to you, so that having all sufficiency in all things at all times, you may abound in every good work. As it is written. "He hus distributed freely, he has given to the poor, his righteousness endures forever" He who supplies seed to the sower and bread for food will supply and multiply your seed for sowing and increase the harvest of your righteousness.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११२:१-२,५-९
प्रतिसाद : जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते.
१) परमेश्वराचे स्तवन करा.
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य !
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल,
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.
२) जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो
त्याचे कल्याण होते,
तो न्यायाने आपले व्यवसाय करील.
तो कधीही ढळणार नाही,
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.
३) तो वाईट बातमीला भिणार नाही,
त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते,
त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत
आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.
४) त्याने सढळ हाताने गरिबांस दानधर्म केला आहे,
त्याचे नीतिमत्व सर्वकाळ राहील.
त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.
Psalm 112:15-2, 5-6, 7-8,9
It goes well for the man who deals generously and lands.
Blessed the man who fears the Lord.
who takes great delight in his commandments.
His descendants shall be powerful on earth
the generation of the upright will be blest. R
It goes well for the man who deals generously and lends,
who conducts his affairs with justice
He will never be moved
forever shall the just be remembered. R
He has no fear of evil news
with a firm heart, he trusts in the Lord.
With a steadfast heart he will not fear;
he will see the downfall of his foes. R
Open-handed, he gives to the poor;
his justice stands firm forever.
His might shall be exalted in glory. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
Acclamation:
I am the light of the world, says the Lord,
whoever follows me will have the light of life
शुभवर्तमान योहान १२:२४-२६
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल, जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा सन्मान करील."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :John 12:24-26
At that time: Jesus said to his disciples, "Truly, truly, I say to you, unless a grain of wheat falls into the earth and dies, it remains alone, but if it dies, it bears much fruit. Whoever loves his life loses it, and whoever hates his life in this world will keep it for eternal life If anyone serves me, he must follow me, and where I am, there will my servant be also If anyone serves me, the Father will honour him."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: गव्हाचा दाणा किंवा कुठलेही बी जमिनीत पडल्यावर त्याला आत्मबलिदान करावे लागते. तेव्हाच भरपूर पीक येते. आत्मबलिदान केले नाही तर ते बी एकटेच राहते. आत्मबलिदान किंवा त्याग वृत्ती ही प्रत्येक बी मध्ये असते. येशू ख्रिस्त गव्हाच्या दाण्याचे उदाहरण देऊन त्याच्या मिशन कार्याची ओळख करून देतो. हा त्याग किंवा आत्मबलिदान करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे तीच व्यक्ती येशूची सुवार्ता पसरविण्यास योग्य आहे. संत पौल म्हणतो, जो स्वखुशीने, संतोषाने व सढळ हस्ते इतरांना मदत करतो त्याच्यावर परमेश्वराची कृपा सतत असते. आपणही स्वखुशीने आणि संतोषाने येशूच्या कार्याची वाढ करण्यास तत्पर असावे अशी त्याची इच्छा आहे. आज आपण संत लॉरेन्स, डीकन व रक्तसाक्षी यांचा सण साजरा करीत आहोत. सर्व गरीब, दिन-दुबळे आणि आजारी हे ख्रिस्तसभेची संपत्ती आहेत असे मानून त्याने त्यांची सेवा केली व त्याच्या करीता तो गव्हाचा दाणा बनला. आपण ख्रिस्तासाठी कोणत्या प्रकारचे बलिदान आणि त्याग करण्यास तयार आहोत ?
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, स्वतःवरच केवळ प्रीति न करता आमच्यामध्ये परोपकाराची वृत्ती वाढीस लागावी म्हणून आम्हास कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या