Marathi Bible Reading | Friday 9th August 2024 | 18th Week In Ordinary Time

सामान्य काळातील अठरावा आठवडा

शुक्रवार ९ ऑगस्ट  २०२४ 

मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ ? 

For what will it profit a man if he gains the whole world and forfeits his soul? 


 नॉर्थुम्ब्रियाचे संत ऑझ्वल्ड
- रक्तसाक्षी ( ६४२)


पवित्र क्रुसाच्या भक्त संत तेरेसा बेनेडिक्टा 

रक्तसाक्षी 

पहिले वाचन :नहूम १:१५;२.२, ३:१-३.६-७
वाचन : नहूम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"रक्तपिपासू नगरीचा धिक्कार असो."

शुभसंदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतांवर पाहा! हे यहुदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. कारण परमेश्वर याकोबचे ऐश्वर्य इस्राएलच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापीत आहे; लुटारूंनी त्यांना लुटले आहे, त्यांच्या द्राक्षमळ्याची नासधूस केली आहे.
रक्तपाती नगरीचा धिक्कार असो! कपट आणि खून यांनी ती भरली आहे, तिचे भक्ष्य मिळवणे थांबत नाही. चाबकांचा फटकारा, चाकांचा घडघडाट यांचा शब्द होत आहे; घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहेत. घोडेस्वारांची दौड, तलवारीची चमक, भाल्याचे विजेसारखे चकाकणे होत आहे; वधिलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे; मढ्यांचा हिशेबच नाही; लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात.
मी तुझ्यावर घाण फेकून तुला तुच्छ करीन, तुला उपहासविषय करीन आणि असे होईल की कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पण काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील ? तुझे सांत्वन करणाऱ्यांना कोठून शोधून आणू ?
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Nahum 1:15; 2:2; 3:1-3, 6-7

Behold, upon the mountains, the feet of him who brings good news, who publishes peace! Keep your feasts, O Judah; fulfil your vows, for never again shall the worthless pass through you; he is utterly cut off. For the Lord is restoring the majesty of Jacob as the majesty of Israel, for plunderers have plundered them and ruined their branches. Woe to the bloody city, all full of lies and plunder - no end to the prey! The crack of the whip, and rumble of the wheel, galloping horse and bounding chariot! Horsemen charging, flashing sword and glittering spear, hosts of slain, heaps of corpses, dead bodies without end - they stumble over the bodies! I will throw filth at you and treat you with contempt and make you a spectacle. And all who look at you will shrink from you and say, "Wasted is Nineveh; who will grieve for her?" Where shall I seek comforters for you?
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : अनुवाद ३२:३५-३६, ३९, ४१
प्रतिसाद : प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे.

१) त्यांचा संकटकाल जवळ आला आहे; 
त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकरच येत आहेत.
 हे परमेश्वर पाहील तेव्हा तो 
आपल्या लोकांचा न्याय करील, 
त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
माझ्याशिवाय कोणी देव नाही.

२) आता पाहा, मी, मीच तो आहे, 
प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे; 
माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.

३) मी आपली चमकणारी तलवार पाजळली, 
मी न्याय हाती घेतला,
तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन,
माझ्या वैऱ्यांचे उसने फेडीन.
 
Deuteronomy 32:35cd-36ab, 39abcd, 41 
 R. It is I who deal death and give life.

For the day of their calamity is at hand, 
and their doom comes swiftly.' 
For the Lord will vindicate his people 
and have compassion on his servants.

"See now that I, even I, am he, 
and there is no god beside me; 
I kill and I make alive; 
I wound and I heal." R

If I sharpen my flashing sword 
and my hand takes hold on judgment, 
I will take vengeance on my adversaries 
and will repay those who hate me. R 


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत; 
ते सदासर्वकाळ अढळ आहेत. 
 आलेलुया!

Acclamation: 
 Blessed are those who are persecuted for righteousness' sake, for theirs is the kingdom of heaven.

शुभवर्तमान  मत्तय  १६ : २४-२८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?"
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा आणि आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार ? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. मी तुम्हाला नक्कीच सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :
Matthew 16:24-28

At that time: Jesus told his disciples, "If anyone would come after me, let him deny himself and take up his cross and follow me. For whoever would save his life will lose it, but whoever loses his life for my sake will find it. For what will it profit a man if he gains the whole world and forfeits his soul? Or what shall a man give in return for his soul? For the Son of Man is going to come with his angels in the glory of his Father, and then he will repay each person according to what he has done. Truly, I say to you, there are some standing here who will not taste death until they see the Son of Man coming in his kingdom."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:येशूचे शिष्य होण्यासाठी निःस्वार्थी सेवाभाव, वचनबद्धता, निष्ठा आणि
आत्मसमर्पण या गुणांची आवश्यकता आहे. स्वकेंद्री आणि स्वार्थी स्वभावाची, स्वतःच्याच जगात वावरणारी माणसे येशूचे शिष्य होऊ. शकत नाही. येशूने कालवारीपर्यंत क्रूस वाहिला आणि या प्रवासात त्याने वैयऱ्यांना क्षमा केली, रडणाऱ्यांचे सांत्वन केले, पश्चात्तापी चोराला स्वर्गाचे अभिवचन दिले. मरेपर्यंत त्यांने दुसऱ्यांच्याच हिताचा विचार केला. अशाप्रकारचे कुस येशूचे शिष्य होऊ पाहणाऱ्यांना रोजच वाहावे लागतील आणि हे कुस वाहाण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनीच येशूला अनुसरावे. कुसभक्त संत तेरेजा बेनेडिक्टा हिने येशूच्या कुसाची भक्ती केली आणि बऱ्याच जणांना येशूच्या कुसाचे महत्त्व पटवून दिले. येशूचा क्रूस वाहणे म्हणजेच त्याच्या प्रेम, दया, क्षमा व शांतीचा अवलंब करणे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण येशूचा क्रूस वाहण्याचा प्रयत्न करतो का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनातील वधस्तंभ वाहण्यास व तुला अनुसरण्यास आम्हाला शक्ती व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या