सामान्य काळातील
एकविसावं रविवार
२५ ऑगस्ट २०२४
देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.”
that you are the Holy One of God."
परमेश्वर पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या दयेचा, क्षमेचा व प्रेमाचा संदेश देऊन सार्वकालिक जीवनाचा महा मंत्र दिला. मात्र अनेकांचा विश्वास अपूरा पडला. अनेकांना येशूची शिकवण अमलात आणता आली नाही. तर काहींजण प्रभू येशू पासून फरकत घेऊन मार्गस्थ झाले. स्तोत्रत म्हटले आहे, 'ज्यांस तुझ्या नावाची ओळख आहे ते तुजवर भाव ठेवतील' (स्तोत्र १:१०). आजच्या शुभवर्तमानावर चिंतन करीत असताना आपण आत्मापरिक्षण करु या. प्रभू पासून आपण बहकलो असल्यास त्याला शरण जाऊ या. त्याच्या राजासना समोर लोटांगण घालू या.
संत पौल अजच्या दुसऱ्यावाचनात आपल्याला जाणीव करून देत आहे कि आपण सर्वजण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. प्रभूच्या दये विना व कृपेविना आपले जीवन शुन्य आहे. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात प्रभू येशूला व त्याच्या शिकवणुकीला प्राधान्य देऊन प्रभूच्या सहवासाचा अनुभव घेऊ या.
Thanks be to God
Thanks be to God
"आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत."
येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळजण येशूचा हा उपदेश ऐकून म्हणाले, “हे वचन कठीण आहे, हे कोण घेऊ शकतो ?" आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय ? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता, तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर ? आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहेत. तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत." कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणांला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही." ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?" शिमोन पेत्रने उत्तर दिले, “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत, आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.”
0 टिप्पण्या