सामान्य काळातील विसावा सप्ताह
शनिवार २४ ऑगस्ट २०२४
“पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही.”
Behold, an Israelite indeed, in whom there is no deceit!"
संत बार्थोलोम्यू
प्रेषित, रक्तसाक्षी (पहिले शतक)
बार्थोलोम्यू म्हणजे 'थोलोमीचा पुत्र. संत योहानच्या शुभवर्तमानातील पहिल्याच अध्यायात ज्या नथनेलला फिलिप्पने येशूकडे आणले त्यालाच बार्थोलोम्यू असे मानले जाते. येशूने त्याच्याकडे पाहताच 'हा खराखुरा इस्त्रायली आहे. ह्याच्याठायी कपट नाही' असे म्हटले होते. मात्र ह्या प्रेषिताविषयी पुरेशी माहिती इतिहासात उपलब्ध नाही.
तो गालिलातील काना गावचा असावा. त्याने अरेबियामध्ये येशूची सुवार्ता सांगितली. त्याला आर्मेनिया येथे जिवंत जाळून ठार केले गेले..
ऑरिजेन ह्या धर्मपंडिताचा गुरू पॅन्टेनिअस हा दुसऱ्या शतकात भारतात येऊन गेला. त्यावेळी त्याला कळले की, बार्थोलोम्यू त्याच्याही आधी भारतात आलेला होता. त्याने संत मत्तयचे हिब्रू भाषेतील शुभवर्तमान भारतात आणले होते.
गेली एक हजार वर्षे त्याचे अवशेष रोम शहरातील तिबेर बेटावरील एका चर्चमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. संत बार्थोलोम्यू हा गवंडी, चांभार आणि मटणविक्रेते ह्यांचा आश्रयदाता संत आहे. फिट्स येणाऱ्या माणसाला आराम पडण्यासाठी त्याचा धावा केला जातो.
स्वर्गीय नगरीवर देवदुतांचा पहारा व प्रेषितांच्या नावांचा उल्लेख नगरीच्या तटावरील वेशीवर होता, असा दृष्टांत योहानाला झालेला प्रकटीकरातून वर्णन करण्यात आला आहे.
नथनेलने प्रभूवर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा स्वामी म्हणून स्वीकारले. त्याच्याठायी कपट नव्हते, त्याने खऱ्या अंत:करणापासून प्रभूच्या सुवार्तेचे कार्य केले. प्रभू येशूची सुवार्ता सांगत असताना त्याला जिवंत जाळून ठार मारण्यात आले. नथनेल अर्थात बार्थोलोमिओ प्रभूच्या स्वर्गराज्यात स्वर्गीय येरुशलेममध्ये स्वर्गदुतांसंगे विराजमान झाला.
देवाची सुवार्ता घोषविणाऱ्यांना प्रभू येशूने स्वर्गराज्याचे अभिवचन दिलेले आहे. आपण संपूर्ण शक्तीने व विश्वासाने प्रभू येशूची शिकवण आत्मसात करुन सुवार्ता पसरविण्यास व देवाचे सेवाकार्य करण्यास प्रभूकडून कृपा व प्रेरणा मागू या.
पहिले वाचन : प्रकटीकरण २१:९-१४
वाचक : प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"बारा पायांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा वे होती."
देवदूत माझ्याबरोबर बोलला, तो म्हणाला, “ये, वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो.” तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठया उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठायी देवाचे तेज होते, तिची कांती अतिमोलवान रत्नासारखी होती, ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता, त्याला बारा वेशी होत्या आणि वेशींजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती, ती इस्राएलच्या संतानाच्या बारा वंशांची होती. पूर्वेकडे तीन वेशी, उत्तरेकडे तीन वेशी, दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.
First Reading : Revelation 21:9b-14
An angel spoke to me, saying, "Come, I will show you the Bride, the wife of the Lamb," And he carried me away in the Spirit to a great, high mountain, and showed me the holy city Jerusalem coming down out of heaven from God, having the glory of God, its radiance like a most rare jewel, like a jasper, clear as crystal. It had a great, high wall, with twelve gates, and at the gates twelve angels, and on the gates the names of the twelve tribes of the sons of Israel were inscribed - on the east three gates, on the north three gates, on the south three gates, and on the west three gates. And the wall of the city had twelve foundations, and on them were the twelve names of the twelve apostles of the Lamb.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४५:१०-१३,१७-१८
प्रतिसाद : प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य जाहीर करतात.
१) हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणीमात्र तुझी स्तुती गातात,
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात
आणि तुझा पराक्रम कथन करतात.
२) ते तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य
ही मानवजातीला जाहीर करतात.
तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे,
तुझा राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.
३) परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे,
तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
जे कोणी त्याचा धावा करतात,
जे मनापासून त्याचा धावा करतात,
त्या सर्वांच्या तो समीप आहे.
Psalm 145:10-13,17-18
R Your saints, O Lord, make known the glory of your reign.
All your works shall thank you,
O Lord, and all your faithful ones bless you.
They shall speak of the glory of your reign,
and declare your mighty deeds. R
To make known your might to the children of men,
and the glorious splendour of your reign.
Your kingdom is an everlasting kingdom;
your rule endures for all generations. R
The Lord is just in all his ways.
and holy in all his deeds.
The Lord is close to all who call him,
who call on him in truth.R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलचे राजे आहात.
Acclamation:
Rabbi, you are the Son of God! You are the King of Israel
शुभवर्तमान योहान १:४५-५१
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही !"
फिलिपला नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, "ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टयांनी लिहिले तो म्हणजे योसेफचा मुलगा येशू नाझरेथकरआम्हांला सापडला आहे." नथनेल त्याला म्हणाला, “नाझरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” फिलिप त्याला म्हणाला, “येऊन पाहा.” नथनेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही.” नथनेल त्याला म्हणाला, "आपणाला माझी ओळख कोठली?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले” नथनेल त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलचे राजे आहा.' येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठया गोष्टी पाहशील." आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.' "
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :John 1:45-51
At that time: Philip found Nathanael and said to him, "We have found him of whom Moses in the Law and also the prophets wrote, Jesus of Nazareth, the son of Joseph" Nathanael said to him, "Can anything good come out of Nazareth?" Philip said to him, "Come and see." Jesus saw Nathanael coming towards him and said of him, "Behold, an Israelite indeed, in whom there is no deceit!" Nathanael said to him, "How do you know me?" Jesus answered him, "Before Philip called you, when you were under the fig tree, I saw you." Nathanael answered him, "Rabbi, you are the Son of God! You are the King of Israel!" Jesus answered him, "Because I said to you, I saw you under the fig tree, do you believe? You will see greater things than these." And he said to him, "Truly truly, I say to you, you will see heaven opened, and the angels of God ascending and descending on the Son of Man."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
नाझरेथ हे एक छोटेसे गाव होते. त्यांची प्रसिद्धी तेवढी नव्हती. त्या गावातून एकही संदेष्टा उदयास आला नव्हता. आजच्या शुभवर्तमानात नथनेल म्हणतो, नाझरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय ? म्हणजे प्रत्येकाने गृहीत धरले होते की, नाझरेथ गावातून चांगल्या गोष्टी उत्पन्न होऊ शकत नाही. परंतु येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहिल्यावर, त्याच्याशी संभाषण केल्यावर नथनेलला आपले शब्द मागे घ्यावे लागले आणि त्याने येशूला म्हटले, "आपण देवाचे पुत्र आहात, इसरायलचे राजे आहात." प्रत्येकाला येशूचा सहवास हवाहवासा वाटतो. त्याच्याशी बोलायला आवडते. आपली गाऱ्हाणी सांगून मन मोकळे करायला आवडते. येशूलाही लोकांची सोबत आवडते. जे लोक येशूवर विश्वास ठेवतात, त्याच्या शिकवणुकीनुसार वागतात त्या सर्वांना येशू विशेष आशीर्वाद देतो. आपण येशू समवेत राहतो का? त्याच्याशी बोलतो का? आज आपण संत बार्थोलोम्यु येशूचा प्रेषित याचा सण साजरा करीत आहोत. त्याला नथनेल असेही म्हणतात. संत बार्थोलोम्यु म्हणतात, "पवित्रता ही देवाने आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे. ती पवित्रता स्वतःकडेच न ठेवता इतरांबरोबर वाटून घेतली पाहिजे."
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या स्वर्गराज्याचे वारसदार बनण्यास आम्हाला पात्र बनव. तुझा शब्द आत्मसात करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या