Marathi Bible Reading | Friday 23rd August 2024 | 20th Week in Ordinary Time

सामान्य काळातील विसावा सप्ताह 

शुक्रवार २३ ऑगस्ट  २०२४

तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतः सारखी प्रीती कर."

You shall love your neighbour as yourself.



लिमाची संत रोझ 
कुमारिका (१५८६-१६१७)

पेरू देशाची राजधानी लिमा येथे एका गरीब घराण्यात इजाबेला डी फ्लोरेझ हिचा जन्म झाला. वयाच्या ११ व्या वर्षी जेव्हा तिला आर्चबिशप (संत) तुरिबियुस (सण २३ मार्च) ह्यांनी दृढीकरण संस्कार दिला तेव्हा तिने रोझ मारी असे नाव धारण केले. सिएनाच्या संत कॅथरीनप्रमाणे (सण २९ एप्रिल) ती प्रार्थनामय आणि साधे वैराग्यवृत्तीचे जीवन जगू लागली. उपासतापास आणि आत्मक्लेश ह्याद्वारे ती आपल्या कुटुंबातच व्रतस्थाचे जीवन जगत असे. घरची गरिबी असल्यामुळे भरतकाम आणि इतर हलकी फुलकी कामे करून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चार पैसे कमावीत असे.
आपल्या घरापाठीमागे असलेल्या बागेत तिने व तिच्या भावाने भाजलेल्या
विटांची एक छोटीशी झोपडी उभारली होती. तिथे ती प्रार्थना करी, रात्री काचेचेतुकडे व फुटलेल्या भांड्यांचे तुकडे यावर फक्त थोडे तास विश्रांती घेई. दिवसभर गोरगरिबांना मदत करणे आणि अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती यामध्ये ती गढलेली असे. त्या विचित्र वातावरणात तिला दररोज कम्युनियन देण्याची व्यवस्था तिच्या आध्यात्मिक सल्लागार धर्मगुरूंनी केली होती.
तब्बल २० वर्षांनी तिच्या कुटुंबातील वातावरण तिच्या दृष्टीने पोषक बनले. आता ती तिच्या मनाप्रमाणे उघडपणे व्रतस्थाचे जीवन जगू शकत होती. कुटुंबातील थट्टामस्करी व विरोध आता मावळला होता. तिने लगेच डॉमनिकन संघात प्रवेश घेतला.
इथे तिने आपल्या आत्मक्लेशाचे प्रमाण वाढविले. क्वचितच कधीतरी जेवण घेणे, कमरेभोवती काटेरी साखळदंड करकचून आवळून बांधणे आणि डोक्याला काटेरी मुकूट घालणे अशा विविध मार्गांनी तिने आपल्या लहानसहान पापांबद्दल पश्चात्ताप करायला व प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात केली. शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी तिने बऱ्याच यातना सहन केल्या.
तिच्या मते 'प्रत्येक दुःखसहनामध्ये स्वर्गीय आनंद दडलेला असतो.मात्र त्या दुःखाकडे मानवी नजरेतून न पाहता देवाच्या दृष्टीने पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते.'
२४ ऑगस्ट १६१७ रोजी झालेल्या तिच्या मृत्यूनंतर असंख्य चमत्कार घडून येऊ लागले. त्यावेळी तिचे वय अवघे ३१ वर्षे इतके होते. पोप क्लेमेंट दहावे ह्यानी १६७१ साली तिला संतमालिकेत समाविष्ट केले. अमेरिकेतून झालेली ती पहिलीच संत होय. तिला लॅटीन अमेरिका व फिलिपाईन्स या देशांची आश्रयदाती संत मानले जाते.
  
पहिले वाचन : यहेज्केल ३७:१-१४
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐकाः माझ्या लोकांनो, मी तुम्हांला आपल्या कबरांतून उठवीन."
परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला, आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले आणि खोऱ्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरवले, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय ?" मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक." तेव्हा तो मला म्हणाला, “या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका : प्रभू परमेश्वर या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुम्हामध्ये श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हांवर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुम्हामध्ये श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे."
मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पाहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले, मांस चढले त्वचेने त्यांना आच्छादले,पण त्यात श्वास अगदीनव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, “वाऱ्याला संदेश दे; मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील.” मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले आणि अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले.तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय. पाहा, ते म्हणतात, आमच्या अस्थीशुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्याना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पाहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हांला आपल्या कबरातून बाहेर काढून इस्राएल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हांला बाहेर काढीन तेव्हा तुम्हांला समजेल की, मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. तुम्ही सजीव व्हाल आणि मी तुम्हांला तुमच्या देशात वसवीन, तेव्हा मी परमेश्वर हे बोललो आणि मी तसे केले हे तुम्हांला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Ezekiel 37:1-14
In those days: The hand of the Lord was upon me, and he brought me out in the Spirit of the Lord and set me down in the middle of the valley; it was full of bones. And he led me around among them, and behold, there were very many on the surface of the valley, and behold, they were very dry. And he said to me, "Son of man, can these bones live?" And I answered, "O Lord God, you know." Then he said to me, "Prophesy over these bones, and say to them, O dry bones, hear the word of the Lord. Thus says the Lord God to these bones: Behold, I will cause breath to enter you, and you shall live. And I will lay sinews upon you, and will cause flesh to come upon you, and cover you with skin, and put breath in you, and you shall live, and you shall know that I am the Lord." So I prophesied as I was commanded. And as I prophesied, there was a sound, and behold, a rattling, and the bones came together, bone to its bone. And I looked, and behold, there were sinews on them, and flesh had come upon them, and skin had covered them. But there was no breath in them. Then he said to me, "Prophesy to the breath; prophesy, son of man, and say to the breath, thus says the Lord God: Come from the four winds, O breath, and breathe on these slain, that they may live." So I prophesied as he commanded me, and the breath came into them, and they lived and stood on their feet, an exceedingly great army. Then he said to me, "Son of man, these bones are the whole house of Israel. Behold, they say, 'Our bones are dried up, and our hope is lost; we are indeed cut off. Therefore prophesy, and say to them, Thus says the Lord God: Behold, I will open your graves and raise you from your graves, O my people. And I will bring you into the land of Israel. And you shall know that I am the Lord, when I open your graves, and raise you from your graves, O my people. And I will put my Spirit within you, and you shall live, and I will place you in your own land. Then you shall know that I am the Lord; I have spoken, and I will do it, declares the Lord."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   १०७:२-९
प्रतिसाद :  परमेश्वराचे उपकारस्मरण करा,

१) परमेश्वराने उद्धारलेले जन असे म्हणोत
 कारण त्यांना त्याने शत्रूच्या तावडीतून 
मुक्त केले आहे आणि निरनिराळ्या 
देशांतून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि
 दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकत्र जमवले आहे.

२) काहीजण अरण्यात वैराण प्रदेशातील 
वाटेने भटकले त्यांना वस्तीचे नगर
 आढळले नाही. ते भुकेले आणि तान्हेले 
असल्यामुळे त्यांचा जीव व्याकूळ झाला.

३) तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला 
आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले 
वस्तीच्या नगरात त्यांनी जावे म्हणून 
त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले.

४ परमेश्वराच्या दयेबद्दल आणि 
त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल
 लोक त्याचे उपकारस्मरण करोत. 
कारण त्याने तान्हेल्या जिवाला तृप्त केले. 
भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले.

Psalm 
Psalm 107:2-9 
R    O give thanks to the Lord for he is good; for his mercy endures forever!
Let the redeemed of the Lord say this, 
those he redeemed from the hand of the foe, 
and gathered from far-off lands,
from east and west, north and south. R.

They wandered in a barren desert,
finding no way to a city they could dwell in. 
Hungry they were and thirsty;
their soul was fainting within them. R.

 Then they cried to the Lord in their need,
 and he rescued them from their distress,
and he guided them along a straight path,
to reach a city they could dwell in. R

Let them thank the Lord for his mercy, 
his wonders for the children of men; 
for he satisfies the thirsty soul,
and the hungry he fills with good things. 

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
 तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, 
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. 
 आलेलुया!

Acclamation: 
Teach me your paths, O Lord Guide me in your truth.


शुभवर्तमान  मत्तय २२ : ३४-४०
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर.'
येशूने सदुक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परुशी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परिक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे ? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतः सारखी प्रीती कर. ह्या दोन तू आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. '
प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel ReadingMatthew 22:34-40: 
At that time: When the Pharisees heard that Jesus had silenced the Sadducees, they gathered together. And one of them, a lawyer, asked him a question to test him. "Teacher, which is the great commandment in the Law?" And he said to him, "You shall love the Lord your God with all your heart and with all your soul and with all your mind. This is the great and first commandment. And a second is like it: You shall love your neighbour as yourself. On these two commandments depend all the Law and the Prophets."

Reflection: Jesus connects the commandments of love for God and neighbour in a very

fundamental way. It is clear that our relationship with God has both vertical and horizontal

dimensions - love of God with all our strength and soul, and love
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
जुन्या करारात मोशेने आपल्याला दहा आज्ञा दिल्या. नवीन करारात येशू आपल्याला दोन आज्ञा देतोः देवावर प्रीती कर आणि शेजाऱ्यांवर प्रीती कर. बऱ्याचदा असे होते, की आपण देवावर जास्त प्रिती करतो, जास्त विश्वास ठेवतो आणि शेजाऱ्यांना मात्र तुच्छ मानतो, त्यांच्या प्रति अविश्वास दाखवतो.आपण तासन् तास मोबाईलवर बोलतो पण : शेजाऱ्यांबरोबर बोलायला आपल्याकडे अजिबात वेळ नाही. मोबाईलवर आलेले - मेसेज आणि व्हिडिओ आपण वारंवार बघत असतो पण शेजाऱ्यांची ख्यालीखुशाली बघायला आपण टाळतो. आपण जर शेजाऱ्यांवर प्रीती केली नाही तर येशूचे मिशन कार्य कसे पूर्ण करणार ? कारण येशू लोकांबरोबर राहिला, त्यांच्याशी बोलला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या दूरही केल्या. पहिल्या वाचनात परमेश्वर शुष्क आणि निर्जिव अस्थींना सजीव करतो  त्यांच्यात श्वास भरतो. आपली शेजारप्रिती शुष्क झाली आहे ती सजीव करायला हवी. येशूने सांगितलेल्या दोन आज्ञा  पाळण्यास मी तयार आहे काय ?

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुजवर प्रीति करण्यास व तुला अनुसरुन प्रीतीची आज्ञा आचरणात आणण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या