सामान्य काळातील २६वा रविवार
२९ सप्टेंबर २०२४
जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही.
Do not forbid him. For there is no man that doth a miracle in my name, and can soon speak ill of me.
✝️
“जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनूकूल आहे.”
देवाचे कार्य देव त्याच्या योजनेप्रमाणे करीत असतो.
परमेश्वर सर्वांनाच त्याची महानता व सामर्थ्य अनुभवण्यास बोलावित असतो. विशेषरितीने प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेल्या सर्वांना पवित्र आत्मा मिळाला आहे. त्यामुळे बाप्तिस्म्याद्वारे प्रत्येकजण संदेष्टा, याजक आणि प्रेषित बनला आहे. सर्वांना प्रभूची साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. म्हणूनच आपल्या परिसरात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सेवाकार्य करीतअसलेल्यांस विरोध न करता त्यांच्यासाठी प्रार्थना करावी.
देवाने पवित्र आत्म्याची विविध कृपादाने देऊन आपल्याला त्याचे तारणकार्य करण्यासाठी पाचारण केलेले आहे. आपल्यामध्ये असलेला न्युनगंड आणि अपात्रता प्रभूला समर्पित करू या. प्रोत्साहनात्मक प्रबोधन व प्रशिक्षण घेऊन प्रभूच्या मळ्यात सेवाकार्य करण्यासाठी पुढाकार घेऊ या. प्रभू सर्वदा आपल्याबरोबर आहे.
✝️
पहिले वाचन : गणना ११ :२५-२९
वाचक :गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय ? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते तर किती बरे झाले असते!"
परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असलेला आत्मा घेऊन त्याने त्या सत्तर वडिलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले, पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.
त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते, त्यातील एकाचे नाव एलदाद आणि दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते, ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की, एलदाद आणि मेदाद हे छावणीतच संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनचा मुलगा यहोशवा जो तरुणापणापासून मोशेचा सेवक होता तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी, त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस का? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते!
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Numbers 11: 25-29
And the Lord came down in a cloud, and spoke to him, taking away of the spirit that was in Moses, and giving to the seventy men. And when the spirit had rested on them they prophesied, nor did they cease afterwards. Now there remained in the camp two of the men, of whom one was called Eldad, and the other Medad, upon whom the spirit rested; for they also had been enrolled, but were not gone forth to the tabernacle. And when they prophesied in the camp, there ran a young man, and told Moses, saying: Eldad and Medad prophesy in the camp. Forthwith Josue the son of Nun, the minister of Moses, and chosen out of many, said: My lord Moses forbid them.
But he said: Why hast thou emulation for me? O that all the people might prophesy, and that the Lord would give them his spirit!
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :१९ : ८,१०,१२-१४
प्रतिसाद : परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात.
१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे.
ते मनाचे पुनरुज्जीवन करते.
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे,
तो भोळ्यांना समंजस करतो.
२) परमेश्वराचे भय शुद्ध आहे,
ते सर्वकाळ टिकणारे आहे.
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत,
ते सर्वथैव न्याय्य आहेत.
३) शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो,
ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते.
स्वतःच्या चुका कोणाला दिसतात ?
गुप्त दोषांपासून मला मुक्त कर.
४) धिटाईने केलेल्या पापांपासून
आपल्या सेवकाला आवर
त्यांची सत्ता माझ्यावर न चालो.
म्हणजे मी पूर्ण होईन आणि
महापापांपासून अलिप्त राहीन.
Psalms 19: 8, 10, 12-13, 14
R. The precepts of the Lord give joy to the heart.
The law of the Lord is unspotted, converting souls:
the testimony of the Lord is faithful,
giving wisdom to little ones.
R. The precepts of the Lord give joy to the heart.
The fear of the Lord is holy, enduring for ever and ever:
the judgments of the Lord are true, justified in themselves.
R. The precepts of the Lord give joy to the heart.
For thy servant keepeth them,
and in keeping them there is a great reward.
Who can understand sins?
from my secret ones cleanse me, O Lord:
R. The precepts of the Lord give joy to the heart.
And from those of others spare thy servant.
If they shall have no dominion over me,
then shall I be without spot:
and I shall be cleansed from the greatest sin.
R. The precepts of the Lord give joy to the heart.
दुसरे वाचन याकोबचे पत्र ५: १-६
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
“तुमचे धन नासले आहे. "
अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे आणि तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने आणि तुमचे रुपे ह्यांवर गंज चढला आहे, तो गंज तुम्हांविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. पाहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला, वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला, तो तुम्हांस विरोध करत नाही.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
Second Reading: James 5: 1-6
Go to now, ye rich men, weep and howl in your miseries, which shall come upon you. Your riches are corrupted: and your garments are motheaten. Your gold and silver is cankered: and the rust of them shall be for a testimony against you, and shall eat your flesh like fire. You have stored up to yourselves wrath against the last days. Behold the hire of the labourers, who have reaped down your fields, which by fraud has been kept back by you, crieth: and the cry of them hath entered into the ears of the Lord of Sabaoth. You have feasted upon earth: and in riotousness you have nourished your hearts, in the day of slaughter. You have condemned and put to death the Just One, and he resisted you not.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia, alleluia.
Your word, O Lord, is truth; consecrate us in the truth.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क ९:३८-४३,४५,४७-४८
वाचक :मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुझा हात तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक.'
योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता.” म्हणा “त्याला मनाई करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचित सांगतो. विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी पापाला प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठी जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक, दोन हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक, दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Mark 9: 38-43, 45, 47-48
John answered him, saying: Master, we saw one casting out devils in thy name, who followeth not us, and we forbade him. But Jesus said: Do not forbid him. For there is no man that doth a miracle in my name, and can soon speak ill of me. For he that is not against you, is for you. For whosoever shall give you to drink a cup of water in my name, because you belong to Christ: amen I say to you, he shall not lose his reward. And whosoever shall scandalize one of these little ones that believe in me; it were better for him that a millstone were hanged around his neck, and he were cast into the sea. And if thy hand scandalize thee, cut it off: it is better for thee to enter into life, maimed, than having two hands to go into hell, into unquenchable fire: And if thy foot scandalize thee, cut it off. It is better for thee to enter lame into life everlasting, than having two feet, to be cast into the hell of unquenchable fire: And if thy eye scandalize thee, pluck it out. It is better for thee with one eye to enter into the kingdom of God, than having two eyes to be cast into the hell of fire: Where their worm dieth not, and the fire is not extinguished.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन :मृत्यूच्या दरित जवळपास पोहचलेला एक श्रीमंत व्यापारी डॉक्टरांना भेटायला गेला. "आता आपली शेवटची काही इच्छा आहे का?" डॉक्टरांनी विचारले. "डॉक्टर मला एक पेन व पेपर द्या." व्यापारी म्हणाला, डॉक्टराना वाटले हे गृहस्थ काहीतरी इथे लिहिणार. डॉक्टरांनी विचारले "काय लिहीता?" डॉक्टर मला मरण यायच्या अगोदर कोणा-कोणाला चावायचे आहे त्याची यादी बनवतो. आजची तिन्ही वाचने हेवा, मत्सर यावर प्रकाश टाकतात.
१) हेवा माणसांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो : आजच्या पहिल्या वाचनात छावणीबाहेर दोन तरुण देवाच्या वचनाचा संदेश देत होते. एक तरुण येऊन मोशेला त्याची जाणीव करून
देतो. यहोशवा मोशेला म्हणतो, स्वामी, त्यांना मनाई करा. नाहीतर ते पुढे जातील. मोशे तेव्हा जे सांगतो ते विचार करण्यासारखे आहे. देवाचा संदेश देणे ही केवळ आपलीच मक्तेदारी नाही. परमेश्वराचा आत्मा सर्वांना मिळालेला आहे.
२) अहंकार वृत्ती देवाला प्रिय नाही : “जे माझे ते माझे, व जे तुझे ते देखील माझे” अशी वृत्ती धारण करून श्रीमंत माणसे गरिबांवर अन्याय करतात अशा श्रीमंतांना याकोब धारेवर आणतो. जे करू नये अशा मोहजाळ्यात पडून चैनबाजी व विलासी जीवन जगत आहात ते प्रभूला प्रिय नाही.
३) प्रभूच्या शिष्यात असहिष्णूता नसावी : दुसऱ्यांनी येशूच्या नावाने केलेले प्रेषितांना आवडत नाही. प्रेषित अशा माणसांचा हेवा करतात. प्रभू त्यांना सहिष्णुतीचे धडे देताना म्हणतो, बाहेरील लोकांनी केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल तुमच्यात मत्सर का असावे? असे केल्याने तुम्ही त्याच्या कामात अडथळा आणता.
आत्मचिंतन : मी इतरांच्या कामात अडथळा आणतो की त्यांना प्रोत्साहन देतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या मळ्यात कार्य करण्यास प्रेरणा, सामर्थ्य व कृपा दे, आमेन,
0 टिप्पण्या