Marathi Bible Reading | Friday 20th September 2024 | 24th Week in Ordinary Time

सामान्य काळातील चोवीसावा  सप्ताह 

शुक्रवार २०सप्टेंबर  २०२४

येशू उपदेश करत आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी आणि गावोगावी फिरत होता. he travelled through the cities and towns, preaching and evangelizing the kingdom of God;




संत अँण्ड्रयू कीम, पॉल काँग आणि सहकारी  
कोरीयाचे रक्तसाक्षी (१८३९, १८४६, १८६२, १८६७) 

इ. स. १८८६ साली कोरियामध्ये धर्मप्रसार बंदी उठविण्यात आली आणि ख्रिस्ती धर्माचा अधिकृतरित्या प्रसार होण्यास सुरुवात झाली. परंतु तोपर्यंतच्या १०० वर्षात (१७८४-१८८६) १०,००० लोकांना रक्तसाक्षित्वाचे मरण आले. त्यात अकरा धर्मगुरू, ९२ प्रापंचिक, पंधरा कुमारिका किंवा व्रतस्थ भगिनी आणि अवघ्या १३ वर्षीय पीटर-यू- ताय चोल नावाचे बालक ह्यांचा समावेश होता.
अॅण्ड्रयू कीम हे पहिले कोरियन धर्मगुरू होते. त्यांनी ख्रिस्तावरील प्रेमापोटीआणि लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी कोरियामध्ये सुवार्ता प्रसार कार्यास प्रारंभ केला. परंतु दुर्दैवाने त्यांच्या गुरुदीक्षेच्या दिवशी त्यांच्या हाताला लावण्यात आलेले पवित्र तेल ओले असतानाच एक वर्ष व एक महिन्यानेच त्यांना रक्तसाक्षित्वाचा मुकूट घालण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २६ वर्षांचे होते.
पॉल कॉंग ह्यांनी कोरियामध्ये सुवार्ता प्रसारानिमित्ते प्रवेश करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पेकिंग शहराला खूप भेटी दिल्या. इ. स. १८०१ च्या छळवादानंतर कोरियामध्ये ख्रिस्ती लोकांचे नेतृत्व करणारे धर्मगुरूच नव्हते. शेवटी पॉल काँगच्या प्रयत्नांना यश आले आणि कोरियामध्ये एक महागुरू व काही धर्मगुरू ह्यांना सुवार्ता प्रसार करण्याची संधी मिळाली.
आज कोरियामध्ये जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या श्रद्धेचा पाया ॲण्ड्रयू कीम, पॉल कॉंग आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घातला. त्यामुळे १४ मे १९८४ साली पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी त्यांना संतपद बहाल केले.

 त्याकाळी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने कार्य करण्याची मुभा  नव्हती, तरी सुद्धा प्रभू येशूच्या अमृत वचनांनी प्रेरित होऊन आणि त्याच्या  कृपेच्या व प्रेमाच्या छायेखाली स्त्रियांनी प्रभूचे कार्य करण्यासाठी सहकार्य  केले. जगामध्ये अनेक स्त्रिया आज प्रभूच्या मळ्यात सेवाकार्य करीत आहोत. शिक्षण, आरोग्य, समाजसेवा अशा क्षेत्रात धर्मभगिनींचे कार्य उल्लेखनीय  आहे. मदर तेरेजांचा आदर्श आपल्या सर्वांच्या समोर आहे.
 ख्रिस्तसभा आज संत कोर्नेलियस व संत सिप्रियस ह्यांचा सन्मान करीत आहे. ख्रिस्तसभेच्या प्रारंभीच्या काळात डेसियन सम्राटाच्या कारकिर्दीत ख्रिस्तीजनांचा अतोनात छळ झाला. अशा प्रसंगी ह्या दोन्ही संतांनी ख्रिस्ती| विश्वासू लोकांना प्रोत्साहित केले. ख्रिस्ताची साक्ष त्यांनी आपल्या जीवनाद्वारे दिली.  
 ✝️


पहिले वाचन : : करिथ  १५:१२-२०
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त उठवला गेला नसेल तर आमचा विश्वास व्यर्थ आहे."

ख्रिस्त उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येकजण म्हणतात हे कसे ? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही आणि ख्रिस्त उठवला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आणि आम्ही देवासंबधांने खोटे साक्षी असे ठरलो. कारण देवासंबधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवलेच जात नाहीत तर मग त्याने त्याला उठवले नाही. कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहा आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो.
तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथमफळ असा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : First Corinthians 15: 12-20
Now if Christ be preached, that he arose again from the dead, how do some among you say, that there is no resurrection of the dead? But if there be no resurrection of the dead, then Christ is not risen again. And if Christ be not risen again, then is our preaching vain, and your faith is also vain. Yea, and we are found false witnesses of God: because we have given testimony against God, that he hath raised up Christ; whom he hath not raised up, if the dead rise not again. For if the dead rise not again, neither is Christ risen again. And if Christ be not risen again, your faith is vain, for you are yet in your sins. Then they also that are fallen asleep in Christ, are perished. If in this life only we have hope in Christ, we are of all men most miserable. But now Christ is risen from the dead, the firstfruits of them that sleep:
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र    १७:१, ६ - ७, ८ब, १५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होईल.

१) हे परमेश्वरा, माझी रास्त विनवणी ऐक, 
माझा धावा ऐक.. माझ्या निष्कपट मुखाने 
उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.

२) हे देवा, मी तुझा धावा करतो, 
कारण तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे, 
माझे म्हणणे ऐक, तुझा आश्रय घेणाऱ्यांना
 त्यांच्या विरोधकांपासून तू आपल्या 
उजव्या हाताने वाचवतोस, 
तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.

३)आपल्या पंखाच्या छायेत लपव.
मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो, 
मी जागा होईल तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.

Psalms  17: 1bcd, 6-7, 8b and 15
R. (15b) Lord, when your glory appears, my joy will be full.

 Hear, O Lord, my justice: 
attend to my supplication. 
Give ear unto my prayer, 
which proceedeth not from deceitful lips.

R. Lord, when your glory appears, my joy will be full.

I have cried to thee, for thou, O God, hast heard me: 
O incline thy ear unto me, and hear my words.
 shew forth thy wonderful mercies;
 thou who savest them that trust in thee.

R. Lord, when your glory appears, my joy will be full.

Protect me under the shadow of thy wings.
But as for me, 
I will appear before thy sight in justice:
I shall be satisfied when thy glory shall appear.

R. Lord, when your glory appears, my joy will be full.

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
जे लोक वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
 आलेलुया!

Acclamation: 
  Alleluia, alleluia.
Blessed are you, Father, Lord of heaven and earth;
 you have revealed to little ones the mysteries of the Kingdom.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक :८:१-३
वाचक :लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
"दुसऱ्या कित्येक स्त्रिया येशूबरोबर होत्या,
 त्या आपल्या पैशाअडक्याने त्याची सेवाचाकरी करत असत."

येशू उपदेश करत आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी आणि गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरियेतून सात भुते निघाली होती ती आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सुसान्ना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 8: 1-3
And it came to pass afterwards, that he travelled through the cities and towns, preaching and evangelizing the kingdom of God; and the twelve with him: And certain women who had been healed of evil spirits and infirmities; Mary who is called Magdalen, out of whom seven devils were gone forth, And Joanna the wife of Chusa, Herod’s steward, and Susanna, and many others who ministered unto him of their substance
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :
येशूने आपल्या प्रेषित कार्याची सुवार्ता सर्वत्र गाजविली. शुभवर्तमानात येशूच्या मिशन कार्यात स्त्रीयांनी देखील साहाय्य केले असे सूचित केलेले आहे. सुवार्तीक लूक जेव्हा एखाद्या पुरूषाचा उल्लेख करतो तेव्हा त्याच्याबरोबर स्त्रीयांचा देखील उल्लेख करताना दिसतो. जखऱ्या व अलिशिबा, योसेफ व मरिया, शिमोन व हन्ना यांची उदाहरणे लूकच्या शुभवर्तमानात आपण पाहतो. शुभवर्तमानातील अंतिम ओवीवरून आपण शिकतो की, या स्त्रीयांनी त्यांच्या उत्पन्नातून येशूच्या मिशन कार्यात हातभार लावला. महत्वाचा संदेश आपण शिकायचा म्हणजे, येशू खूप व्यापक दृष्टीने जीवन जगला व कुठल्याही गैर स्वरूपाच्या प्रभावाला आहारी गेला नाही. त्याकाळी स्त्रीचे क्षेत्र हे मर्यादित असले तरी स्रीयांदेखील पुरुषाप्रमाणे वागणूक दिली गेली. कारण प्रभूच्या शिष्यामध्ये स्त्रीया देखील ओळखल्या जात होत्या.

प्रार्थना  हे प्रभू येशू, तुझे देवराज्याचे महान कार्य न संपणारे आहे. त्याच्यासाठी आम्हा मधून सेवाकार्य करण्यास व तुला अनुसरण्यास कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या