सामान्य काळातील चोवीसावा सप्ताह
शनिवार २१ सप्टेंबर २०२४
"निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ नको'
संत मत्तय
प्रेषित व शुभवर्तमानकार (पहिले शतक)
✝️
ख्रिस्तसभा आज येशूचा प्रेषित व शुभवर्तमानकार संत मत्तयचा सण साजरा करीत आहे. संत मत्तयने विशेष रितीने यहुदीजनांना त्यांची ख्रिस्तावरील श्रद्धा स्थिर व्हावी म्हणून नव्याने ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. विशेषत: 'स्वर्गाचे राज्य' ही संकल्पना संत मत्तयच्या शुभवर्तमानाचा गाभा आहे. प्रभू येशूने प्रत्येक ख्रिस्ती माणसाला देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारण केलेले आहे.
मत्तयकृत शुभवर्तमानात अध्याय ९ ओवी ९ मध्ये वर्णन करण्यात आलेला कफर्णहूम येथील जकातीच्या नाक्यावर बसणारा लेवी हाच मत्तय प्रेषित व शुभवर्तमानकार असावा असे मानले जाते. हेरोद अँटिपास ह्या राजाच्या कारकीर्दीत तो जकातदार म्हणून काम पाहात होता.
येशूने त्याला आपल्या मागे येण्याची विनंती करताच तो मोठ्या आनंदाने
आपले सर्वस्व सोडतो आणि येशूला अनुसरतो. त्या घटनेमुळे मत्तयला झालेला आनंद तो आपल्या प्रभूला त्याच्या शिष्यांना व आपल्या इतर जकातदार मित्रांना जेवणावळ देऊन साजरा करतो. या गोष्टीचे त्या वेळच्या शास्त्री परुश्यांना आश्चर्य वाटते. कारण जकातदार हे पापी समजले जात आणि येशूने त्यांच्याबरोबर बसून भोजन करावे हे यहुदी समाजातील अधिकाऱ्यांना खटकणारे होते.
याव्यतिरिक्त शुभवर्तमानात संत मत्तयविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मॅथ्यू किंवा मत्तय या नावाचा अर्थ 'देवाची देणगी' असा होतो. मत्तयला ग्रीक व हिब्रू भाषा अवगत होती. त्याला लिखाणाचा सराव होता आणि त्याचे साधारण शिक्षण झालेले होते. मात्र मत्तय हे त्याचे नाव येशूने दिलेले असावे. कारण इतरत्र त्याचे नाव लेवी असे देण्यात आलेले आहे.
प्रेषितांपैकी येशूचे शुभवर्तमान लिहिणारा मत्तय हा पहिला शुभवर्तमानकार मानला जातो. या आधी संत मार्कचे शुभवर्तमान अस्तित्वात होते. परंतु मार्क हा येशूचा प्रेषित नव्हता. मत्तयने जे पाहिले व ऐकले ते त्याने आपल्या लेखणीने शुभवर्तमानात लिहून ठेवलेले आहे. त्यावेळी यहुदी समाजात प्रचलित असलेल्या अरेमाईक हिब्रू भाषेत सदर लिखाण त्याने केले.
संत मत्तयने आपले शुभवर्तमान यहुदी धर्मातून ख्रिस्ती झालेल्या परंतु अजूनही श्रद्धेच्या बाबतीत अस्थिर असलेल्या लोकांसाठी लिहिले. त्यात यहुदी लोकांना परिचित असलेल्या नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून १३० वचनांचा समावेश मत्तयने केलेला आहे. येशू हा नवा मोशे आहे. तो नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नव्हे तर ते पूर्ण करण्यासाठी आलेला आहे असे सांगून मत्तयने यहुदी लोकांना नव्याने ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गिरीप्रवचन, स्वर्गराज्याचे दाखले, शिष्यत्वाची किंमत, सामूहिक जीवनासाठी आवश्यक तत्त्वे भावी युगाविषयीचे भविष्य अशा येशूच्या विविध प्रवचनांचा समावेश संत मत्तयने आपल्या शुभवर्तमानात केलेला आहे. स्वर्गाचे राज्य ही कल्पना संत मत्तयच्या शुभवर्तमानात प्रामुख्याने आढळते. 'ख्रिस्तसभा' हा शब्द मत्तयने आपल्या शुभवर्तमानात वापरलेला आहे (मत्तय १६:१८). तसेच हे शुभवर्तमान प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत मोठ्या प्रमाणात वाचले जात असे. त्यामुळे मत्तयकृत शुभवर्तमानाला 'ख्रिस्तसभेचे शुभवर्तमान' असे म्हणतात.
संत बार्थोलोम्यू जेव्हा भारतात आला तेव्हा त्याने आपणासोबत संत मत्तयकृत शुभवर्तमानाची हिब्रू भाषेतील प्रत आणल्याचे मानले जाते. संत मत्तयला दगडमार करून ठार करण्यात आल्याचे सांगतात. तो जकातदार व बँक संचालक ह्यांचा आश्रयदाता संत आहे.
चिंतन : प्रथम तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे ह्या सर्व गोष्ट तुम्हाला प्राप्त होतील. (मत्तय ६:३३)
पहिले वाचन : इफिसकरांस पत्र ४ : १-७, ११-१३
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"त्यानेच कोणी प्रेषित, कोणी सुवार्तिक असे नेमून दिले. "
जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणाला शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच आणि आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, स्नानसंस्कार एकच, सर्वांच्यावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. तरी आपणांपैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक आणि शिक्षक असे नेमून दिले. ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांस सेवेच्या कार्याकरिता आणि ख्रिस्ताच्या शरीरांची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिध्द करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या आणि तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुध्दीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Ephesians 4: 1-7, 11-13
I therefore, a prisoner in the Lord, beseech you that you walk worthy of the vocation in which you are called, With all humility and mildness, with patience, supporting one another in charity. Careful to keep the unity of the Spirit in the bond of peace. One body and one Spirit; as you are called in one hope of your calling. One Lord, one faith, one baptism. One God and Father of all, who is above all, and through all, and in us all. But to every one of us is given grace, according to the measure of the giving of Christ. And he gave some apostles, and some prophets, and other some evangelists, and other some pastors and doctors, For the perfecting of the saints, for the work of the ministry, for the edifying of the body of Christ: Until we all meet into the unity of faith, and of the knowledge of the Son of God, unto a perfect man, unto the measure of the age of the fulness of Christ;
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :१९ : २-३, ४-५
प्रतिसाद : निशीदिनी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो.
१)आकाश देवाचा महिमा वर्णिते,
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते.
दिवस दिवसाशी संवाद करतो,
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
२) वाचा नाही, शब्द नाही,
त्यांची वाणी ऐकू येत नाही,
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो,
त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.
Psalms Psalms 19: 2-3, 4-5
R. Their message goes out through all the earth.
The heavens shew forth the glory of God,
and the firmament declareth the work of his hands.
Day to day uttereth speech,
and night to night sheweth knowledge.
R. Their message goes out through all the earth.
There are no speeches nor languages,
where their voices are not heard.
Their sound hath gone forth into all the earth:
and their words unto the ends of the world.
R. Their message goes out through all the earth.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो,
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो.
हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल
आम्ही तुझी स्तुती करतो.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia, alleluia.
We praise you, O God, we acclaim you as Lord; the glorious company of Apostles praise you.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मत्तय ९:९-१३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" 'माझ्या मागे ये.' तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. "
कफर्णहूममधून पुढे जात असताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्या मागे ये." तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला.
नंतर येशू घरात भोजनास बसला असता, पाहा, बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवण्यास बसले. हे पाहून परुशी त्याच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो ?” हे ऐकून येशू म्हणाला, "निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ नको' ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 9: 9-13
And when Jesus passed on from hence, he saw a man sitting in the custom house, named Matthew; and he saith to him: Follow me. And he rose up and followed him. And it came to pass as he was sitting at meat in the house, behold many publicans and sinners came, and sat down with Jesus and his disciples. And the Pharisees seeing it, said to his disciples: Why doth your master eat with publicans and sinners? But Jesus hearing it, said: They that are in health need not a physician, but they that are ill. Go then and learn what this meaneth, I will have mercy and not sacrifice. For I am not come to call the just, but sinners.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन :
परमेश्वर पात्र लोकांना बोलावित नाही, तो बोलावितो व त्यांना पात्र बनवत असतो." रेव्ह. मार्क बेकविथ यांचे हे विधान आहे. जकातदाराना समाजात (विशेषता यहुदी) विशेष प्रतिष्ठा नव्हती. जकातीच्या नाक्यावर बसून कर गोळा करणारा मत्तय हा रोमन सरकारचा समर्थक होता. सरकारी दप्तरात काम करताना ठरलेला कर रोमन सरकारला देणे यात तो प्रामाणिक होता. मात्र चूकीने मिळविलेले धन (अधिक कर) स्वतः ठेवित होता. समाजाने त्यांच्यात एका पापी माणसाला पाहीले परंतु येशूने त्याच्यात देवाच्या कार्यासाठी सक्षम व सुवार्तिक म्हणून पाहिले माझ्या मागे ये” येशूच्या या हाकेने मत्तय प्रभावित झाला. त्याने आपला भूतकाळ व वर्तमानकाळ सोडला व भविष्यकाळ काय सांगत आहे त्याच्यामागे शोधत निघाला. देव त्याच्या कामासाठी अग्रगण्य, तज्ञ असलेल्या पात्र लोकांना बोलावित नाही तर ज्यांनी आपल्या हृदयात येशूसाठी जागा दिलेली आहे व स्वतःच्या इच्छेचा त्याग करून काम करायला तयार असतो त्यांना तो कार्यासाठी पात्र बनवित असतो.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्ही अपात्र असूनही तू आम्हाला बोलवित आहेस. तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन.
0 टिप्पण्या