Marathi Bible Reading | Saturday 7th September 2024 | 22nd Week in Ordinary Time

सामान्य काळातील बाविसावा  सप्ताह 

शनिवार  ७ सप्टेंबर  २०२४

 “मनुष्याचा पुत्र शब्बाथचा प्रभू आहे."

"The Son of Man is lord of the Sabbath."



परमेश्वराचे प्रेम, दया आणि कृपा सर्व नियमांच्या आणि माणसाच्या आकलनशक्तीच्या पलिकडे कार्यरत असते. परमेश्वराला आपण नियमात बांधू शकत नाही. परमेश्वराचे मानवावरील प्रेम अमर्याद आहे. आपण त्या प्रेमाचे साक्षीदार बनून सर्वांप्रती प्रेमाने व दयेने वागावे म्हणून परमेश्वर आपल्याला साद घालीत आहे आपण तयार राहू या . 


  
पहिले वाचन : करिथ  ४:६-१५
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
 "आम्ही भुकेले, तान्हेले आणि उघडेवाघडे आहोत."

बंधुजनहो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला आणि अपुल्लोसला लागू केल्या आहेत, शास्त्र लेखापलीकडे कोणी जाऊ नये, हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा म्हणजे तुम्हांपैकी कोणीही एकासाठी दुसऱ्याला तुच्छ लेखणार नाही. तुला निराळेपण कोणी दिले ? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे ? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतो ? तू तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहा ! इतक्यातच धनवान झाला आहा! आम्हांला सोडून तुम्ही तर राजे बनला आहा ! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो. मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरच आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना आणि माणसांना जणू तमाशा असे झालो ! आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहो. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले आणि उघडेवाघडे आहोत, आम्ही ठोसे खात आहोत, आम्हाला घरदार नाही, आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो. आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो, आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करतो, आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो, आम्ही जगाचा गाळ, सर्वांचा केरकचरा असे आजपर्यंत झालो आहो.तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे.".
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : 1 Corinthians 4:6b-15
Brethren: You may learn by me and Apollos not to go beyond what is written, that none of you may be puffed up in favour of one against another. For who sees anything different in you? What do you have that you did not receive? If then you received it, why do you boast as if you did not receive it? Already you have all you want! Already you have become rich! Without us you have become kings! And would that you did reign, so that we might share the rule with you! For I think that God has exhibited us apostles as last of all, like men sentenced to death, because we have become a spectacle to the world, to angels, and to men. We are fools for Christ's sake, but you are wise in Christ. We are weak, but you are strong. You are held in honour, but we in disrepute. To the present hour we hunger and thirst, we are poorly dressed and buffeted and homeless, and we labour, working with our own hands. When reviled, we bless; when persecuted, we endure; when slandered, we entreat. We have become, and are still, like the scum of the world, the refuse of all things. I do not write these things to make you ashamed, but to admonish you as my beloved children. For though you have countless guides in Christ, you do not have many fathers. For I became your father in Christ Jesus through the gospel.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   : १४५:१७-२१
प्रतिसाद :   जे परमेश्वराचा धावा करतात, त्यांना तो समीप आहे.
१) परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायपरायण आहे, 
तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे.
जे कोणी त्याचा धावा करतात जे खऱ्या श्रद्धेने 
त्याचा धावा करतात, त्या सर्वाना परमेश्वर समीप आहे.

२) तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो, 
आणि त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. 
परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो, 
पण सर्व दुर्जनांचा नाश करतो.

३) माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील, 
सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नामाला
 युगानुयुगे धन्यवाद देवोत.

Psalm 145:17-21 The Lord is close to all who call him. The Lord is just in all his ways,
and holy in all his deeds.
The Lord is close to all who call him,
who call on him in truth. He fulfils the desires of those who fear him;
he hears their cry and he saves them.
The Lord keeps watch over
all who love him; the wicked he will utterly destroy. Let my mouth speak the praise of the Lord,
let all flesh bless his holy name forever,
for ages unending. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड,
म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी
 माझ्या दृष्टीस पडतील.
 आलेलुया!

Acclamation: 
  I am the way, and the truth, and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.

शुभवर्तमान  लूक ६:१-५
वाचक :  लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
" शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता ?"

एका शब्बाथ दिवशी येशू शेतांमधून जाताना त्यांचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले ? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय ? आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथचा प्रभू आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel ReadingLuke 6:1-5 On a Sabbath, while Jesus was going through the cornfields, his disciples plucked and ate some ears of corn, rubbing them in their hands. But some of the Pharisees said, "Why are you doing what is not lawful to do on the Sabbath?" And Jesus answered them, "Have you not read what David did when he was hungry, he and those who were with him: how he entered the house of God and took and ate the bread of the Presence, which is not lawful for any but the priests to eat, and also gave it to those with him?" And he said to them, "The Son of Man is lord of the Sabbath."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
परुशी धर्मनिष्ठ आणि कायद्याचे पालन करणारे होते, परंतु त्यामुळे ते गर्विष्ठ व हट्टी बनले होते. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत म्हणून इतरांचे दोष शोधत फिरले व स्वतःचे दोष लपवत गेले. प्रस्तुत उताऱ्यात आपण पाहतो की ते येशूच्या शिष्यांमध्ये दोष शोधत होते. समाजामध्ये सुरळीतपणा असावा, सुव्यवस्था असावी व प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तव्य समजावे म्हणून आपण नियमाची चौकट तयार करीत असतो. परंतू नियमाच्या तुलनेत मानवी गरजा महत्वाच्या असतात हे विसरता कामा नये. केवळ नियमाची पूर्तीसाठी मानवाला दुय्यम स्थान देता कामा नये. हाच संदेश आम्हाला शिकायला मिळतो. आपल्या जीवनात किती वेळा नियमांना साधन म्हणून न पाहता साध्य म्हणून स्थान दिले आहे ?
प्रार्थना हे प्रभू येशू, तू जसा दयाळू आहेस तसेच दयाळूपणाने आचरण करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२४

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,   

(इथे  आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस  ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.

हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. 

हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. 

हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या