Marathi Bible Reading | Friday 6th September 2024 | 22nd Week in Ordinary Time

सामान्य काळातील बाविसावा  सप्ताह 

शुक्रवार सप्टेंबर  २०२४

नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. 

no one puts new wine into old wineskins.





ख्रिस्त स्वतःला नव्या द्राक्षरसाची उपमा देऊन प्रतिप्रश्न करीत आहे की, नवी शिववण देवराज्याची आहे व नवा द्राक्षरस नवीन बुधल्यातच घालायला हवा.

नीतिमत्तेची आणि स्वर्गराज्याची शिकवणूक देत असताना प्रभू येशू सर्व वचनांचा व शिकवणुकीचा नवा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ कर्मकांड करून नियम काटेकोरपणे पाळणे म्हणजे धर्माचरण नव्हे, तर आपले जीवन परमेश्वराच्या वचनांवर अवलंबून असायला हवे. जे जे स्वर्गराज्यासाठी अनुरुप आहे ते प्रभू येशू त्याच्या नवजीवनाच्या वचनांमध्ये आपल्याला देत आहे. आपण प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवून नवी शिकवण आत्मसात करू या.

  
पहिले वाचन : करिथ  ४:१-५
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रभू अंतःकरणातील संकल्प उघड करील."

आम्ही ख्रिस्ताचे सेवक आणि देवाचे रहस्यांचे कारभारी आहो असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला काहीच वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करत नाही. कारण जरी माझे मन माझ्याविरूद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे ह्यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका, तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : 1 Corinthians 4:1-5

Brethren: This is how one should regard us, as servants of Christ and stewards of the mysteries of God. Moreover, it is required of stewards that they be found faithful. But with me it is a very small thing that I should be judged by you or by any human court. In fact, I do not even judge myself. For I am not aware of anything against myself, but I am not thereby acquitted. It is the Lord who judges me. Therefore do not pronounce judgment before the time, before the Lord comes, who will bring to light the things now hidden in darkness and will disclose the purposes of the heart. Then each one will receive his commendation from God.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ३७:३-६,२७-२८,३९-४०
प्रतिसाद :   धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते.

१) परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि सदाचाराने वाग,
 देशात वस्ती करून राहा, सत्याचा अवलंब कर, 
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल. 
तो तुझे मनोरथ पूर्ण करील.

२) आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपवून दे, 
त्याच्यावर श्रद्धा ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
 तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी, 
तुझे न्याय्यत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.

३) वाइटापासून दूर राहा, बरे ते कर, 
म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. 
कायम परमेश्वराला न्याय प्रिय आहे, 
तो आपल्या भक्तांना सोडत नाही.

४) धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते, 
संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. 
परमेश्वर त्यांचे सहाय्य करतो. 
त्यास मुक्त करतो आणि तारतो,
 कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.


Psalm 37:3-6, 27-28, 39-40
From the Lord comes the salvation of the just.

Trust in the Lord and do good;
then you will dwell
in the land and safely pasture.
Find your delight in the Lord,
who grants your heart's desire. R

Commit your way to the Lord;
trust in him, and he will act,
and make your uprightness
shine like the light,
the justice of your cause
like the noonday sun.

Then turn away from evil and do good,
and you may abide forever;
for indeed, the Lord loves justice,
and will never forsake his faithful.
The unjust shall be wiped out forever,
and the descendants of the wicked destroyed. R

But from the Lord comes the salvation of the just,
their stronghold in time of distress.
The Lord helps them and rescues them,
rescues and saves them from the wicked. because they take refuge in him. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत, 
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
 आलेलुया!

Acclamation: 
 I am the light of the world, says the Lord; whoever follows me will have the light of life.

शुभवर्तमान  लूक ५:३३-३९
वाचक :  लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  "वर काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील."
परुशी आणि शास्त्री यांनी येशूला म्हटले, "योहानचे शिष्य वारंवार उपवास आणि प्रार्थना करतात, तसे परुश्यांचेही शिष्य करतात, आपले शिष्य तर खातात पितात." येशूने त्यांना म्हटले, "वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय ? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल त्या दिवसांत ते उपवास करतील.” आणखी त्याने त्यांना दाखलाही सांगितला : कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले आणि नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल आणि नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुधले फाडून गळून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालावा. जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel ReadingLuke 5:33-39 At that time: The Pharisees and the scribes said to Jesus, "The disciples of John fast often and offer prayers, and so do the disciples of the Pharisees, but yours eat and drink." And Jesus said to them, "Can you make wedding guests fast while the bridegroom is with them? The days will come when the bridegroom is taken away from them, and then they will fast in those days." He also told them a parable: "No one tears a piece from a new garment and puts it on an old garment. If he does, he will tear the new, and the piece from the new will not match the old. And no one puts new wine into old wineskins. If he does, the new wine will burst the skins and it will be spilled, and the skins will be destroyed. But new wine must be put into fresh wineskins. And no one after drinking old wine desires new, for he says, 'The old is good." "
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
बदल नको. जसे चालले आहे तसेच राहू दे अशी संकूचित वृत्ती धारण करून जीवन जगणाऱ्या परुश्यांना येशू नवीन दृष्टिकोन दाखवत आहे. नवे वस्त्र फाडून जुन्या वत्राला ठिगळ लावत नाही व नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात घालत नाही. या म्हणीवरून येशूला हेच सांगायचे आहे की, जे जुन्याला धरून चिकटून आहेत त्यांना आपण सुरक्षित आहोत असे वाटते. ते बदल करण्यासाठी तयार नसतात किंवा नवीन दृष्टिकोन रुजवण्यास ते तयार नसतात. एकदा जुन्याची सवय झाली की आपण सुरक्षित आहोत असे त्यांना वाटते. जे काही स्थिर आहे ती वास्तवता म्हणजे अस्थिरता, बदल ह्याची आपल्याला जाणीव व्हायला हवी. जेव्हा आपल्याला बदल स्वीकारायचे आहेत तेव्हा आपण तेस्वीकारायला हवे. आपल्या वैयक्तिक जीवनात बदल स्वीकारण्यास आपण तयार आहोत का?

प्रार्थना हे प्रभूयेशू, तुला अनुसरण्यास व शरण येण्यास आम्हाला प्रेरणा दे, तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला सामर्थ्य दे, आमेन.
✝️

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२४

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,   

(इथे  आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस  ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.

हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. 

हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. 

हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या