Marathi Bible Reading | Thursday 5th September 2024 | 22nd Week in Ordinary Time

सामान्य काळातील बाविसावा  सप्ताह 

गुरुवार ५ सप्टेंबर  २०२४

“गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.""Master, we toiled all night al night and took nothing! But at your word I will let down the nets."



रात्रभर कष्ट करून निराश झालेल्या पेत्राबरोबर प्रभूयेशू समुद्रात गेला आणि पेत्राला त्याने समुद्रात जाळे टाकण्यास सांगितले असता जाळ्यात भरपूर मासे लागले. त्यानंतर इतके मासे मचव्यात गोळा झाले की मचवा बुडू लागला. पेत्राला त्याची भीती वाटली मग प्रभूयेशू त्याला म्हणाला, “भिऊ नकोस येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” निराश झालेल्या पेत्राला प्रभूयेशूने प्रोत्साहित करून काम करायला लावले.  पेत्राने प्रभूयेशूच्या पाचारणाचा स्वीकार केला आणि आज्ञाधारकपणे येशूचे प्रेषित कार्य केले.
देवाचे शहाणपण व ज्ञान आपल्या बुद्धी आकलना पलिकडचे आहे, म्हणून देवाला शरण जाऊन त्याची वाणी आपण ऐकायला हवी. प्रभूयेशू आज आपल्या प्रत्येकाला बोलावित आहे. आपल्या मनातील सर्व भीती दू सारून प्रभूयेशू देवाच्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. आपल्या जीवनातील नैराश्य व अपयश दूर करण्यास व आपल्या जीवनाला नव्याने उभारी देण्यास प्रभू सर्वदा तयार असतो. आपण नम्रतेने त्याची वाणी ऐकून त्याला शरण जाऊया.

  
पहिले वाचन : करिथ  ३:१८-२६ 
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"सर्वकाही तुमचे आहे, तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे."

कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहो असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे. कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे. "तो ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो," असा शास्त्रलेख आहे आणि "ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो,” असा दुसरा शास्त्रलेख आहे. म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाही तुमचे आहे. पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे, तुम्हीं ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : 1 Corinthians 3:18-23 Brethren: Let no one deceive himself. If anyone among you thinks that he is wise in this age, let him become a fool that he may become wise. For the wisdom of this world is folly with God. For it is written, "He catches the wise in their craftiness", and again, "The Lord knows the thoughts of the wise, that they are futile." So let no one boast in men. For all things are yours, whether Paul or Apollos or Cephas or the world or life or death or the present or the future - all are yours, and you are Christ's, and Christ is God's.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   २४:१-६
प्रतिसाद :  पृथ्वी आणि तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे.

१) पृथ्वी आणि तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे, 
जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.
 कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, 
त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.

२) परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल ?
 त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ?
 ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, 
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, 
जो आपल्या शेजाऱ्याला फसवण्यासाठी 
कपटाने शपथ वाहत नाही.

 ३) त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल.
 आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. 
त्याला शरण जाणारे हेच लोक होत. 
हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच.

Psalm 24:1-2, 3-4ab, 5-6 The Lord's is the earth and its fullness. The Lord's is the earth and its fullness,
the world, and those who dwell in it.
It is he who set it on the seas;
on the rivers he made it firm. R Who shall climb the mountain of the Lord?
Who shall stand in his holy place?
The clean of hands and pure of heart,
whose soul is not set on vain things. R

Blessings from the Lord shall he receive,
and right reward from the God who saves him.
Such are the people who seek him,
who seek the face of the God of Jacob. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!

Acclamation: 
Follow me, says the Lord, and I will make you fishers of men.

शुभवर्तमान  लूक   ५:१-११
वाचक :  लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "सर्व सोडून देऊन ते ख्रिस्ताचे अनुयायी झाले. ' 
लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगीतले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो." मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली, तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणाविले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी `मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहूनतो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते; तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel ReadingLuke 5:1-11 On one occasion, while the crowd was pressing in on Jesus to hear the word of God, he was standing by the lake of Gennesaret, and he saw two boats by the lake, but the fishermen had gone out of them and were washing their nets. Getting into one of the boats, which was Simon's, he asked him to put out a little from the land. And he sat down and taught the people from the boat. And when he had finished speaking, he said to Simon, "Put out into the deep and Ilet down your nets for a catch." And Simon answered, "Master, we toiled all night al night and took nothing! But at your word I will let down the nets." And when they had done this, they enclosed a large number of fish, and their nets were breaking. They signalled to their partners in the other boat to come and help them. And they came and filled both the boats, so that they began to sink. But when Simon Peter saw it, he fell down at Jesus' knees, saying, "Depart from me, for I am a sinful man, O Lord." For he and all who were with him were astonished at the catch of fish that they had taken, and so also were James and John, sons of Zebedee, who were partners with Simon. And Jesus said to Simon, "Do not be afraid; from now on you will be catching men." And when they had brought their boat o land they left everything and followed him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
मासेमारीमध्ये हातखंड असलेला पट्टीचा कोळी शिमोन पेत्र येशूला म्हणतो, गुरूजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी आपली जाळी सोडतो. (ओवी ५.) वडिलोपर्जीत मासेमारी व्यवसाय करणारा पेत्र हा इतरांपेक्षा या व्यवसायात पारंगत होता. रात्रभर कष्ट केले. या वचनावरून आपल्याला हेच समजते की, त्याने आपल्या अनुभवाने, कला- कौशल्याचा चांगला वापर केलेला होता परंतु त्याला यश प्राप्त झाले नव्हते. मानवी प्रयत्न जेव्हा अपुरे पडतात तेव्हा दैवी सामर्थ्याकडे
जाणे जरूरीचे असते. शिमोनाने येशूच्या सांगण्यावरून जाळी पुन्हा पाण्यात सोडली. याचा अर्थ त्याने येशूवर भरवसा ठेवला.येशूच्या शब्दात सामर्थ्य आहे. मी माझ्या कामात मानवी प्रयत्नाबरोबर दैवी सामर्थ्यशाली प्रभूकडे वळतो का ?

प्रार्थना हे प्रभूयेशू, तुला अनुसरण्यास व शरण येण्यास आम्हाला प्रेरणा दे, तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला सामर्थ्य दे, आमेन
✝️

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२४

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,   

(इथे  आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस  ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.

हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. 

हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. 

हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या