Marathi Bible Reading | Wednesday 4th September 2024 | 22nd Week in Ordinary Time

सामान्य काळातील बाविसावा  सप्ताह 

बुधवार ४ सप्टेंबर  २०२४

त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले.

he laid his hands on every one of them and healed them.



विटेर्बोची संत रोझ

- कुमारिका (१२३५-१२५२)

चिंतन : प्रार्थनेद्वारे परमेश्वर माणसाला या जगातील ऐहिक सुखाचा फोलपणा प्रकट करीत असतो. प्रार्थना आपल्याला देवाच्या प्रकाशाने, सामर्थ्याने आणि सांत्वनाने भरून टाकते. प्रार्थना आपली मने स्वर्गीय तेजाने व हर्षाने न्हाऊन उजळून काढते. - व्हिटेर्बोची संत रोझ

✝️   
पहिले वाचन : : करिथ  ३:१-९ 
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"आम्ही देवाचे सहकारी आहो, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा."
बंधुजनहो, जसे आध्यात्मिक वृत्तीच्या माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्हांला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहा. ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा आणि कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहा की नाही ? आणि मानवी रीतीने चालता की नाही ? कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलचा आहे," दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोचा आहे,” तेव्हा तुम्ही मानवच आहा की नाही ?
अपुल्लोस कोण ? आणि पौल कोण ? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसने पाणी घातले, पण देव वाढवतं गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहे. तरी प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Corinthians 3:1-9 1, brothers, could not address you as spiritual people, but as people of the flesh, as infants in Christ. I fed you with milk, not solid food, for you were not ready for it. And even now you are not yet ready, for you are still of the flesh. For while there is jealousy and strife among you, are you not of the flesh and behaving only in a human way? For when one says, "I follow Paul", and another, "I follow Apollos", are you not being merely human? What then is Apollos? What is Paul? Servants through whom you believed, as the Lord assigned to each. I planted, Apollos watered, but God gave the growth. So neither he who plants nor he who waters is anything, but only God who gives the growth. He who plants and he who waters are one, and each will receive his wages according to his labour. For we are God's fellow workers. You are God's field, God's building.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   :१२-१५, २०-२१
प्रतिसाद : ज्या लोकांना देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य !

१) ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, 
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता
 प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य ! 
परमेश्वर आकाशातून पाहतो, 
सर्व मानवजातीला तो निरखतो.

२ )तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर 
राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो, 
त्या सर्वांची हृदये घडवणारा आणि 
त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे.

३) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे. 
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. 
त्याच्या ठायी आमच्या हृदयांना आनंद आहे.
 त्याच्या पवित्र नामावर आमची श्रद्धा आहे.


Psalm 33:12-13, 14-15, 20-21 Blessed the people the Lord has chosen for his heritage.

Blessed the nation whose God is the Lord, the people he has chosen as his heritage.
From the heavens the Lord looks forth; he sees all the children of men. R From the place where he dwells he gazes on all the dwellers on the earth,
he who shapes the hearts of them all,
and considers all their deeds. R Our soul is waiting for the Lord. He is our help and our shield.
In him do our hearts find joy. We trust in his holy name. R.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
 
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!

Acclamation: 
: The Lord has anointed me to . proclaim good news to the poor, to proclaimliberty to the captives

शुभवर्तमान  लूक   ४:३८-४४
वाचक :  लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे."

येशू सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.
सूर्यास्ताच्या वेळी, ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. “तू देवाचा पुत्र आहेस," असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते.
दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते, परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.
मग तो यहुदियांच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel ReadingLuke 4:38-44 At that time: Jesus arose and left the synagogue and entered Simon's house. Now Simon's mother-in-law was ill with a high fever, and they appealed to him on her behalf. And he stood over her and rebuked the fever, and it left her, and immediately she rose and began to serve them. Now when the sun was setting, all those who had any who were sick with various diseases brought them to him, and he laid his hands on every one of them and healed them. And demons also came out of many, crying, "You are the Son of God!" But he rebuked them and would not allow them to speak, because they knew that he was the Christ. And when it was day, he departed and went into a desolate place. And the people sought him and came to him, and would have kept him from leaving them, but he said to them, "I must preach the good news of the kingdom of God to the other towns as well, for I was sent for this purpose." And he was preaching in the synagogues of Judea.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
रात्रंदिवस कामात मग्न असणारा येशू आपल्या नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी एकांतात जाऊन प्रार्थना करतो. आपल्या अंतरंगाच्या शोधासाठी प्रार्थना एक साधन आहे. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात प्रार्थना करण्यासाठी गेला. (ओवी ४२) येशू आपल्या पित्याबरोबर प्रार्थनेद्वारे एक व्हायचा. पित्याची इच्छा जाणून घ्यायचा. कधीकधी काही शुल्लक कारणासाठी आपण प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतो. "फाटा वेलात राहील्यावाचून आपल्या आपण फळ देता येत नाही. (योहान १५:४). त्याचप्रमाणे आपण आपल्या कामात प्रभावी व यशस्वी होऊ शकत नाही. जर का आपण प्रार्थनेद्वारे येशूबरोबर एकत्र झालो नाही तर ! महात्मा गांधीजींचा एक निकष आहे. "सकाळ, संध्याकाळ जीवनाचे कुलुप उघडण्यासाठी प्रार्थना ही एक आपल्याकडे असलेली चावी आहे." आपल्या अंतरंगाचा शोध घेण्यासाठी आज आपल्याकडे वेळ आहे का ?

प्रार्थना :हे परमेश्वरा, आमचे रक्षण कर, तुझा मुख प्रकाश आमच्यावर पाडव  प्रसन्नतेने व शांतीने जीवन जगण्यास कृपा दे, आमेन.
✝️

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२४

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,   

(इथे  आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस  ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.

हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. 

हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. 

हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या